rashifal-2026

वृश्चिक राशीच्या जातकांचे 2017 मधील वार्षिक राशिभविष्यफल

Webdunia
वृश्चिक जातकांच्या स्वराशीत साडेसातीचा काळ जरी असला तरी हे वर्ष गुरू, राहू आणि शुक्राच्या सानिध्यातून उत्तम मार्गक्रमण करील. गेल्या वर्षांच्या सुरुवातीपासून शनी आणि मंगळ हे दोन ग्रह तुमच्या राशीमध्ये ठाण मांडून बसले होते. त्यांनी अनेक अनपेक्षित प्रश्न 
निर्माण केले. त्यामुळे तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा आत्मविश्वास गेला. आता साडेसातीचा मध्यभाग संपणार आहे आणि शेवटचा टप्पा सुरू होईल. त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा दिलासा लाभेल. संपूर्ण वर्ष तुम्हाला गुरुची उत्तम साथ आहे. त्यामुळे अनेक गोष्टी मार्गी लागतील. येत्या वर्षात जानेवारीपासून काही आशादायक घटनांची सुरुवात होईल. या प्रगतीत खंड पडू नये आणि अपयशाची कसर भरून काढावी, ही तुमची इच्छा गुरु आणि मंगळाच्या अनुकूल भ्रमणामुळे सफल होईल. 
धंदा, व्यवसाय व नोकरी.... 
धंदा, व्यवसाय व नोकरी.... व्यापार-उद्योगात आपल्या हातून काय चूक झाली याचा परामर्श घ्या. त्यातून तुम्हाला बरेच शिकायला मिळेल. फेब्रुवारीनंतर एखाद्या प्रोजेक्टमध्ये अडकून राहिलेले पैसे मिळायला सुरुवात होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यवसाय, धंद्यातील नवीन घडामोडी नवीन वर्षात तुमची निराश दूर करेल. यश सहज नसेल, पण प्रयत्नांची पराकाष्ठा केलीत तर त्यातूनच चांगला मार्ग निघू शकेल. सध्याच्या धंद्यात जानेवारी ते मे 2017 नंतर प्रगतीचा मार्ग खुला होईल. जुलै , ऑगस्ट, सप्टेंबर यादरम्यान चांगले पैसे आणि काम मिळेल. येत्या वर्षांत फार मोठी कर्जे घेऊ नका, नाहीतर मिळालेल्या पैशाचा आनंद मिळणार नाही. हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. मोठे प्रोजेक्ट शक्यतो टाळा. नोकरीमध्ये झालेली गैरसोय आणि गळचेपी कमी होईल. मुंगीच्या पावलाने जरी प्रगती झाली तरी वाईट वाटून घेऊ नका. जून 2017 नंतर पूर्वीच्या अपयशाची कसर भरून काढाल. बढती किंवा पदोन्नतीचे रेंगाळलेले स्वप्न साकार होईल. येत्या वर्षांत बढतीऐवजी पगारवाढीत समाधान मानावे लागेल.
 गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान... घरामध्ये एखादी मोठी समस्याने तुम्ही अडचणीत असाल तर त्यातून सुटका व्हायला सुरुवात होईल. फेब्रुवारीनंतर तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या पद्धतीने जीवन जगू शकाल. जुनी प्रॉपर्टी विकणे किंवा नवीन खरेदी करणे अशा गोष्टींना जून ते सप्टेंबर या दरम्यान मुहूर्त लाभेल. नातेवाइकांशी संबंध बिनसले असतील ते आता हळूहळू पूर्ववत होतील. कौटुंबिक जीवनातील अनेक ताणतणाव कमी होतील. प्रकृतीचे प्रश्न असल्यास त्यावर उपाय मिळेल. जानेवारी ते जून 2017 दरम्यान पुन्हा एकदा थोडाफार तणाव राहील. जूनपासून पुढील दिवाळीपर्यंत अनेक प्रश्नांतून मुक्तता होऊन तुम्ही सहजीनवाचा आनंद घ्याल, प्रकृतीबाबत बेसावध राहू नका. 
तरुणांची सत्त्वपरीक्षा पाहणारे वर्ष आहे. त्यांनी घाबरून न जाता येणाऱ्या समस्यांना तोंड द्यावे, त्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या प्रमाणात यश मिळेल. महिलांना प्रत्येक प्रश्न सोडवायला खंबीरपणे उभे राहावे लागेल. कलाकार, खेळाडू व राजकारणी व्यक्तींवर स्पर्धकांमुळे टांगती तलवार असेल.
सर्व पहा

नवीन

पुत्रदा एकादशी 2025: पुत्रदा एकादशीचे व्रत करण्याचे 4 फायदे जाणून घ्या

Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीचे व्रत कधी पाळावे, त्याचे महत्त्व जाणून घ्या

Hanumanji Mangalwar Upay मंगळवारी हनुमानजीची अशी पूजा करा, सर्व अडथळे दूर होतील

आरती मंगळवारची

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख
Show comments