rashifal-2026

वृषभ राशी भविष्यफल 2019

Webdunia
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018 (15:34 IST)
वृषभ राशीच्या 2019 सालच्या भविष्यानुसार वर्षभर गुरुचे सप्तमस्थानातील भ्रमर तुम्हाला अनुकूल हे. गुरु – वृश्चिक राशित आणि राहु 6 मार्च, 2019 ला मिथुन राशित राहणार आहे तिथे केतु धनु राशि व गुरु राशि परिवर्तन करून 30 मार्चला धनु राशित व नंतर परत 25 अप्रैलला वृश्चिक राशित गोचर करून 5 नोव्हेंबरला परत धनु राशित गोचर करणार आहे. हे 10 एप्रिलला वक्री होवून 11 ऑगस्टला मार्गी होईल. शनि 30 एप्रिलला वक्री होवून 18 सप्टेम्बरला मार्गी होईल. बुधाचा वार्षिक प्रवास मुलांच्या शैक्षणिक जीवनाला उजाळा देणारा ठरेल. 
 
कौटुंबिक जीवन
कौटुंबिक सुखात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. विशेषत: राहूचे पाठबळ अडचणी बाजूला सारील. मार्च पर्यंत कौटुंबिक जीवन सामान्‍य असेल. या नंतर राहूच्या राशी परिवर्तना नंतर अडचणींचा सामना करावा लागू शकेल. कुटुंबातील लोकांच्यात मतभेद उत्‍पन्‍न झाल्यामुळे तणाव वाढतील. तुमचा स्वभाव थोडा चिडखोर होईल. तुम्ही आपल्या द्वारे होणाऱ्या चुकांची जबाबदारी दुसऱ्यान वर थोपाल. घरात कोणा बरोबर तरी खूप मोठ्या प्रमाणात 
भांडण होण्याची प्रबळ संभावना आहे.
 
आरोग्य
तुमची प्रकृती काहीशी अशक्त राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वर्षात तुम्ही तुमच्या आरोग्याची काकणभर अधिक काळजी घेतली पाहिजे. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर विशेष लक्ष ठेवा. पोषक आहार घ्या. 2019 सालच्या भविष्यानुसार तुम्हाला या वर्षी एखादा गंभीर आजार होण्याची शक्यता आहे.
 
करियर 
या वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. करिअरमध्ये चढ-उतार होऊ शकेल आणि तुम्हाला चांगले परिणाम साधण्यासाठी खूप मेहेनत करावी लागेल. बुधाचा वार्षिक प्रवास मुलांच्या शैक्षणिक जीवनाला उजाळा देणारा ठरेल. मात्र मंगळ-बुध केंद्रयोगातून मुलांना आळस, सतत टीव्ही पाहाणे, मोबाइलवर खेळणे या पासून दूर ठेवा. या वर्षात तुम्ही तुमच्या करिअरबाबत अधिक गंभीर असाल आणि तुमच्या करिअरमध्ये एक निश्चित टप्पा गाठण्यासाठी तुम्ही मेहेनत कराल. महिलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात बरीच मागणी राहील. कलाकार आणि खेळाडूंनी स्वत:चे कौशल्या वाढविल्यास त्यांचे नैपुण्य प्रदर्शित करता येईल. 
 
व्यवसाय
आर्थिक बाजू नेहमीपेक्षा अधिक चांगली असेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल, पण त्याचबरोबर तुमचे खर्चही वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवले नाही तर तुमची आर्थिक परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. असे असले तरी या वर्षात तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. 2019 च्या राशीभविष्यानुसार उत्पन्नाचे नवे मार्ग तयार होतील. उद्योगधंद्यामुळे घरी वेळ देता येणार नाही. कला, नाट्य 
सिनेक्षेत्रातील लोकांना गैरसमज, निंदानालस्तींना समोरे जावे लागेल. जुलै-ऑगस्टनंतर कामानिमित्त देशात अथवा परदेशात प्रवास करण्याचा योग येईल. प्रत्यक्ष पगारवाढीपेक्षा इतर सुविधा मिळाल्यामुळे वर्ष चांगले जाईल. नोकदार व्यक्तींना येत्या वर्षात त्यांच्या मनाप्रमाणे काम करण्याची संधी मिळेल. 
 
रोमांस
या वर्षी कुठले नवीन नाते जुळू शकेल. लपून छपून कोणाच्या प्रेमात पडू शकता. विवाहित लोकांच्या मनात या सारख्या संभावना जास्त आहेत. जीवनसाथी असून ही घरा बाहेर अन्य कोणा बरोबर शारीरिक संबंध स्थापित होऊ शकतील. सांसारिक जीवनात मात्र थोडीशी कमतरता जाणवेल. पूर्वी ठरलेला विवाह जूनंतर पार पडतील. 

उपाय
हनुमान चाळीसा वाचावी आणि नेहमी सकारात्‍मक बनून राहावे. दररोज रामाच्या देवळात जावून प्रार्थना करावी. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Ratha Saptami 2026 Wishes in Marathi रथसप्तमी शुभेच्छा मराठी

Bhanu Saptami 2026 रविवारी भानुसप्तमी, 4 राजयोग, या 3 राशीच्या जातकांसाठी शुभ

Narmada Aarti in Marathi नर्मदा आरती मराठीत

Narmada Jayanti 2026: नर्मदा जयंती तिथी, पूजा विधी, कथा आणि संपूर्ण माहिती

Ratha Saptami 2026 रथ सप्तमी बद्दल संपूर्ण माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

पुढील लेख
Show comments