Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नवीन आठवडा आणि तुमचे भविष्य

वेबदुनिया
मेष : महिला घरातील सुखसुविधा वाढविण्याच्या प्रयत्नात राहतील. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. घरातील वातावरण आनंदी, उत्साही, राहील. कामानिमित्त प्रवास घडतील. संततीची उन्नती होईल. उत्साहवर्धक घटना घडल्याने तरुण-तरुणी आनंदात राहतील. नवीन ओळखी होतील. साहित्यिक, कवी, कलाकार यांना आपापल्या क्षेत्रात चांगल्या संधी लाभतील.  

वृषभ : मिळालेल्या संधीचा लाभ आपल्या भविष्य उज्‍जवल करणारा राहील. उत्तरार्धात आगंतुक पाहुणो येण्याची शक्यता राहते. लेखकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. नवोदित कलाकारांना चांगल्या संधी लाभतील. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. जूनी येणी वसूल होतील.  

मिथुन : तरुणांना सुसंधीचा लाभ मिळेल. लेखक, साहित्यीक, कवी, कलाकार यांना सुसंधी लाभतील. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. व्यावसायिक उपक्रम डोळ्यासमोर ठेवून आधुनिक उपक्रम राबविले जातील. नव्या आशा पल्लवीत होतील. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील.  

कर्क : कौटुंबिक सौख्य लाभेल. थोरामोठय़ांचे सहकार्य लाभेल. घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील.एखादी महत्वाची बातमी समजल्याने उत्साही बनाल. दैनंदिन कामे सुरळीत पार पडल्याने नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. अनेक कामातून सफलता मिळणार आहे. भावंडांशी सुसंवाद साधाल आपल्या राशीच्या व्ययस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील. अनावश्यक खर्चाचे प्रमाण वाढेल.  

सिंह : व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी करत असलेल्या आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. सतत प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचे योग येतील. राजकीय क्षेत्रात आपले वर्चस्व वाढेल. नव्या जोमाने कामाला लागाल. उत्साह व उमेद वाढेल. बौद्धीक व कला क्षेत्रातून चांगला फायदा होईल. आर्थिक क्षेत्रातील निर्णय योग्य ठरणार आहेत. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल.  

कन्या : सरकारी कामात प्रगती करणारा आहे. सरकारी परवाने येतील. व्यवसाय उद्योगात आशावादी धोरण स्वीकारा. कोर्टातील कामात प्रगती होईल. सामाजिक कार्यात आपल्याला योग्य प्रतिसाद मिळेल. समाजात आपल्या मतांचा आदर होईल. कल्पनाशक्तीला वाव देणार्‍या घटना घडतील. जबाबदारीची कामे स्वीकारावी लागतील. मिळालेल्या संधींचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. नोकरी-व्यवसायातून आर्थिक लाभ घडून येतील. बढती बदलीचे योग येतील.  

तूळ : आपल्या वाक्चातुर्य़ाने दुसर्‍यांची मने जिंकून ध्येयपूर्ती कराल. आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील. लेखक, साहित्यीक, कवी, कलाकार यांना सुसंधी लाभतील. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून फायदा होईल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. चांगल्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. नव्या उमेदीने कामाला लागाल.  

वृश्चिक : व्यवसायत उद्योगातून चांगली प्राप्ती होईल. व्यवसाय उद्योगात अभिनवपूरक तंत्र वापरले तर चांगली भरभराट होईल. सार्वजनिक संबंधाच्या प्रश्नांशी सतत संबंध येतील. जूने मित्र भेटतील. सुग्रास भोजनाचे योग येतील. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. गुंतवणूकीतून लाभ होतील. कामानिमित्तच्या घडणार्‍या प्रवासात अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. मानसिक ताणतणाव जाणविण्याची शक्यता राहते. 

धनू : प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. व्यवसायीक उद्योगातील कामानिमित्त कर्ज प्रकरण रखडले असेल तर ते मार्गी लागेल. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे. नवीन व्यावसायिक करार घडतील.  

मकर : ज्या लोकांमुळे तुम्ही अडचणीत येता, अशा लोकांपासून लांब रहा. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. उत्तरार्धात कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील. कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड होईल. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या षष्ठस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. मातुल घराण्यातील व्यक्तींशी सुसंवाद साधाल. विरोधकांना आपले मत पटवून देण्यास यशस्वी व्हाल.  

कुंभ : पूर्वी झालेली दिशाभूल निस्तरण्यात वेळ जाईल. महत्त्वाच्या निर्णयात वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्यावे.उपासना मार्गातील लोकांना चांगली अनुभूती मिळेले. आपल्याला चांगला मार्गदर्शक भेटेल. एखादा निर्णय अनपेक्षितपणे झटपट घेतला जाईल. व भविष्यात त्याचा उपयोग होईल. आत्मविश्‍वास व मनोबल उत्तम राहील.व्यवसायातील कामाचा वेग वाढेल. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल.  

मीन : कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. घरातील सुखसुविधा वाढविण्याकरीता महिला नवीन खरेदीचे मनसुबे आखतील. सतत पाहुण्यांची वर्दळ राहील. मित्र परिवाराची भेट होईल. संततीच्या प्रगतीमुळे आपली पत वाढणार आहे. भरपूर काम करायचे आणि गृहसौख्याचा आस्वाद घ्यावयाचा असे मनोमन ठरवाल. गृहउद्योगातून हाती पैसा येईल.
सर्व पहा

नवीन

Makar Sankranti Katha in Marathi मकर संक्रांतीच्या पौराणिक कथा

Shani Pradosh Vrat 2025 शनि प्रदोषाच्या दिवशी हे उपाय करा, आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती पूजा साहित्य, संपूर्ण पूजा विधी, सुगड पूजन, महत्व

Makar Sankranti 2025 Recipe खमंग तिळाची चटणी Til Chutney

Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

Show comments