Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वर्ष 2016मध्ये शनीची साडेसाती

Webdunia
शनीची साडेसाती ऐकल्यावरच अधिकतर लोकांच्या मनात भीती बसते, पण खरं पाहिले तर असे काही नाही. साडेसातीशी भिण्यापेक्षा त्याबद्दल समजून घेण्याची जास्त गरज आहे. हा प्रकार काय आहे आणि याचा प्रभाव काय हे समजणे अधिक आवश्यक आहे. म्हणूनच विस्तारपणे जाणून घ्या शनीची साडेसाती आणि शनीची ढय्याबद्दल ...
 
शनीची साडेसाती
साडेसातीबद्दल सांगायचे तर जेव्हा शनीचा गोचर चंद्र बाराव्या भावात असतो तेव्हा साडेसाती सुरू होते आणि जेव्हा शनीचा गोचर जन्म कालीन चंद्राच्या तृतीय भावात असतो तेव्हा याची समाप्ती होते. शनीच्या साडेसातीचा काळ अडीच वर्ष असतो आणि यामुळे या तीन भावामधून निघायला साडेसात वर्ष लागतात. हा पूर्ण काळ शनीची साडेसाती म्हणून ओळखला जातो.
 
शनीची ढय्या
साडेसाती व्यतिरिक्त शनीचा एक आणखी गोचर असतो ज्याला ढय्या असे म्हटले आहे. याला असे निर्धारित केले आहेत- जेव्हा शनीचा गोचर जन्मावेळी चंद्राच्या चौथ्या किंवा आठव्या भावात असतो, त्याला ढय्या असे म्हणतात. याचा प्रभाव अडीच वर्ष राहतो त्यामुळे याला ढय्या म्हणतात.
 
साडेसाती आणि ढय्याबद्दल तर आम्ही जाणून घेतले अता पाहू 2016 साली कोणत्या राशींवर साडेसाती आणि कोणत्या राशींवर ढय्याचा प्रभाव राहील.
 
साडेसाती प्रभावित राश्या:- तूळ, वृश्चिक आणि धनू
 
ढय्या प्रभावित राश्या:- मेष आणि सिंह
 
तूळ राशीवर साडेसातीचा प्रभाव, परिणाम आणि उपाय
 
या वर्षी तूळ शनीच्या साडेसातीहून प्रभावित आहे आणि या राशीच्या धन स्थानी शनीचा गोचर होत आहे. पाहू या परिस्थितीत तूळ राशीला काय परिणाम मिळणार आहे.
 
आपल्या कुंडलीच्या दुसर्‍या भावात शनीचा गोचर आहे, म्हणून आपल्याला आर्थिक बाबतीत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. धनासंबंधी बाबतीत कोणत्याही प्रकाराची हळगर्जी आपल्यासाठी हानिकारक ठरू शकते. तसे अचानक धनलाभ योग आहे तरी डोळे बंद करून चालणारे आदळतात यात काही शंका नाही. म्हणूनच विचारपूर्वक पाऊल टाका. निवेश करण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. लांबचा प्रवास आर्थिक फायद्याचा ठरेल आणि विदेशी संबंधांचा फायदा मिळेल. तरी इतर बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे. प्रिय जनांशी प्रेमाने वागा आणि वाद टाळा. नवीन सुरुवात करण्यासाठी आणि घर बदलण्यासाठी ही वेळ योग्य नव्हे.
उपाय:-
 
कुष्ठरोगींची सेवा करा.
सव्वा किलो कोळसा आणि एक लोखंडाचा खिळा काळ्या कापडात बांधून आपल्या डोक्यावरून ओवाळून वाहत्या पाण्यात प्रवाहित करून द्या.
 
वृश्चिक राशीवर साडेसातीचा प्रभाव, परिणाम आणि उपाय
आपल्या जन्म कुंडलीच्या प्रथम भावात शनीचा गोचर होणार आहे. शनी आपल्या लाभेश आणि अष्टमेश बुधच्या नक्षत्रात आहे. अश्या परिस्थितीत आपल्याला मिश्रित परिणाम मिळतील. कार्य पूर्ण होण्यात विलंब होऊ शकतो. तसेच कामाच्या दबावामुळे आणि त्यावर आपल्या संघर्षाचे परिणाम चांगले मिळतील. वरिष्ठ अधिकार्‍यांशी वाद टाळा. हे आपल्यासाठी घातक ठरू शकतं. आपल्या विरोधकांशी सावध राहण्याची गरज आहे. ते आपल्याला हानी पोहचवण्याचा प्रयत्न करू शकतात. वायफळ खर्चांवर नियंत्रण ठेवा. आरोग्यच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. लाईफ पार्टनरच्या भावनांचा आदर करा. नात्यांमध्ये संशय निर्माण होता कामा नये.
 
उपाय:-
माकडाला गूळ खाऊ घाला.
मद्यपान आणि मांसाहार टाळा.
 
धनू राशीवर साडेसातीचा प्रभाव, परिणाम आणि उपाय
या वर्षी शनीचा गोचर आपल्या कुंडलीत व्यय भावात आहे. असे घडण्याचे कारण म्हणजे शनी आपल्या दशमेश आणि सप्तमेश बुधाच्या नक्षत्रात आहे. या काळात आपण करत असलेल्या कामांमध्ये व्यत्यय उत्पन्न होण्याची शक्यता आहे. तरी यानंतरही आपले कार्य पूर्ण होतील म्हणून काळजी करण्याची गरज नाही. वेळोवेळी आरोग्य तपासणी करावी, विशेषतः आधीपासून काही शारीरिक त्रास असल्यास निष्काळजीपणा करून चालणार नाही. खर्च सांभाळून करा आणि बोलण्यात गोडवा आणण्याचा प्रयत्न करा. विदेशी कार्यात यश मिळेल. 
 
उपाय:-
शनिवारी हनुमानाला शेंदूर चढवा आणि हनुमान चालीसाचा पाठ करा.
शनिवारी 11 नारळ वाहत्या पाण्यात प्रवाहित करा.

पुढे पहा ढय्या असणार्‍या राश्या कोणत्या आहे.... 

ढय्या असणार्‍या राश्या: मेष आणि सिंह
 
मेष राशीवर शनीच्या ढय्याचा प्रभाव, परिणाम आणि उपाय
या वर्षी शनी देव आपल्या राशीत आठव्या स्थानी राहतील. म्हणजेच आपल्या राशीवर ढय्याचा प्रभाव राहील. अशात शत्रू आणि आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे. व्यवसाय आणि नोकरीत थोडे चढ-उतार येतील पण मेहनतीने आणि मन लावून काम केल्यावर पदोन्नती मिळेल. आर्थिक बाबतीत सतर्क राहा. कोणाच्याही प्रभावात येऊन गुंतवणूक करू नका. बोलण्यात गोडवा असावा व कुटुंबासह सुसंवाद साधा. प्रेम संबंध आणि अपत्याची उपेक्षा करणे योग्य नव्हे.
उपाय:-
मुंग्यांना आटा खाऊ घाला.
गरिबांना जोडे आणि काळे वस्त्र दान करा.
 
सिंह राशीवर शनीच्या ढय्याचा प्रभाव, परिणाम आणि उपाय
या वर्षी शनी आपल्या कुंडलीत चतुर्थ भावात आहे, म्हणून चांगले परिणाम साध्य करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. तरी शनी आपल्या धनेश आणि लाभेश बुधाच्या नक्षत्रात राहील, अर्थात आपल्या मेहनतीला यश मिळेल. जर आपण अनेक दिवसांपासून प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न करत असाल तर ही इच्छा पूर्ण होईल. आपल्याला कार्यक्षेत्रात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. नोकरी करणार्‍यांना चांगले परिणाम मिळतील. कौटुंबिक जीवन आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. 
 
उपाय:-
काळ्या गायीला दूध आणि तांदूळ खाऊ घाला.
दर शनिवारी हनुमानाला शेंदूर चढवा.
 
येथे आम्ही त्या राशींबद्दल सांगितले ज्या साडेसाती किंवा ढय्याहून प्रभावित आहेत आणि त्याचबरोबर त्यापासून वाचण्याचे उपायदेखील सांगितले तरी काही असे उपायही आहे जे नेहमी प्रभावी सिद्ध होतात. पाहू असे काही उपाय.... 
 
तेलाचे दान
छाया पात्राचे दान
शनी मंत्राच जप
दशांश हवन
शनिवाराचा उपास
सप्तधान्य दान (सात प्रकाराचे धान्य)
शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा
सर्व पहा

नवीन

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

Santoshi Mata Vrat Vidhi in Marathi संतोषीमाता व्रत संपूर्ण माहिती

आरती शुक्रवारची

गंभीर आजारांपासून मुक्त राहण्यासाठी अश्वत्थ स्तोत्राचे पठण करा Ashwattha Stotram

Paush Putrada Ekadashi 2025: पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये?

सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

पुढील लेख
Show comments