Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक राशीफल 15 ते 21 ऑक्टोबर 2018

Webdunia
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018 (16:53 IST)
मेष : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल व आर्थिक अस्थिरता निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक गुंतवणूक काळजीपूर्वक करणे चांगले ठरेल व होणारे नुकसान टळू शकेल. शांतता प्रस्थापित राहील. अंतिम चरणात पराक्रम अगर क्रीडा क्षेत्रातील नवनवीन डावपेचाचे केलेले प्रयोग यशस्वी ठरतील. बक्षीसपात्र स्थिती कायम राहून इतरांचे सहकार्य वेळेवर मिळेल व यश समोर दिसेल.
 
वृषभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक समाधान लाभेल व मनावर असलेले काळजीचे सावट मिटेल. महत्त्वपूर्ण कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल व सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. अंतिम चरणात आर्थिक चढ-उतार स्थिती राहील. आर्थिक क्षेत्रातील बहुतेक अंदाज चुकतील. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी भावी काळात होणार्‍या परिणामाचा अंदाज घेणे उचित.
 
मिथुन : सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च वाढेल. कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल. भावी काळात होणारा मनस्ताप टळेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी अनुकूल राहील व मनाला दिलासा मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. सर्वत्र परिस्थिती थोडी समाधानकारक स्थितीत राहून यश मिळण्यात प्रारंभ होऊ शकेल.
 
कर्क : सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक स्थिती मजबूत राहील व आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. इतरांकडून येणे असलेला पैसा वेळेवर हाती येईल. अचानक धनलाभ योग संभवतो त्यामुळे लॉटरीवगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. अंतिम चरणात परिस्थिती प्रतिकूल आहे. त्यामुळे दगदग व त्रास वाढेल. जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयम ठेवणेच उचित ठरू शकेल.
 
सिंह : सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील घडामोडी अनुकूल लाभाच्या ठरतील व व्यवसाय क्षेत्र सुरळीतपणाच्या मार्गावर राहील. जवळचा प्रवास योग जुळून प्रवास कार्यसाधकच ठरेल. काळजीचे सावट काही प्रमाणात दूर होऊन उत्साह वाढीस लागेल. अंतिम चरणात सर्व क्षेत्रात यश मिळेल व अपयशाचा सामना सहसा करावा लागणार नाही. अपेक्षेप्रमाणे यश मिळवून देणारी ग्रहस्थिती अनुकूल आहे.  
 
कन्या : सप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक यात्रायोग घडेल व सर्व क्षेत्रात नशिबाची साथ पाठीमागे राहील. नियोजित कामे ठरविलेल्या वेळेवर पूर्ण होऊन उत्साह वाढीस लागेल व यशाचा मार्ग खुलाच राहील. अंतिम चरणात नोकरीत बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत मिळतील. नवीन नोकरीसाठी होणारी मुलाखत भावी काळाच्या दृष्टीने आशा पल्लवीत करणारी ठरेल व सर्व समस्यांपासून मुक्तता होण्याची दाट शक्यता आहे.
 
तूळ : सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचेच ठरेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच उचित ठरेल. अंतिम चरणात महत्त्वपूर्ण कामासाठी तातडीचा प्रवास योग जुळून येईल व प्रवास कार्यसाधक ठरेल. मानसिक आनंद वाढविणारे समाचार हाती येऊन मनावरील काळजीचे सावट मिटेल.
 
वृश्चिक : सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून विशेष करून लाभ घडेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील. नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार जरूर जरूर करावा भावी काळासाठी लाभप्रद ठरेल. अंतिम चरणात विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागेल व यश मिळविण्यासाठी केलेले अथक परिश्रम वाया जातील. दगदग व त्रास निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे.
 
धनू : सप्ताहाच्या प्रथम चरणात आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील. विशेष करून जुन्या आरोग्याच्या व्याधी दूर होण्याच्या मार्गी राहतील. इतरांचे सहकार्य वेळेवर मिळेल व कोणतेही काम सहसा अपूर्ण स्थितीत राहणार नाही. अंतिम चरणात भागीदारीत असणारा वाद मिटण्याच्या मार्गावर राहील व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त राहील. आपले सहकार्य इतरांच्या बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिद्ध होऊन मानसिक आनंद वाढीस लागू शकेल.
 
मकर : सप्ताहाच्या प्रथम चरणात स्पर्धा परीक्षेसह सर्व प्रकारच्या परीक्षेमध्ये यश मिळवून देणारी आजची ग्रहस्थिती आहे. संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येतील. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे चांगले दूरध्वनी येऊन उत्साह वाढेल. अंतिम चरणात विरोधक मंडळींचा ससेमिरा व त्रास कमी होऊन विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करतील. दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी चांगली घटना घडून येऊ शकेल.
 
कुंभ : सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारिक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील व पारिवारिक सदस्य मंडळींबरोबर असणारे मतभेद मिटतील. परिस्थिती पूर्वपदावर येऊन उत्साह वाढीस लागेल. अपूर्ण व स्थगित व्यवहार सुरळीत होतील. अंतिम चरणात कार्य सभोतालीन परिस्थिती चांगली राहील व कार्यक्षेत्रात आपला शब्द अंतिम प्रमाण स्वरूप मानला जाईल. कोणतेही काम विना विलंब पूर्ण होण्याच्या मार्गी राहील.
 
मीन : सप्ताहाच्या प्रथम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात वर्चस्व वाढेल व सहकारीवर्ग मनोनुकूलरीत्या सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवूनच वाटचाल करतील. नेत्रदीपक यश दृष्टिक्षेपात राहून यश मिळेल. अंतिम चरणात पारिवारिक आनंद वाढविणारे समाचारपत्र हाती येईल. कौटुंबिक सदस्य मनोनुकूलरीत्या सहकार्य करतील. मानसिक आनंद वाढून मनावर असलेले काळजीचे सावट व दडपण दूर होऊन शांतता प्रस्थापित राहील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

शुक्रवारी ह्या वस्तू दान केल्याने सर्व समस्या नाहीश्या होतात

आरती शुक्रवारची

Sri Ramdas Navami 2025 दास नवमी कशी साजरी करतात?

सर्व पहा

नक्की वाचा

Makeup Tricks : हिवाळ्यात तुमची लिपस्टिक आणि आयलायनर कोरडे झाले आहेत का? या टिप्स वापरा

मुलांमध्ये खोकला कमी करण्यासाठी हे ५ घरगुती उपाय वापरून पहा

Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम

अकबर-बिरबलची कहाणी : चोराच्या दाढीतला एक ठिपका

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

पुढील लेख
Show comments