suvichar

मिथुन राशीच्या जातकांचे 2017 मधील वार्षिक राशिभविष्यफल

Webdunia
येणार्‍या वर्षांत आनंदाची बातमी म्हणजे गुरु, शनी, मंगळ या ती महत्त्वाच्या ग्रहांची नवीन वर्षात तुमच्यावर कृपादृष्टी राहणार आहे. तुमच्या अनेक मनोकामना पूर्ण होतील. एकंदरीत कामकाज चांगले होतील, पण व्यक्तिगत जीवनात काही समस्या तुम्हाला जाणवतील. अंतर्मनातील साकारात्मक भाव खूप काही चांगले देऊ शकतो आणि आपणच आपले अस्तित्व निर्माण करू शकतो. या ग्रहस्थितीची किती आणि कसा चांगला फायदा तुम्ही घ्यायचा हे तुम्हीच ठरवायचे आहे.  
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... या वर्षात व्यापार-उद्योगात तुम्हाला सतर्क राहावे लागेल. नवीन योजना फलद्रुपं करण्यासाठी संधी चालून येतील. एप्रिल 2017 पर्यंतचा वेळ प्रगतीसाठी उत्तम आहे. नंतर महत्त्वाकांक्षी प्रकल्प तुमचे लक्ष वेधतील. आर्थिकदृष्या फायदा मिळवून देणारी कामे मिळाल्याने या वर्षी तुम्ही आर्थिक उन्नतीचा एक नवीन उच्चांक गाठू शकाल. बाजारातील स्पर्धा आणि एकंदरीत वातावरण पाहून तुम्हाला तुमचा पवित्रा ठरवावा लागेल. तुमच्या क्षेत्रातील स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. त्याची सुरुवातीला भीती वाटेल, पण नंतर तुम्ही त्यावर मार्ग शोधून काढाल. फेब्रुवारीपासून सप्टेंबरपर्यंत चांगले काम झाल्यामुळे तुमची निराशा दूर होईल. प्राप्तीचे प्रमाण वाढल्यामुळे आत्मविश्वास बळावेल. सप्टेंबरनंतर थोडीशी नशिबाची साथ मिळेल, पण त्यावर पूर्णतः: अवलंबून राहू नका. नोकरदार व्यक्तींना या वर्षांत कामाच्या स्वरूपातील बदल स्वीकारावे लागतील. दिवाळीनंतर अचानक वरिष्ठ वेगळ्या पद्धतीचे काम तुमच्यावर सोपवण्याची शक्यता आहे. ज्यांची पूर्वी परदेशात जाण्याची संधी हुकली होती त्यांना तशी संधी मे-ऑक्टोबर या काळात मिळेल. बढतीची शक्यता जरी कमी असली तरी कामाचा तणाव कमी झाल्याने तुम्ही थोडेसे स्वास्थ्य अनुभवू शकाल. पूर्वीच्या कामाचे पैसे एकदम हातात मिळू शकतात.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान... 
गृहसौख्य व आरोग्यमान... जे जातक या वर्षी नवीन घर घेण्याचे स्वप्न बघत आहे त्यांचे स्वप्न जून-जुलै मध्ये पूर्ण होतील. तरुणांना विवाह ठरविण्यास आणि वैवाहिक जीवनात पदार्पण करण्यास उत्तम वर्ष आहे. गृहसौख्याच्या दृष्टीने चतुर्थातील गुरू विशेष अनुकूल आहे. जुन्या प्रश्नासंबंधी काही प्रकरण अर्धवट राहिले असतील, तर फेब्रुवारीनंतर ते मार्गी लागतील. जास्त तणाव न होता योग्य ठिकाणी तडजोड करा. एकंदरीत गृहसौख्यात भर पडेल. महिलांचे बराच काळाचे स्वप्न साकार झाल्यामुळे त्यांना बरे वाटेल. विद्यार्थ्यांनी आळस करू नये. तरुणांना स्थिरता येईल. त्यांचे विवाह जमतील. खेळाडूंना आणि कलाकारांना येत्या वर्षात प्रसिद्धी आणि पैसे मिळतील. विशेष प्रावीण्य असल्यास त्यातूनही लाभ होईल.
सर्व पहा

नवीन

एकाच गोत्रात लग्न का करत नाही? या मागील वैज्ञानिक आणि धार्मिक कारण जाणून घ्या....

Guruvar Upay for Marriage गुरुवारच्या ह्या 5 उपायांनी बनतील मांगलिक कार्याचे योग

गंगा सप्तमी 2026: तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या

गंगा सप्तमी का साजरी केली जाते? जाणून घ्या पौराणिक कथा

आरती गुरुवारची

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

पुढील लेख
Show comments