Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धनू राशीच्या जातकांचे 2017 मधील वार्षिक राशिभविष्यफल

Webdunia
धनू राशीच्या व्यक्तींना साडेसाती चालू आहे, 2016 सालाच्या सुरुवातीपासून राश्याधिपती गुरुने तुम्हाला उत्तम साथ दिली, पण बराच काळ व्ययस्थानात असलेल्या मंगळाने तुमची गैरसोय केली. तुमचा काहीही दोष नसताना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागले. नवीन वर्षांत साडेसातीचा मध्यभाग सुरू होणार आहे. ज्या चुका तुम्ही पूर्वी केल्या होत्या त्याची तुम्हाला जाणीव होईल. आता तुमचे धोरण तुम्हाला लवचीक ठेवावे लागेल. गुरुची साथ असल्याने ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ असा पवित्रा ठेवा. आता आपले काय होणार, अशी भीती तुमच्यापैकी अनेक जणांच्या मनामध्ये आहे, पण नवीन वर्षात गुरुसारखा अधिपती ग्रह तुम्हाला साथ देणार आहे. तसेच मंगळही अनुकूल आहे. त्यामुळे निश्‍चिंत मनाने काम करा. स्वत:हून कुठल्याही जबाबदार्‍या आणि खर्च वाढणार आहेत याची खबरदारी घ्या. संयम नि सहानं यातून या वर्षाचा प्रवास सुखदायक कराल.  
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... नोकरीमध्ये जसे तुमचे कष्ट तसे त्याचे फळ मिळेल. तुमच्या नेतृत्वगुणांना भरपूर वाव मिळेल. नोकरदार व्यक्तींना वरिष्ठांच्या बऱ्याच अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. शक्यतो नोकरीमध्ये बदल करू नका. नाईलाज झाला तर फेब्रुवारी किंवा जूनमध्ये असे बदल करा. येत्या वर्षांत प्रमोशन देण्याचे वरिष्ठ आश्वासन देतील. पण अचानक घडणाऱ्या घडामोडींमुळे त्याची तहान पगारवाढीवर भागवावी लागेल. काहीजणांना परदेशी जाण्याची संधी मिळेल, पण त्यातून म्हणावा इतका आर्थिक फायदा मिळणार नाही. गृहसौख्याच्या दृष्टीने नवीन वर्ष थोडेसे खडतर आहे. तुम्हाला तुमच्या इच्छांवर मुरड घालावी लागेल. व्यापारातील किंवा नोकरीच्या कामाच्या निमित्ताने कदाचित घरापासून लांब राहावे लागेल. नवीन नोकरीच्या निमित्ताने किंवा सध्याच्या नोकरीतील कामानिमित्ताने परदेशात बर्‍याच वेळा फेरफटका करता येईल.
गृहसौख्य व आरोग्यमान... 
गृहसौख्य व आरोग्यमान... पूर्वी ठरलेला एखादा शुभ कार्यक्रम नोव्हेंबर-डिसेंबर किंवा जूनच्या सुमारास पार पडेल. नवीन जागा घेण्यापूर्वी आर्थिक बाबींचा विचार करा. या वर्षांत तुमचे खरे हितचिंतक कोण आहे याची परीक्षा होईल. तरुण मंडळींनी येत्या वर्षांत प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवावे. गृहसौख्याच्या दृष्टीने भरभराटीचे वर्ष आहे. अनेक मनोकामना पूर्ण होतील स्थिरतेवर लक्ष केंद्रित करावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात शॉर्टकट घेऊन चालणार नाही. महिलांना प्रिय व्यक्तींच्या बाबतीत नवीन आणि विचित्र अनुभव येईल. तरुणांचे विवाह जमतील व संपन्न होतील. घरातील लहान मोठ्या व्यक्तींच्या जीवनातील सुखद प्रसंग साजरा होईल. विद्यार्थी कलाकार आणि खेळाडूंना त्यांच्या क्षेत्रात चांगल्या कामगिरीबद्दल मानसन्मान मिळेल. वृद्ध व्यक्तींना प्रकृतीची चांगली साथ मिळेल. 

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments