Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक भविष्यफल दि. 14 ते 20 फेब्रुवारी 2016

Webdunia
मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात सर्व मनोकामना पूर्ण होतील व मनावर असलेले काळजीचे सावट दूर होऊन उत्साहवर्धक स्थिती प्रस्थापित स्वरूपातच राहील. सर्वत्र यशाचा मार्ग खुला राहून अपयशाचा सामना करावा लागणार नाही. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतीकात्मक राहील. त्यामुळे दगदग व त्रास सहन करावा लागेल. नियोजित खर्चापेक्षा अधिक प्रमाणात खर्च करावा लागण्याची दाट शक्यता आहे. 
 
वृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग व्यवसाय क्षेत्र सुरळीत पणाच्या मार्गावर राहील. व्यवसाय क्षेत्रातील घडामोडी अपेक्षित स्वरूपाच्याच घडतील. मानसिक समाधान व शांतता टिकून राहू शकेल. यश समोर दिसू लागेल. अंतिम चरणात आर्थिक आवक समाधानकारकरीत्या राहील. आर्थिक टंचाईचा सामना सहसा करावा लागणार नाही व हातात पैसा खेळता राहू शकेल. यशाचा मार्ग खुलाच राहू यश मिळेल. 
 
मिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक यात्रा योग जुळून येईल व महत्वपूर्ण स्वरूपाच्या कामानिमित्त करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिद्ध होऊन उत्साह वाढीस लागेल. अंतिम चरणात उद्योग व्यवसाय क्षेत्रातील वाटचाल यशस्वीतेच्या मार्गावरूनच राहील व उद्योग व्यवसाय वाढीसाठी केलेले अथक परिश्रम सार्थकी ठरतील व आपले मदतकार्य इतरांना विशेष लाभप्रद ठरू शकेल. 
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात सर्वत्र परिश्रम व दगदग वाढेल व जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. शांतता ठेवणेच उचित स्वरूपाचे ठरू शकेल व होणारा मनस्ताप टळेल. शांतता टिकून राहील. इतरांवर अधिक प्रमाणात विश्‍वासून राहू नये. अंतिम चरणात शुभ कार्यानिमित्त प्रवास करावा लागेल व सर्वत्र नशिबाची साथ पाठीमागे राहील. कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित राहून आपला शब्द अंतिम प्रमाण स्वरूप मानला जाईल. 
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून अपेक्षित स्वरूपाचा लाभ घडेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीत राहील. नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार वा स्वीकार जरूर जरूर करावा. भावी काळासाठी लाभदायक ठरू शकेल. अंतिम चरणात वाहन पिडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करू नये. यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम करूनही तितके यश मिळणे अवघड़ 
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या मिटण्याच्या मार्गावर येतील व आरोग्य चांगले राहील. तसेच विरोधक मंडळीचा ससेमिरा व त्रास काही प्रमाणात कमी होऊन यशाचा मार्ग खुलाच राहील. अंतिम चरणात भागीदारीत असणारे वादविवाद मिटण्याच्या दृष्टिक्षेपात येतील व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहू शकेल. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे मनोनुकूल व चांगले दूरध्वनी येतील व सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश मिळू शकेल. 
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात सर्व प्रकारच्या परीक्षेमध्ये यश मिळेल. संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येतील. सर्वत्र यश दृष्टिक्षेपात ठेवणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक आवक समाधानकारक राहू शकेल व खर्चावर नियंत्रण राहील. अंतिम चरणात विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवूनच वाटचाल करतील. नेत्रदीपक प्रगतीचा मार्ग खुलाच राहील. कार्यक्षेत्रात आपले वर्चस्व कायम राहून दबदबा वाढीस लागेल. 
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारीक आनंद वाढेल. कौटुंबिक सदस्य मंडळींबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल. मानसिक सुखशांती कायम स्वरूपात राहील. अंतिम चरणात संततीबाबत असणारी एखादी बातमी मिळेल. आर्थिक अस्थिरता दूर होण्याच्या स्थितीत राहून आर्थिक व्यवहार कामे सुरळीतपणाच्या मार्गावर राहतील. अपूर्ण व स्थगित कामे गतिवान होऊन पूर्ण होतील. 
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात सहकारी वर्गाचे सहकार्य वेळेवर लाभेल. कोणतेही काम अपूर्ण अवस्थेत राहणार नाही. क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात आपले वर्चस्व वाढेल व बक्षीसपात्र स्थिती कायम राहू शकेल व यश समोर दिसेल. अंतिम चरणात कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक स्थितीत राहील. दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील, अशी एखादी घटना व घडामोडी घडून येतील व मनावर असलेले काळजीचे सावट दूर होऊन उत्साह वाढेल. 
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल. आर्थिक स्थिती चढ-उतार स्वरूपात ठेवणारी ग्रहस्थिती ओहे. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवीचे मार्गदर्शन घेणे आवश्यक व उचित ठरेल. भावी काळात होणारे नुकसान काही प्रमाणात टळू शकेल. अंतिम चरणात कार्य सभोतालीन परिस्थिती अनुकूल राहील. कार्य क्षेत्रात जे कार्य इतरांकडून शक्य झाले नाही ते कार्य आपल्या हातून यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकेल. 
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक समाधान लाभेल. मनावर असलेले काळजीचे सावट व दडपण मिटण्याच्या मार्गावर राहील. महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या कामासाठी प्रवास करावा लागून प्रवास कार्यसाधक स्वरूपाचाच सिद्ध होऊन उत्साह वाढीस लागेल. अंतिम चरणात पारिवारीक सदस्य मंडळीच्या आग्रहाखातर काही प्रमाणात सढळ हाताने पैसा खर्च करावा लागेल. मनातील कार्य योजना प्रत्यक्ष कृतीत आणण्यास उपयुक्त कालखंड ठरेल. 
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात मनाविरुद्ध खर्चाच्या प्रसंगास सामोरे जावे लागेल व कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. शांतता ठेवणेच योग्य ठरेल व मानसिक अशांतता जाणवणार नाही. अंतिम चरणात परिस्थिती थोडी मनाला दिलासा मिळवून देणारी राहील व काळजीचे सावट मिटेल. महत्वपूर्ण स्वरूपाच्या घडामोडी अनुकूल ठरतील. कार्य क्षेत्रात मान सन्मान मिळवून देणारी कामगिरी हातून घडेल व यश लाभेल.  
सर्व पहा

नवीन

Makar Sankranti Katha in Marathi मकर संक्रांतीच्या पौराणिक कथा

Shani Pradosh Vrat 2025 शनि प्रदोषाच्या दिवशी हे उपाय करा, आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल

Makar Sankranti 2025 : मकर संक्रांती पूजा साहित्य, संपूर्ण पूजा विधी, सुगड पूजन, महत्व

Makar Sankranti 2025 Recipe खमंग तिळाची चटणी Til Chutney

Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

Show comments