Marathi Biodata Maker

साप्ताहिक राशीफल 24 ते 31 मे 2020

Webdunia
रविवार, 24 मे 2020 (07:03 IST)
Astrology Weekly 2020
मेष : हा आठवडा आधीच्या आठवड्यासारखाच जाणार आहे. आत्मविश्वास, उत्साह कमी झाल्या सारखे वाटेल. महत्त्वांच्या कामांचे नियोजन करावे लागेल. कोणावर चटकण विश्वास ठेवू नका. घात होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक कामात पारदर्शकता ठेवावी लागेल. प्रलोभन टाळा. प्रकृतीची काळजी घ्या.  
 
वृषभ : केसाने गळा कापला जाईल, याचा प्रत्यय येईल. स्वभावात चिडचिडपणा वाढेल. विनाकारण भीती, चिंता जाणवेल. ज्यांना मदत केली त्यांच्याकडूनच नुकसान संभवते. सावधगिरीने पावले उचलावे लागतील. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यसनी मित्रापासून सावध रहा. जुने आजार समोर येतील. कुटूंबात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. 
 
मिथुन : कुटूंबाकडून पुढील वाटचालीसाठी पाठबळ मिळणार आहे. महत्त्वपूर्ण कामे मार्गी लागतील.  प्रगतीचा वेग वाढेल. शुभकार्यात सहभाग राहील. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. व्यापार- व्यवसायात यश मिळेल. आर्थिक योग उत्तम. इच्छेप्रमाणे खरेदी करू शकाल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.  
 
कर्क : आनंददायी घटना घडतील. मानसिक आनंद राहिल. पेंडिंग कामे मार्गी लागतील. आरोग्यविषयक चिंता राहतील. आळस झटकावा लागेल. उत्तरार्धात मात्र सावध रहावे लागेल. व्यापार- व्यसायात भागीदारी गोत्यात येईल. आर्थिक योग साधारण. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. 
 
सिंह : तुमच्यासाठी संमिश्र काळ आहे. सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवावे लागेल. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्यावे लागेल.  अतिआवश्यक निर्णय तडकाफडकी घेवू नका. वेळ मागून घ्या. विरोधकांवर लक्ष ठेवावे लागेल. वैयक्तिक पातळीवर निर्णय घ्यावा लागेल. आवक मध्यम राहिल. 
 
कन्या : या आठवड्यात विश्वासाने पावले टाका. आर्थिक व्यवहार बिघडणार नाही‍त याची काळजी घ्या. स्वत:ची कामे स्वत: करा कोणावर विसंबून राहू नका. महात्त्वाची कामे पेंडिंग ठेवा. जोखीम घेऊ नका. विरोधक सक्रिय होतील. 
 
तूळ : आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. दूर्लक्ष करू नका. आळस हा शुत्रू आहे. याचा प्रत्यय येईल. अचानक समस्या निर्माण झाल्याने भीती जाणवेल. परंतु गुरूचे पाठबळ असल्याने मार्ग निघेल. वाहन, मशीनरीपासून अपघात संभवतो. कुटुंबात वाद होणार नाहीत याची काळजी घ्या.
 
वृश्‍चिक : प्रगतीचा आलेख उंचावणार आहे. महत्त्वाच्या जबाबदार्‍या पूर्ण कराल. मित्रमंडळीकडून सहकार्य लाभेल. नवीन परिचय फायदेशीर ठरेल. व्यापार व्यवसायात यश मिळेल. परिश्रमाचे चीज होईल. आर्थिक योग उत्तम राहील. नोकरीत प्रमोशन संभवते. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. 
 
धनू : पूर्वी केलेल्या परिश्रमाचे फळ या आठवड्यात मिळणार आहे. शुभ समाचार कळतील. कार्यक्षमतेचा उपयोग करू शकाल. वैयक्तीक पातळीवर निर्णय घ्यावे लागतील. नोकरीत कामाची प्रशंसा होणार आहे. संधीचे सोने कराल. आर्थिक योग उत्तम. अचानक लाभ होणार आहे. मनाप्रमाणे खरेदी करू शकाल.
 
मकर : आरोग्यविषयक समस्या दूर होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आपआपसातील मतभेद मिटतील. नोकरीच्या ठिकाणी अनुभवाचा उपयोग करून घ्याल. व्यवसायातील अडचणी दूर होतील. आवकनुसार खर्च करता येईल.
 
कुंभ : या काळात तुम्हाला जीभेवर साखर ठेवावी लागणार आहे. लहान लहान गोष्टीवरून विचलीत होऊ नका. सयंम बाळगा. नवीन योजनांची संधी मिळेल. मि‍त्रमंडळी व कुटुंबातील सदस्याकडून सहकार्य मिळेल. उत्तरार्धात मात्र तनाव वाढल्याचे जाणवेल. कामकाजात मन रमणार नाही. 
 
मीन : नवीन वातावरण तुमच्या पथ्यात राहील. मात्र सावधगिरी महत्त्वाची राहील. विनाकारण चिंता वाढेल. व्यापार- व्यवसायातील कामे पेंडिंग राहतील. भागीदारी धोक्यात येईल. आर्थिक व्यवहार बिघडणार नाहीत याची काळजी घ्या. नोकरीत विरोधक अडसर ठरतील. अधिकारीवर्गाशी वाद घालू नका. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Ganpati Stotra Marathi श्री गणपती स्तोत्र

पुत्रदा एकादशी 2025: पुत्रदा एकादशीचे व्रत करण्याचे 4 फायदे जाणून घ्या

Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीचे व्रत कधी पाळावे, त्याचे महत्त्व जाणून घ्या

Hanumanji Mangalwar Upay मंगळवारी हनुमानजीची अशी पूजा करा, सर्व अडथळे दूर होतील

आरती मंगळवारची

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख
Show comments