Marathi Biodata Maker

तूळ राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल

Webdunia
तूळ राशीच्या जातकांना 2018 या वर्षाच्या सुरुवातीत गुरू आणि तृतीय स्थानामधला शनी हे दोन मोठे ग्रह विशेष अनुकूल आहेत त्यामुळे नवीन वर्षात काहीतरी सनसनाटी व चांगले घडावे अशी तुमची अपेक्षा असेल तर काही चूक नाही. इतरही ग्रहांची साथ मिळणार असल्याने ज्या गोष्टी तुम्ही मनाशी ठरवाल त्यात यश मिळेल. तेव्हा तुमचे प्रयत्न वाढवा. व्ययस्थानातल्या गुरुमुळे ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला निराश आली होती त्या गोष्टीमध्ये काहीतरी सकारात्मक घडल्यामुळे तुम्ही अधिक उत्साही बनाल. मात्र मे महिन्यानंतर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये काही मोठे बदल होतील. शब्दांवर नियंत्रण ठेवा कारण त्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाण्याची शक्यता आहे.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... 
कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण राहील आणि तुमच्या कल्पना आकार घेतील आणि तुम्ही तुमच्यासाठी अनुकूल गोष्टी करून घ्याल. आळस टाळावा. तुमचे सहकारी तटस्थ असतील. त्यामुळे तुम्ही स्वत:च्या क्षमतांवर विसंबून असावे. जानेवारी ते मार्चदरम्यान तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तुमच्या मेहनतीमुळे नवे उपक्रम राबविले जातील. जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये तुम्ही जे काम कराल त्यातून बाजारपेठेतील प्रतिमा उंचावेल. नोकरदार व्यक्तींना पूर्वी वरिष्ठांनी काही आश्वासन दिले असेल, तर त्याप्रमाणे पगारवाढ किंवा बढती मिळण्याचे योग संभवतात. बेकार व्यक्तींना काम मिळाल्यामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. एप्रिलच्या सुमारास तुमच्या संस्थेत बदलाचे वारे वाहू लागतील. चांगल्या नोकरीकरता परदेशी जाऊ इच्छिणार्‍यांना सप्टेंबरनंतरचा काळ विशेष चांगला आहे. विद्यार्थी मेहनत करतील आणि त्यांना त्यांच्या 
कष्टांचे फळही मिळेल. एकूण पाहता, हे तुमच्यासाठी प्रगतिशील वर्ष असेल. तुम्ही उत्पन्नाचे मार्ग वाढविण्यावर लक्ष केंद्रित करावे.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान.... 
गृहसौख्य व आरोग्यमान... 
कौटुंबिक आणि वैवाहिक आयुष्यात आनंद मिळविण्यासाठी त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. जानेवारी ते मार्च महिन्यांदरम्यान तुमच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू राहतील. कौटुंबिक आयुष्यात तुम्ही आनंदी आणि समाधानी नसाल कारण तुमच्यात अलिप्ततेची भावना असेल आणि तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना पुरेसा वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे तुमचे काहीसे दुर्लक्ष होईल. जुनी प्रॉपर्टी विकून नवीन जागेमध्ये स्थलांतर करण्याचे योग एप्रिल ते पुढील दिवाळीपर्यंत संभवतात. तरुणांपुढे करायचा की परेदेशाची संधी घ्यायची असा विचार पडेल.विवाह कमी अंतराचे आणि काही परदेशातील प्रवासही संभवतात. मुले सुखात असतील आणि आयुष्यातील आनंद उपभोगतील. मार्च महिन्यानंतर वैवाहिक आयुष्यात सुधारणा होईल. प्रकृतीच्या दृष्टीने नवीन वर्ष जरे अनुकूल असले तरी एप्रिल, मे आणि ऑक्टोबर महिन्यात थोडा त्रास संभवतो.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Markandeya Jayanti 2026 मार्कंडेय जयंती निमित्त शिवभक्त मार्कंडेय ऋषी आणि यमराज यांची प्रसिद्ध कथा

तुळशीला सिंदूर लावल्यास काय होते?

Vasant Panchami Naivedyam देवी सरस्वतीला कोणते पदार्थ आवडतात

Ratha Saptami 2026 : रथ सप्तमी कधी? शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या

Ganesh Jayanti 2026: गणेश जयंती २०२६ कधी आहे? मुहूर्त, पूजा विधी आणि हा नैवेद्य खास

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

पुढील लेख
Show comments