Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सिंह राशी भविष्यफल 2019

Leo Yearly Rashifal 2019
Webdunia
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (15:21 IST)
सिंह राशीच्या 2019 सालच्या भविष्यानुसार सुरुवातीला शनि – धनु राशि, गुरु – वृश्चिक राशि आणि राहु 6 मार्च, 2019 मध्ये मिथुन राशित असेल. तर केतु धनु राशि, गुरु राशि परिवर्तन करून 30 मार्चला धनु राशि आणि 25 एप्रिलला वृश्चिक राशित गोचर करून 5 नोव्हेंबर ला परत धनु राशित गोचर करेल. हे 10 एप्रिलला वक्री होवून शनि 30 एप्रिलला वक्री होवून 18 सप्टेम्बरला मार्गी होतील. सौख्यकारक गुरुचे चतुर्थातील भ्रमण, इतर शुभ ग्रहाची लाभणारी अनुकूलता हे सर्व ग्रहमान असे सुचवते, की येणारे वर्ष तुमच्यादृष्टिने संमिश्र फळ देणारे आहे.  
 
कौटुंबिक जीवन
सुख अनुभवण्याची इच्छा मनामध्ये तीव्र असेल, पण कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागल्याने ताला फारसा वाव मिळणार नाही. कौटुंबिक जीवनात भावनिक चढउतारांचे नवीन वर्ष आहे. शनिच्या कुदृष्टि मुळे तुमच्या मार्गात अडचणी उत्पन्न होतील. कौटुंबिक जीवना वर देखील याचा असर पाहायला मिळेल. तुमच्या साठी ही कठीण वेळ आहे. वेळो वेळी तुम्हाला लोकां बरोबर तसेच आपल्या वस्तुना सांभाळण्याची गरज आहे. खर्च, आरोग्या बाबत त्रास होतील आणि शेजाऱ्यान मुळे देखील त्रास सोसावे लागतील.
 
आरोग्य
या वर्षात तुमचे आरोग्य उत्तम राहील. या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये तुम्हाला सर्दी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला शारीरिक थकवा येईल आणि अशक्तपणा जाणवेल. परंतु फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून तुमची प्रकृती सामान्य होईल. पाय, खांदा, नसा, आणि  ह्रदया बाबत त्रास होण्याची संभावना आहे. त्या मुळे तुम्ही परेशान होऊ शक्ताल. मार्च महिन्या नंतर आणि मे 2019 च्या आगोदर जास्त पैशे सांभाळून ठेवावेत. चांगली औषध आणि व्‍यायाम जरूर करावा. ज्येष्ठांना प्रकृतीची साथ मिळेल.
 
करियर
तुमच्या करिअरमध्ये यश मिळविण्यासाठी तुम्ही खूप कष्ट कराल. करिअरचा विचार करता तुम्हाला यशाची चव चाखायला मिळेल पण या यशाने तुमचे समाधान होणार नाही. राहुची दशा आणि राहुच्या नक्षत्रात दशा स्‍वामी असेल तर तुम्हाला आपल्या करियर मध्ये तेजीन सफळता मिळेल. पंचम भाव तुमच्या करियर मध्ये अडचणी उत्‍पन्‍न करू शकेल. वर्तमानात सध्या असणारी नोकरी सोडावी लागू शकेल किंवा आपल्या कामात बदलाव 
करावा लागू शकेल. नोकरीत तणाव वाढेल. कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्तींना वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही दाखविलेल्या चिकाटीमुळे तुमची एक नवी ओळख निर्माण होईल. तुम्हाला नव्या कार्यालयात काम करण्याची संधी मिळेल. 2019 च्या सुरुवातीच्या काळात तुमच्या करिअरच्या दृष्टीने चांगले परिणाम पाहायला मिळतील. या वर्षात तुमच्या आर्थिक परिस्थितीबाबत तुरळक आव्हाने तुमच्या समोर येतील, पण तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील. तुमची आर्थिक बाजू बळकट असेल. जानेवारी वगळता फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यात तुमचे कदाचित आर्थिक नुकसान होऊ शकते.
 
व्यवसाय
व्‍यापार करण्यासाठी जास्त चांगली वेळ नाही. तुम्हाला आपल्या मनाप्रमाणे आपल्या कष्टाच फळ मिळणार नाही. तुमच्या मुळे तुमच्या प्रतिद्वंदिला चांगला फायदा होणार आहे. प्रतिस्पर्धी मुळे तुम्हाला पैशाच नुकसान होणार आहे. कुठला चुकीचा निर्णय घेतल्यामुळे त्याचा पस्तावा तुम्हाला नंतर होईल. व्यापार उद्योगात नवीन वर्षाची सुरुवात फारशी उत्साहवर्धक नसेल, बराच काळ चालू असलेल्या कामाची पद्ध बदलावी लागणार असेच 
एकंदरीत चित्र असेल. परंतु पैशाअभावी एप्रिल मे पर्यंत त्यात लक्ष घालता येणार नाही. एप्रिल ते जुलै या दरम्यान नवीन कामाची मुहूर्तमेढ रोवली जाईल. त्यातून काहीतरी चांगले निष्पन्न होण्याची खात्री जुलैपासून वाटू लागेल.

रोमांस
2019 च्या ग्रहस्थितीनुसार तुमच्या प्रेमजीवनात आव्हाने निर्माण होतील. त्यामुळे तुम्ही काकणभर अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या जोडीदाराशी वाद होण्याची किंवा गैरसमज होऊन नात्यात कडूपणा येण्याची शक्यता आहे. या वर्षी तुमची लव लाइफ खूप उत्तम राहणार आहे. मार्च महिन्या नंतर थोडे सावध राहण्याची गरज आहे कारण या नंतर तुम्हा दोघां मध्ये गैरसमज आणि अत्याधिक रागाची भावना उत्पन्न होण्याची 
संभावना आहे. प्रिय व्यक्तींचा सहवास जून जुलैपर्यंत मिळेल. तरुणांनी येत्या वर्षात विवाहाची घाई न करता विचारपूर्वक निर्णय घ्यावा.

उपाय
दिवसातून दोन वेळा आपल्या कुळ दैवताची आराधना करावी एवढे करणे तुमच्या साठी लाभकारी आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येला हे ५ शास्त्रीय उपाय करा; पूर्वज नेहमीच आनंदी राहतील

Friday Remedies: शुक्रवारी या 4 गोष्टी करा, लक्ष्मीची विशेष कृपा मिळवा

शांत खोऱ्यात वसलेले मंदिर जिथे देवी पार्वतीने भगवान गणेशला द्वारपाल बनवले होते

Mahalaxmi Pujan on Friday महालक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी करा हे 4 उपाय

आरती शुक्रवारची

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

पुढील लेख