Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

12 राशींसाठी कसे राहील वर्ष 2016

Webdunia
बुधवार, 23 डिसेंबर 2015 (17:10 IST)
मेष : मेष राशी असलेल्या लोकांसाठी हे वर्ष मिश्रित फल देणारं राहील. राजकीय कामकाजासाठी वेळ शुभ राहील. आर्थिक परिस्थिती कठीण राहील. काही काळासाठी आपल्या बंधू आणि मित्रांचा विरोध पत्करावा लागेल. कर्ज होण्याची शक्यता आहे. शेतकर्‍यांसाठी हे वर्ष सामान्य राहील. विरोधी भाव निर्माण होऊ शकतात, जून महिन्यात आर्थिक स्थिती सुधारेल. शनीमुळे या वर्षी प्रगती तर निश्चित होईल पण अत्यधिक परिश्रम केल्यानंतर. अनओळखी लोकांवर विश्वास ठेवू नका.
शुभ महिना- फेब्रुवारी, जून, डिसेंबर
आराध्य- राहू-शनी
वृषभ :  या राशीच्या लोकांसाठी हे वर्ष शुभ आणि यश देणारं ठरले. आरोग्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. अती व्यय होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. पार्टनरशिपमध्ये सावध राहा. प्रामाणिक विद्यार्थ्यांना यश मिळेल.
शुभ महिना- फेब्रुवारी, सप्टेंबर, डिसेंबर 
आराध्य- श्रीकृष्ण
मिथुन : ही राशी असणार्‍या लोकांना या वर्षी फायदा होईल. व्यवसायात सन्मान मिळेल. उद्योगपतींसाठी हे वर्ष उत्तम. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. शेतकर्‍यांसाठी हे वर्ष सामान्य राहील. आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष चांगले नाही. जून महिन्यात कोर्टासंबंधी काम होतील. कौटुंबिक सहवास मिळेल.
शुभ महिना- जानेवारी, मे, सप्टेंबर
आराध्य- शनी आणि गणपती
कर्क : ही रास असणार्‍यांचे हे वर्ष सामान्य राहील. व्यवसायात यश मिळेल. उद्योगपतींसाठी हे वर्ष उत्तम. विद्यार्थ्यांची प्रगती होईल. शेतकर्‍यांसाठी हे वर्ष सामान्य राहील. आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष अनुकूल राहील. कौटुंबिक मदत मिळण्याची शक्यता नाही. धार्मिक यात्रेचा योग आहे. नोकरीत प्रगती होईल. घरातील कन्येचं भाग्य उजळेलं. वाईट संगतीपासून वाचा. अती अपेक्षा योग्य नाही. धीर ठेवा. धन-मान-सन्मान सर्वांचे चांगले योग आहे.
शुभ महिना- जानेवरी, जून, ऑक्टोबर 
आराध्य- राहू-केतू आणि गणपती
सिंह : ही रास असलेल्या लोकांसाठी हे वर्ष मनोकामना पूर्ण करणारं असेल. निरोगीपणा आणि शारीरिक सुख मिळेल पण मानसिक त्रास राहील. पत्नीच्या भाग्याने वर्ष उत्तम पार पडेल. कोर्टासंबंधी काम पूर्ण होतील. अपत्याचे परदेशी जाण्याचे योग आहे. सासरून मदत मिळेल. नोकरीत प्रगती होईल. शेतकरी सुखात जगतील.
शुभ महिना- मार्च, जुलै, सप्टेंबर
आराध्य- गणपती
कन्या : कन्या राशी असलेल्यांसाठी हे वर्ष दु:ख, अती खर्च आणि कमी उत्पन्न देणारं ठरेल. मानसिक चिंतेमुळे मन स्थिर राहणे कठिण असेल. दुसर्‍यांवर अवलंबून राहू नये. मेहनत, संकल्प आणि दृढ विश्वास असल्यास यश मिळू शकतं. कार्यक्षेत्रात परिवर्तन होण्याची शक्यता आहे. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. व्यवसाय सामान्य राहील. 
शुभ महिना- फेब्रुवारी, जून, नोव्हेंबर
आराध्य- गायत्री मंत्र
तूळ- व्यवसायात वृद्धी होईल. आर्थिक-भौतिक सुखात वाढ होईल. शेतकर्‍यांसाठी हे वर्ष उत्तम. सामाजिक व धार्मिक कार्यांमध्ये खर्च होईल. मान-सन्मान वाढेल. आपल्या प्रकृतीप्रमाणे आहार घ्या. विचारपूर्वक यात्रा करावी. प्रॉपर्टीत गुंतवणूक करण्याचे योग. अपत्याची काळजी वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. कीर्ती वाढेल, सुखाचे उत्तम योग. यशामुळे बहकण्याची शक्यता आहे म्हणून सावध राहा.
शुभ महिना- मार्च, जुलै, नोव्हेंबर 
आराध्य- गणपती
वृश्चिक : या वर्षी व्यवसायात वृद्धी होईल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. शेतकर्‍यांसाठी हे वर्ष सामान्य राहील आणि सामाजिक व धार्मिक कार्यांमध्ये व्यय होईल. प्रॉपर्टी खरेदी कराल. आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष सामान्य राहील पण मानसिक चिंतेमुळे स्थिरता नसेल. मित्रांचा सहयोग, मेहनत, संकल्प आणि दृढ विश्वासामुळे यश मिळेल. अपत्याकडून सुख प्राप्तीचे योग.
शुभ महिना- फेब्रुवारी, एप्रिल, जुलै, डिसेंबर 
आराध्य- महादेव
धनू : या वर्षी मनोकामना पूर्ण होतील. आरोग्य व शारीरिक सुख लाभेल. मानसिक भीती व संकट व्यापत राहील. कुटुंबाच्या भाग्याने वर्ष चांगलं राहील. कोर्टासंबंधी कार्यात व्यस्तता राहील. परदेशी प्रवासाचे योग. मामाकडून सहयोग मिळणार नाही. नोकरीत प्रगती होईल. शेतकर्‍यांसाठी सुखाचा काळ. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. उद्योजक काळजीत राहतील. यशाचे मार्ग सापडतील. शनीमुळे सुखात कष्ट असेल तरी आर्थिक सुख लाभेल. 
शुभ महिना- मार्च, जून, नोव्हेंबर
आराध्य- गुरु व राहूचा जप
मकर : हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी प्रगतिदायक राहील. शेतकर्‍यांसाठी सामान्य राहील. आरोग्याच्या दृष्टीने चांगलं राहील. कौटुंबिक सहयोग मिळेल. धार्मिक प्रवासाचे योग. नोकरीत प्रगती होईल. घरात कन्येचे भाग्य उजळेल. मानसिक त्रास राहील. अती अपेक्षा योग्य नव्हे. भावंड आणि मित्रांकडून विरोध मिळण्याची शक्यता. कर्ज घेण्याचा संयोग.  धन-मान-सन्मानाचा योग.
शुभ महिना- जानेवारी, जून, नोव्हेंबर
आराध्य- हनुमान व राहू
कुंभ : हे वर्ष शुभ आणि यशस्वी ठरेल. आरोग्य उत्तम राहील. खर्च अती पण उत्पन्न कमी राहील. व्यवसायात नुकसानाची शक्यता नाही. पार्टनरशिपमध्ये सावध राहा. प्रामाणिक विद्यार्थ्यांना यश मिळेल. अपत्याला यश मिळेल. परदेशी प्रवासाचे योग. मित्र, भावंडाचे सहयोग. शेतकर्‍यांसाठी हे वर्ष सामान्य राहील. आत्मविश्वास असणार्‍यांना नक्की यश मिळेल. आई-वडिलांना सहयोग करा, प्रगती होईल. 
शुभ महिना- मार्च, मे, ऑगस्ट
आराध्य- शक्तीची उपासना
 
मीन- हे वर्ष यश प्रदान करणारे व सुखाने भरपूर असेल. पत्नीच्या भाग्याने वर्ष उत्तम राहील. कोर्टासंबंधी कामात यश मिळेल. अपत्यामुळे त्रास वाढेल. आरोग्य चांगलं राहील. व्यवसायात वृद्धी होईल. मानसिक ताणापासून मुक्ती मिळेल. परदेशी प्रवासाचे योग. इतरांवर अवलंबून राहू नये. स्वत:चे काम स्वत: पूर्ण करा, यश नक्की हाती लागेल. नोकरीत प्रगती होईल. शेतकरी सुखात राहतील. धार्मिक यात्रेचे योग. मांगलिक कार्यांचे योग.
शुभ महिना- फेब्रुवारी, मे, डिसेंबर 
आराध्य- केतू व शनी जपासह गुरुची उपासना
सर्व पहा

नवीन

Makar Sankranti Katha in Marathi मकर संक्रांतीच्या पौराणिक कथा

Shani Pradosh Vrat 2025 शनि प्रदोषाच्या दिवशी हे उपाय करा, आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती पूजा साहित्य, संपूर्ण पूजा विधी, सुगड पूजन, महत्व

Makar Sankranti 2025 Recipe खमंग तिळाची चटणी Til Chutney

Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा