Dharma Sangrah

साप्ताहिक राशीफल 26 जुलै ते 1 ऑगस्ट 2020

Webdunia
शनिवार, 25 जुलै 2020 (20:57 IST)
मेष : आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडा निराशाजनक राहणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीत आर्थिक प्रकरणात काळजी राहील. आरोग्याच्या बाबतीत संबंधी संपूर्ण आठवडा उत्तम राहणार आहे. तुम्ही तुमचा व्यवसाय बदल करण्याचा मन बनवू शकता. त्याशिवाय तुम्ही तुमच्या व्यवसायाला विस्तृत करण्यासाठी नवीन उप कार्यालय किंवा स्टोअर उघडू शकता. विद्यार्थी वर्गासाठी हा आठवडा अनुकूल आहे.
 
वृषभ :  तुमच्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा फारच अनुकूल आहे. संपूर्ण आठवडा धन येणार आहे. व्यवसायी व नोकरी करणार्‍या लोकांना स्वत:चे कार्य संपादनासाठी भरपूर संधी मिळण्याची शक्यता आहे. जमीन, घर व स्थायी मालमत्तेशी निगडित कार्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. जर तुमची एखाद्या व्यवहाराची बोलणी सुरू असेल तर त्यात तुम्हाला सकारात्मक फळ मिळण्याची शक्यता आहे.
 
मिथुन : या आठवड्याची सुरुवात आर्थिक बाबींसाठी फारच महत्त्वपूर्ण आहे. या आठवड्यात तुमच्या उत्पन्नाचे बरेच स्रोत राहणार आहे, पण अनायस होणार्‍या खर्चांची शक्यता आपण नाकारू शकणार नाही. या आठवड्यात तुमचा समाजात मान सन्मान वाढणार आहे. कौटुंबात देखील तुम्हाला फारच महत्त्व मिळेल. या आठवड्यात कुठल्याही प्रकारचा दु:साहस करू नका.
 
कर्क : या आठवड्याच्या सुरुवातीत तुम्ही स्वास्थ्य आणि आर्थिक पक्षामुळे काळजीत पडाल. या आठवड्यात तुम्ही तुमच्या व्यवसायाकडे जास्त लक्ष देऊ शकणार नाही. तुमचे विश्वासपात्र अधिकारी आणि कर्मचारी तुमच्या गैर हजेरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. गणेशजींचा सल्ला आहे की या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. कुठल्याही प्रकारच्या शारीरिक तक्रारीचे लगेचच आरोग्य चाचणी करून त्याचे समाधान करावे. 
 
सिंह : या आठवड्याच्या सुरुवातीत पारिवारिक वातावरण आनंदाचे ठेवणे तुमच्यासाठी फार जास्त गरजेचे आहे. त्याशिवाय प्रत्येक बाबतीत समजुतदारी आणि समाधानाचे धोरण ठेवावे लागणार आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या वाणीत विनम्रता आणि स्पष्टता आणावे लागणार आहे अन्यथा संबंधांमध्ये मतभेद होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आईच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
 
कन्या : या आठवड्यात तुम्हाला मानसिक सुख आणि दुःख दोघांचा अनुभव होणार आहे. व्यक्तिगत आणि व्यावसायिक गरजेना पूर्ण करण्यासाठी तुम्ही नवीन वस्तूची खरेदी करण्याचे मन बनवाल. पण त्याचा जास्त आनंद तुम्हाला घेता येणार नाही. व्यवसायात तुम्हाला सरकारी कारणांमुळे काही अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. तुम्ही मानसिक रूपेण अस्वस्थ व्हाल. या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्या.
 
तूळ : या आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी थोडी निराशाजनक राहण्याची शक्यता आहे. पारिवारिक वातावरणात तणाव, शारीरिक तंदुरस्तीची काळजी, कर्ज फेडण्यासाठी दबाव, विरोधी सक्रिय होतील, नोकरीत बदली इत्यादी कारणांमुळे मन व्याकुल होईल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या स्थितीत सुधारणा येईल. जमीन, घर व स्थायी मालमत्ता विक्री केल्यामुळे धन लाभ होईल.  गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणे फारच आवश्यक आहे.
 
वृश्चिक : आठवड्याच्या सुरुवातीत भाग्याचा साथ मिळेल आणि तुम्ही प्रत्येक क्षेत्रात विकास कराल. तुमच्या सर्व आशा अपेक्षा पूर्ण होण्याचा आठवडा आहे. संपूर्ण आठवडा धन मिळाल्यामुळे तुम्ही प्रसन्न राहाल. या वेळेस तुमच्या हातात जेवढे ही काम असतील ते पूर्ण होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यास यशस्वी ठराल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळवाल.
 
धनू : आठवड्याच्या सुरुवातीत तुम्हाला आर्थिक लाभ झाल्याने तुम्ही आनंद अनुभवाल. या वेळेस तुम्हाला आधी केलेल्या गुंतवणुकीमुळे फायदा मिळेल किंवा जर कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे, खास करून ते धन जे मिळण्याची उमेद तुम्ही सोडली असेल. या काळात लांबणीवर गेलेले काम पूर्ण होतील आणि काही बाबींचे समाधान निघतील.
 
मकर : हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत उत्तम राहणार आहे पण आरोग्याच्या बाबतीत थोडे चढ उतार लक्षात येईल त्याची काळजी घ्या. व्यवसायी व नोकरी करणार्‍या लोकांना पैसा कमावण्याची बरीच संधी मिळण्याची शक्यता आहे. स्वतंत्र कार्य करणार्‍या लोकांना लहान सहानं कार्य मिळत राहणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुमचे आरोग्य अतिउत्तम राहणार आहे.
 
कुंभ : या आठवड्यात तुम्हाला दूरच्या पल्ल्याचा प्रवास करावा लागणार आहे अथवा मनोरंजनावर जास्त वेळ घालवायला मिळणार आहे. लग्न समारंभ किंवा सामाजिक प्रसंगांमध्ये जाण्याचा योग तयार होत आहे. मित्र किंवा परिचितांसोबत तुम्ही फिरायला जाऊ शकता. त्यामुळे तुमचे मन आनंदाने भरून जाईल. प्रवासादरम्यान लहान सहानं अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
 
मीन : या आठवड्याच्या सुरुवातीत तुम्हाला बचतीवर जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. म्हणून गणेशजींचा सल्ला आहे की तुम्हाला या आठवड्यात व्यर्थ खर्चांवर अंकुश लावणे गरजेचे आहे. जर तुम्ही यात अपयशी ठरल्यास तर तुमचे महत्त्वाचे काम धना अभावामुळे बिघडू शकतात. व्यवसायात गुंतवणूक मुळे तुमचा हात तंग राहील. त्यामुळे घरांत उत्साहाचे वातावरण होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Paush Purnima 2026 पौष पौर्णिमा कधी ? हा शुभ दिवस स्नान आणि दानधर्मात घालवा, पूजा पद्धत आणि शुभ वेळ जाणून घ्या

Makar Sankranti Special Tilgul Poli Recipe मकर संक्रांतीला चटकन तयार करा गुळाची पोळी

स्मार्त आणि भागवत एकादशीमधला भेद जाणून घ्या

भागवत एकादशी व्रताचे महत्त्व

बुधवारी इच्छा पूर्ण करण्यासाठी करा गणपतीची पूजा!

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

पुढील लेख
Show comments