rashifal-2026

डिसेंबर 2020तील मासिक राशीफल

Webdunia
सोमवार, 30 नोव्हेंबर 2020 (17:34 IST)
मेष : लहान-मोठया समस्या बाजूला सारल्या तर वेळ तुमच्यासोबत आहे. सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठा वाढेल. १५ तारखेनंतर कुटुंबीयांसोबत वाद होऊ शकतो. इतरांची बाजू नीट ऐकूनच कोणताही निर्णय द्या. कामासाठी घरापासून दूर जाल. कायदेशीर बाबी सांभाळा. उत्तरार्धात खरेदी विक्री वाढेल. संपत्ती लाभ, वारसा लाभ संभवतो. शारीरिक तक्रारीकडे लक्ष द्या. धंद्याकडे दुर्लक्ष करू नका. शिक्षणात अडचणी येतील. नवा व्यवसाय सुरू करताना मित्रांची मदत घेतल्याने फायदा होईल. स्त्रियांसाठी खूप चांगली वेळ आहे. अपत्यप्राप्तीचा सुखद योग आहे. 
 
वृषभ : या महिन्यात धनप्राप्तीचे आकस्मिक योग जुळून येत आहेत. पोटदुखी जाणवेल. प्रवास घडेल. उत्तरार्धात वरिष्टांची गैरमर्जी होऊ शकेल. हौसमौज कराल. दागिने घ्याल. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. जर आपल्या डोक्यावर कर्ज असेल तर या महिन्यात ते फेडून टाकण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. जी कामं केवळ डोक्यातच कल्पनेच्या स्वरूपात होती ती आता वास्तवात उतरण्याची शक्यता आहे. ही आपल्या यशोगाथेतील एक मोठी झेप ठरेल. 
 
मिथुन : कामात यश मिळेल. वाहन आणि मालमत्तेची खरेदी वगैरे तुमच्यासाठी फारच फ़ायदेशीर ठरेल. अर्धवट आणि अडलेल्या कामांना गती येईल. आरोग्याप्रती बेपर्वाई तुम्हाला महागात पडू शकते. धर्माप्रती आवड वाढेल. मित्रांची मदत मिळेल. लक्षात असू द्या, क्रोध सगळ्यात आधी तुमचे नुकसान करतो, म्हणून रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात संशय घातक ठरू शकतो. या विषयावर जोडीदारासोबत चर्चा करून तोडगा काढा. उत्तरार्धात प्रवास घडेल. पोटदुखी जाणवेल. जवळच्या व्यक्तींना दुरावू नका. विवाह जुळतील. नवीन रोजगार मिळेल. कलाक्षेत्रात चमकाल. कुटुंबाची जबाबदारी घ्याल. 
 
कर्क : प्रेमासाठी अनुकूल वेळ आहे. महिना अखेरीस चांगली बातमी कळू शकेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. विदेशातही जाऊ शकता. काहीतरी नवे घडणारच आहे. मिळकतीचे नवे पर्याय उपलब्ध होतील. प्रॉपर्टीत गुंतवणुक करणे फायद्याचे ठरेल. तुमच्या अपत्याला तुमचा वेळ हवा आहे, हे ध्यानात असू द्या. मनाची कुचंबणा होईल. उत्तरार्धात संघर्षातून यश मिळेल. वैवाहिक जीवनात त्रास संभवतो. अतिआ‍त्मविश्वास राहील. 
 
सिंह : वैवाहिक जीवन तुमचे सहकार्य आणि वेळ मागत आहे. घरगृहस्थीची चिंता राहील. कुटुंबाला आधार द्याल. उत्तरार्धात शिक्षणात अडचणी येतील. संततीला त्रास संभवतो. सुवर्णालांकारांची खरेदी कराल. मानसिक उन्नती होईल. मित्रासोबत नवा व्यवसाय सुरू केल्यास कालांतराने लाभ होईल. वेळेचे महत्त्व ओळखा. तुम्ही जरा व्यावहारिक झाले पाहिजे, अति भावनिकता तुमचे नुकसान करू शकेल. वडिलांचे स्वास्थ्य तुम्हाला काळजीत पाडेल.
 
कन्या : जीवनात नवा रंग भरण्याची वेळ आली आहे. कामे यशस्वी होतील. कुटुंबात मनमानी कराल. विवाह जुळतील. जुन्या गोष्टी विसरून मार्गक्रमण करा. वातावरणाचा आनंद लुटा. शैक्षणिक कार्यात खर्च होईल. जोडीदाराचे वागणे तुमच्यासाठी साहाय्यकारी सिद्ध होईल. या महिन्यात तुमच्यासाठी सर्वकाही सामान्य राहील. नव्या लोकांच्या ओळखी होतील, ज्या पुढे लाभदायक ठरतील. नोकरीसाठी एखाद्या नव्या शहरात जाऊ शकता. अड्कलेले धन परत मिळेल. जोडीदार तुमच्यासाठी पर्वतासमान सिद्ध होईल. 
 
तूळ : काम वेळेत पूर्ण होतील. योजना पूर्ण होतील. १५ तारखेनंतर कोणत्याही नव्या कामाची सुरुवात करा. आर्थिक प्राप्ती जेमतेम राहील. संघर्षातून यश मिळेल. निवडणुकीत यश मिळेल. परदेशगमन घडेल. महत्वाकांक्षी रहाल. बॉस तुमच्या कामावर युश होईल. सहकर्मचारी सहाय्य करतील. कलाक्षेत्राशी संबंधित लोकांसाठी ही चांगली वेळ आहे. स्वास्थ चांगले राहिल. नवे घर किंवा वाहन खरेदी करू शकता. कर वगैरे सारख्या कायदेशीर बावींपासून सुटका मिळू शकते. आडत्यांसाठी वेळ चांगली आहे.
 
वृश्चिक : संघर्षानेच यशप्राप्ती होईल. धंद्यात चैतन्य आणाल. स्वभाव खर्चिक बनेल. आर्थिक लाभ होतील. विपरीत बुद्धी होईल. अचानक कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचू नका. तुमच्या या घाईगडबडीचा फायदा तुमचे विरोधक घेऊ शकतील. शांत राहून चांगले कर्म करत राहा. मांसाहार आणि मद्यसेवन टाळणे ठीक होईल. महिन्याच्या शेवटच्या आठवडयात परिस्थिती बदलायचा सुरूवात होईल. वर्षाचा शेवट सकारात्मकतेने होईल.
 
धनू : या महिन्यात ग्रह तुमच्यासोबत आहेत. मोठे खर्च निघतील. नेत्रविकार जाणवेल. उत्तरार्धात नवीन कल्पना सूचतील. अधिकार मिळतील. विवाह जुळेल. बिघडलेली कामे होतील. आप्त-स्वकीयांमध्ये लग्नाचे आयोजन होऊ शकेल. वेळेचा योग्य वापर करायला शिका. प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोनेरी वेळ आहे. लक्ष्य निर्धारीत करून मेहनतीने ते प्राप्त करण्यासाठी झटा, यश नक्की मिळेल.
 
मकर : यश आपली वाट पाहत आहे, बस योग्य संधी ओळखा. थोरांचा सहवास लाभेल. लोकांकडून कौतुक होईल. आर्थिक लाभ होतील. उत्तरार्धात मोठे खर्च निघतील. नेत्रविकार जाणवेल. नैतिकता पाळा. कोर्ट-कचेरीपासून सुटका मिळेल. प्रेम-संबंध दृढ होतील. एखाद्याला दिलेले वचन जरूर पाळा. कायदेशीर अडचणींवर तोडगा मिळेल. राजनैतिक संबंधांचा फायदा होऊ शकतो. जोडीदाराचे पूर्ण साहाय्य प्राप्त होईल. 
 
कुंभ : मिळकतीचे स्त्रोत वाढू शकतात. स्पर्धापरिक्षांमध्ये यश मिळू शकते. या दरम्यान तुम्ही उंच झेप घेऊ शकता, पण कठोर परिश्रमांना तयार असाल तरच तुमच्या सकारात्मक उर्जेचा स्त्रोत निरंतर टिकेल. नोकरीत बढती मिळेल. खरेदी विक्री वाढेल. मित्रांची मदत मिळेल. व्यापार-संबंधित लोकांना नुकसान होऊ शकते. असे झाले तरी तुम्हाला वरिष्ठ लोकांचे आणि कुटुंबातील मोठयांचे भरपूर साहाय्य मिळेल. नकोसे खर्चही वाढू शकतात. 
 
मीन : या महिन्यात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात घरापासून दूर जावे लागेल. कायद्याची शिकार बनाल. आवश्यक ते परवाने मिळतील. घरगृहस्थीत समस्या जाणवतील. आर्थिक बाजू बळकट राहील. नव्या खरेदीसाठी ही वेळ अनुकूल आहे. नवे लाभदायक संबंध प्रस्थापित होतील. धार्मिक कार्यात रूची वाढेल. वैवाहिक जीवन कडू-गोड राहील. विध्यार्थी वर्गाला अधिक मेहनत करण्याची आवश्यकता आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

Sant Tukaram Maharaj Jayanti 2026 जगद्गुरू संत तुकाराम महाराज जयंती विशेष

Saraswati Sangeet Aarti सरस्वतीची संगीत आरती

श्री गणेश जन्मकथा पुराणातून: प्रत्येक कथा एक रहस्य, वाचा संपूर्ण माहिती

माघी गणेश जयंती निमित्त बाप्पाला अर्पण करण्यासाठी पारंपारिक आणि खास पाककृती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

पुढील लेख