Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जून (2016) महिन्याचे राशी भविष्यफल

Webdunia
मंगळवार, 31 मे 2016 (16:00 IST)
मेष : इच्छीत लाभाने आनंद होईल. स्पर्धेचा निकाल आपल्याला प्रसन्न करेल. स्त्रियांनी तब्येतीची काळजी घ्यावी. वजन वाढेल. नोकरीत पदोन्नती शक्य आहे. तब्येतही थोडी नाजुक राहील. विद्यार्थी वर्गासाठी चांगली बातमी आहे. सुख आणि धन प्राप्तीचे संकेत आहेत. सांध्यांचे दुखणे किंवा शल्य चिकित्सा होऊ शकेल. नोकरी व्यवसायात परिवर्तनामुळे घरापासून दूर राहावे लागेल. 
 
वृषभ : आपला वाईट काळ संपला आहे. जुन्या कामाचा फायदा मिळण्यास सुरुवात होईल. आपण नव्या कामाचा शुभारंभही करू शकता. मित्र आपल्याला मदत करतील. हो, पण कोणावरही डोळे मिटून भरवसा ठेवू नका, नाहीतर नंतर पश्चाताप करण्याची पाळी येईल. आणि हो, कुटुंबात लहान-मोठ्या समस्या उद्भवू शकतात. पण आर्थिक बाजू मजबूत राहील.
 
मिथुन : अपेक्षित परिणाम मिळाल्यामुळे मन प्रसन्न राहील. मिळकतीतील वृद्धीने आर्थिक बाजू सुदृढ होईल. आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहा. मित्रांचे वागणे साहाय्यकारी ठरेल. पत्नीचे स्वास्थ्य चिंताजनक राहू शकेल. दीर्घ प्रवास थकवणारे ठरतील. हवेत गप्पा मारणे ठीक नाही. मालमत्तेत गुंतवणूक करा. बॉससोबत उगीच वाद् घालणे टाळा. गुंतवणुकीच्या नव्या योजना आखा.
कर्क : कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुठेतरी बाहेर फिरायलाही जाऊ शकाल. शत्रू तुमचे नुकसान करण्यासाठी टपून बसले आहेत, सावध राहा. परिवारात नवा आनंद येणार आहे. एकुणच हा महिना चांगलेच फळ देईल. आई-वडिलांशी बाचाबाची होण्याची शक्यता आहे. फ़िरायला जाण्याआधी घराच्या सुरक्षेची नीट तजवीज करून जा. मनोरंजनावर अधिक खर्च केल्यामुळे महिनाअखेरीस तुम्हाला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागेल.
 
सिंह : कुठल्याही कागदपत्रांवर सही करण्याआधी योग्यरीत्या पडताळणी करा. तुमच्या वागण्यामुळे आसपासच्या लोकांना त्रास होऊ शकतो. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. इतरांच्या प्रकरणात उगीचच नाक खुपसू नका. हा महिना तुमच्यासाठी मिळता-जुळता असणार आहे. डॉक्टरकडे जाणे होऊ शकेल. कुठुनतरी शुभाशुभ बातमी येऊ शकेल. कामाबाबतीत सकारात्मक मनस्थिती ठेवा. मानसिक स्थिती साधारण ठेवा.
 
कन्या : धार्मिक कार्यात रूची वाढेल. एखाद्या धार्मिक क्षेत्राची यात्रा घडू शकते. एखादा नवा व्यवहार ठरवताना कागदपत्रांची योग्यरीत्या शहानिशा करून घ्या. नव्या जबाबदाया तुमच्यावर मानसिक दबाव टाकू शकतात. महिनाअखेरीस काही पाहुणे तुमच्या घरी येऊ शकतात. कुठे तरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. जोडीदारासोबत खास क्षण घालवू शकाल.
तूळ : सर्व प्रयत्नांतीही काम होईलसे दिसणार नाही, मेहनतीच्या तुलनेत फळ मिळणार नाही. जोडीदाराशी आपले वागणे ठीक राहणार नाही. आई-वडिलांच्या प्रसन्नतेची पूर्ण काळजी घ्या. अपत्यांकडूनही चांगली बातमी समजणार नाही. शत्रू हावी राहतील. तब्येतीची काळजी घ्या, बाहेर खाणे टाळा. जोडीदार आणि अपत्यांकडून त्रास होण्याची शक्यता आहे.
 
वृश्चिक : थोडा नीट विचार करुनच कोणत्याही कामात हात टाका. नव्या कामाची सुरुवात करण्याआधी प्रत्येक पैलूची आधीच माहिती मिळवणे आवश्यक आहे. कोर्ट-कचेरींपासून दूर राहणे ठीक होईल. कोणालाही उधार देणे टाळा, कारण यात तुमचे पैसे बुडू शकतील. नवे काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल.
 
धनू : तुमच्यासाठी काहीतरी रचनात्मक करण्याची वेळ आली आहे. कला आणि साहित्यांशी संबंधित लोकांसाठी अनुकूल वेळ आहे. स्वास्थ्य उत्तम राहील, जोडीदार आणि मित्रांचा सहयोग प्राप्त होईल. परिवारात सुख-शांती राहील. आर्थिक बाजू साधारण राहील. मुलांच्या बाजूने काही चिंता होण्याची शक्यता आहे. निरर्थक वादांमध्ये पडू नका.
मकर : धन लाभ होण्याचे योग. सासरकडून साहाय्य. मित्रांसोबत शहराबाहेर फिरण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. तुम्ही जे मेहनतीचे रोप आधी रोवले होते त्याची फळे खाण्याची वेळ आली आहे. पण घाई-गडबडी करू नका नाहीतर पश्चाताप करावा लागेल. महिन्याचा दुसरा पंधरवडा लाभदायक असेल. भौतिक सामान खरेदी केल्याने वैभवात वाढ होईल. शत्रूंना वाटूनसुद्धा तुमचे नुकसान करता येणार नाही.
 
कुंभ : धन जरा संभाळून खर्च करा. तुमची बेपर्वाई तुमचे नुकसान करू शकते. कुठेतरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. हा ब्रेक तुम्हाला गरजेचा आहे. कारण याने तुम्ही ताजेतवाने व्हाल आणि तुमच्या भविष्यासाठी तयारी करू शकाल. मिळकतीचे स्त्रोत वाढतील. धनप्राप्तीचे योग आहेत. सामाजिक कार्यात तुम्ही सतत तत्पर राहाल. 
 
मीन : सुदैवाने होणारी कामे बिघडतील. साहित्यिक क्षेत्रातील लोकांसाठी वेळ खूप चांगली आहे. तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल. नव्या नोकरीची संधी आहे. शिक्षणासाठी विदेशात जाण्याचे योग आहेत. अधिकारींशी संबंधांचा फायदा होईल. नोकरदार लोकांसाठी सामान्य वेळ आहे. आरोग्याची काळजी घ्या. 
सर्व पहा

नवीन

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

Guru Govind Singh jayanti : गुरु गोविंद सिंह यांच्याबद्दल खास गोष्टी

साकोरीचे सद्गुरू श्री उपासनी महाराज

आरती सोमवारची

Shiva Mantra: सोमवारी पूजा करताना महादेव मंत्राचा जप करावा

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

पुढील लेख
Show comments