Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कसे राहतील 2017मध्ये तुमचे प्रेम संबंध?

Webdunia
सोमवार, 2 जानेवारी 2017 (16:37 IST)
जर वर्ष 2017मध्ये लग्न करणार असाल किंवा प्रेमाच्या शोधात असाल तर तुमच्या लव्ह लाईफबद्दल येथे मिळेल तुम्हाला संपूर्ण माहिती. 2017मध्ये वैवाहिक जीवनात थोडी खटपट किंवा जोडीदाराचा पूर्ण सहयोग मिळेल की नाही ते जाणून घ्या. नवीन वर्षात ग्रहांची दशा तुमच्या लव्ह लाईफमध्ये काय चांगले बदल आणणार आहे जाणून घ्या.  
 
मेष राशी : 2017 वर्ष मेष राशीच्या जातकांसाठी सप्तमेशाचे उच्चाभिलाषी असल्यामुळे दांपत्य जीवनात बढती, विवाह इत्यादी कार्यांमध्ये प्रगती होईल. मेष राशीच्या लोकांचे नवीन नाते किंवा प्रेम संबंध स्थापित होऊ शकतात. पण मंगळ सोबत असल्यामुळे संबंधांमध्ये विकृत रूप देखील समोर येऊ शकतात. किंवा त्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. म्हणून मंगळ आणि राहूच्या शांतीचे उपाय केल्याने त्याचे उत्तम परिणाम समोर येऊ शकतात.  
 
वृषभ राशी : वृषभ राशीच्या लोकांच्यासाठी हे नवीन वर्ष प्रेम संबंधांच्या दृष्टीने सामान्य राहणार आहे. सप्तमवर शनीचे असणे आणि मंगळावर राहूची दृष्टी वर्षाच्या सुरुवातीत दांपत्य सुखात बर्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. नवरा बायकोत विवादाची स्थिती देखील उत्पन्न होऊ शकते. नवीन संबंधांमध्ये देखील नवीन वर्षाच्या सुरुवातीत अडचणी येऊ शकतात पण मार्चनंतर तणावात कमी येईल आणि संबंधांमध्ये सुधारणा येईल तसेच नवीन नाते देखी बनतील.
मिथुन राशी : मिथुन राशीच्या जातकांसाठी हे नवीन वर्ष फारच उत्तम जाणार आहे, नवीन संबंध बनतील. विवाह योग्य लोकांसाठी हे वर्ष सर्वात चांगले जाणार आहे. अविवाहित लोकांसाठी देखील हे वर्ष उत्तम राहणार आहे नवीन संबंध बनण्याचे प्रबळ योग आहे. जुन्या संबंधांमध्ये आपुलकी वाढेल.  तुम्ही स्वभावाने फारच रोमँटिक आहात.  हे वर्ष तुम्हाला असा कुठला ही मोका देणार नाही ज्याने तुम्हाला काळजीत पडावे लागणार आहे.  
 
कर्क राशी : कर्क राशीच्या जातकांसाठी हे नवीन वर्ष नवीन नात्याला जन्म देणारे ठरणार आहे. नवीन प्रेम संबंध स्थापित होऊ शकतात, वर्षाच्या सुरुवातीत सप्तमेशचे पंचम भावात विद्यमान असल्याने नवीन नात्याची सुरुवात होऊ शकते. पण जुने नाते देखील परत येण्याची शक्यता आहे. प्रेम-संबंधांच्या बाबतीत हे वर्ष फारच अनुकूल आहे. तुम्ही तुमच्या वयापेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकता.  
 
सिंह राशी : सिंह राशिच्या जातकांसाठी हे वर्ष दांपत्याच्या बाबतीत थोडे अवरोधकारक राहणार आहे. आपसातील संबंधांमध्ये टकराव, पती-पत्नीत मतभेद, नवीन   वैवाहिक संबंध स्थापित झाल्याने थोडे त्रास होण्याची शक्यता आहे. ऑगस्टमध्ये राहूच्या राशी परिवर्तनामुळे स्थितीत थोडी सुधारणा येईल. प्रेम-संबंध वैवाहिक संबंधात बदल होऊ शकतो.  
कन्या राशी : कन्या राशीच्या जातकांसाठी हे वर्ष प्रेम संबंधांसाठी समाधानकारक राहणार आहे. नवीन संबंध बनू शकतात. अविवाहित लोकांसाठी हे वर्ष उत्साहकारक राहणार आहे. मार्चनंतर सकारात्मक वातावरण राहील. ऑगस्टनंतर राहूच्या परिवर्तनामुळे विवाहाची स्थिती अधिक मजबूत होईल  प्रेम संबंधांसाठी हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम साबीत होणार आहे. जर तुम्ही एखाद्या नवीन नात्याची सुरुवात करणार असाल तर हे वर्ष तुमच्यासाठी सर्वात उत्तम जाणार आहे.  
 
तूळ राशी : तुला राशीच्या जातकांसाठी हे वर्ष थोडे त्रासदायक पण यशस्वीरीत्या पार पडणार आहे. सुरुवातीत राहूमुळे थोडा त्रास जाणवेल, पण ऑगस्टनंतर प्रगती होईल. प्रेम संबंधांमध्ये देखील सुरुवातीत अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या वर्षी प्रेमाच्या बाबतीत तुम्ही अपयशी ठरणार आहे. या वर्षी तुम्हाला प्रेम-संबंधांचे सुख मिळणार नाही. अविवाहितांसाठी हे वर्ष लाभकारी नाही आहे.  
 
वृश्चिक राशी : वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हे वर्ष तणावपूर्ण राहणार आहे. शनीचे धनू राशीत संचरणझाल्याने तणावात थोडी कमतरता येईल पण परत वृश्चिक राशीत आल्यानंतर अवरोध प्रारंभ होईल. शनी आणि राहूचा उपचार लाभप्रद ठरेल. प्रेम-संबंधांच्या बाबतीत हे वर्ष प्रसन्नतादायक आहे. ऑगस्टच्या आधी आपल्या प्रेम संबंधांना समजून घेण्यासाठी एक मेकनं समजून घेण्याची गरज आहे आणि आपसातील सामंजस्य ठेवून कुठले ही कार्य करायला पाहिजे. 
धनू राशी : धनू राशीच्या लोकांसाठी हे वर्ष वैवाहिक प्रकरणात प्रगतिकारक ठरणार आहे. मनाप्रमाणे जोडीदार निवड करण्याची संधी मिळणार आहे. तसेच प्रेम संबंधांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. शनीचा धनू राशीचा संचारणं थोडा अवरोधक राहू शकतो पण नंतर सर्व काही ठीक होईल. ऑगस्टनंतर तुमच्या जीवनात भरपूर प्रेम मिळणार आहे.  
 
मकर राशी : मकर राशीवाले प्रेम संबंध किंवा वैवाहिक संबंधांबद्दल फार उत्साहित आणि यशस्वी राहणार आहे. जोडीदाराचा सहयोग मिळेल. या राशीच्या लोकांचे प्रेम संबंध स्थापित होऊ शकतात. जुने प्रेम संबंध परत अस्तित्वात येण्याची शक्यता आहे पण राहूचे ऑगस्ट नंतर अवरोध उत्पन्न करण्याची शक्यता आहे. काही लोक थोडे रोमँटिक होऊ शकतात आणि आपल्या आवडीच्या लोकांशी भेटू शकता. मकर, कुंभच्या लोकांसोबत मिसळून राहिले तर उत्तम.  
कुंभ राशी : कुंभ राशीच्या लोकांसाठी हे वर्ष सम परिणाम देणारा ठरणार आहे. राहूमुळे ऑगस्टपर्यंत संबंधांमध्ये सुधारणा येण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे, वैवाहिक संबंधांसाठी देखील हा काळ असहयोगी साबीत ठरेल पण ऑगस्टनंतर प्रगती होईल. या वर्षी प्रेम-संबंध सामान्य राहणार आहे. व्यस्ततेमुळे प्रेमासाठी जास्त वेळ राहणार नाही. जर तुम्ही कुणासोबत आधीपासून डेट करत असाल तर स्थितीत काही जास्त बदल येणार नाही.  
 
मीन राशी : मीन राशीच्या ज्या लोकांचे वय झाल्यानंतर देखील लग्न झालेले नाही त्यांच्यासाठी हे वर्ष फारच सुखद जाणार आहे. वर्षाच्या सुरुवातीत सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे पण शेवटच्या टप्पा थोडा त्रासदायक ठरणार आहे. ऑगस्टच्या दुसर्‍या टप्प्यापर्यंत तुम्ही एखाद्या खास व्यक्तीवर प्रेम प्रकट करू नका. असेही शक्य आहे की गैरसमजामुळे त्या व्यक्तीबद्दल तुमची धारणा बदलू शकते.  
संपूर्ण 12 राश्यांचे 2017तील भविष्यफल

शनिवारची आरती

संकष्टी चतुर्थी : संकष्टी चतुर्थीला ही 9 कामे करू नये

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

Shani Dev: शनिवारी या 5 शक्तिशाली मंत्राचा करा जप, शनिदेवांचा मिळेल आशीर्वाद

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments