Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कन्या राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल

Webdunia
कन्या राशीच्या 2018 या वर्षाच्या राशिभविष्यानुसार येत्या वर्षात धनस्थानातील गुरू आणि चतुर्थस्थानातील शनी तुम्हाला दोन वेगवेगळ्या आघाड्यांवरती व्यस्त ठेवणार आहे. नवीन वर्षात व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनाची घडी योग्य प्रकारे बसविण्याची मोठी जबाबदारी तुम्हाला पार पाडावी लागेल. या वर्षातील हे तुमच्यापुढील सर्वात मोठे आणि महत्त्वाचे उद्दिष्ट असेल. एकंदरीत यशाविषयी थोडी चिंता असेल. या सगळ्यामुळे तुम्हाला स्वत:च्या स्वास्थ्याकडे लक्ष देता येणार नाही. मात्र वातावरणाची चांगली साथ मिळाल्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा हुरूप वाटेल. 
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... 
या वर्षात तुम्ही अनेक ध्येय गाठणार आहात. विविध प्रकारच्या संधींच्या माध्यमातून तुम्हाला चांगले आर्थिक परिणाम पाहायला मिळतील. तुमचे सामाजिक वर्तुळ अत्यंत सक्रिय असेल आणि तुमचे समाजातील स्थानही उंचावेल. तुम्हाला व्यावसायिक आयुष्यात समाधान लाभेल. तुमच्या उपक्रमांना यश लाभेल. फार काळापासून असलेली इच्छा पूर्ण होईल. वर्षभर उत्पन्नाची आवक चांगली राहील. जानेवारी महिन्यात अनपेक्षित लाभ संभवतो. ऑक्टोबर महिन्यानंतर या वृद्धीमध्ये अजून भर पडेल. नोकरदार व्यक्तींना थोडेसे गैरसोयीचे वर्ष आहे. जास्त काम करून जास्त पैसे मिळविण्याची तुमची नेहमीच अभिलाषा असते. ती पूर्ण करण्याची तुमची जबरदस्त इच्छा या वर्षात जागृत होईल. पण त्याच्याकरता कदाचित तुम्हाला कौटुंबिक सुखात कमतरता सहन करावी लागेल.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान....
गृहसौख्य व आरोग्यमान...  
कामाच्या निमित्ताने किंवा व्यावसायिक निमित्ताने तुम्हाला तुमच्या कुटुंबापासून काही काळ लांब राहावे लागेल. घरात एखादे पवित्र कार्य पार पडेल. घरात नवी भर पडण्याचीही शक्यता आहे. एकुणात, सर्व बाजूंनी हे वर्ष तुमच्यासाठी लाभकारक असेल. तुम्ही कौटुंबिक जीवनात शांतता राखणे आणि भांडण टाळणे आवश्यक आहे. तुम्ही मित्र आणि आप्तेष्टांसोबत चांगला काळ व्यतीत कराल. मुलांमध्ये एकाग्रतेची कमतरता जाणवेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या माध्यमातून लाभ होईल पण ऑक्टोबर महिन्यानंतर त्याच्यातील/तिच्यातील ऊर्जा कमी असेल किंवा आरोग्याच्या बाबतीत काही गुंतागुंत निर्माण होऊ शकते. पण तुम्हाला त्यांच्याकडून पूर्ण पाठिंबा मिळेल.तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे कारण आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवू शकतात आणि त्यामुळे थोडा चिडचिडेपणा येऊ शकतो. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांनाही दिव्यातून जावे लागेल. कला, क्रीडा, राजकारण इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींनी प्रयत्नांवर जोर देणे आवश्यक राहील.

संबंधित माहिती

शनिवारची आरती

संकष्टी चतुर्थी : संकष्टी चतुर्थीला ही 9 कामे करू नये

शनी दोषांपासून मुक्तीसाठी प्रभावी मंत्र

Shani Dev: शनिवारी या 5 शक्तिशाली मंत्राचा करा जप, शनिदेवांचा मिळेल आशीर्वाद

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments