Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साप्ताहिक राशीफल 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2020

Webdunia
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (16:53 IST)
मेष: आठवड्याची सुरवात तुमच्यासाठी फारच सुखद ठरणार आहे. तुमचे सर्व स्वप्न या आठवड्यात साकार होणार आहे, असे संकेत दिसून येत आहे. समाज आणि सार्वजनिक जीवनात तुमचा प्रभुत्व वाढणार आहे. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत लांबच्या पल्ल्याचा प्रवास कराल. आपला जोडीदार किंवा प्रिय व्यक्ती त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्यावर दबाव आणू शकतो. घरगुती बाबतीत अधीरता टाळा. यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यापार व्यवसायात वेळ साधारण राहील. देवाण-घेवाण टाळा. व्यवसायात शत्रुपक्ष तुमच्यावर वर्चस्व साधण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही तुमच्या उत्पादनाच्या गुणवत्तेत कुठल्याही प्रकारचा करार करू नये. व्यवसायात व्यस्ततेमुळे तुम्ही कुटुंबाला पूर्ण वेळ देऊ शकणार नाही. या वेळेस शासकीय विभागाकडून तुम्हाला व्यवसाय संबंधी नोटिस मिळू शकतो. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. 

वृषभ : या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुम्हाला मानसिक संतुलित ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर तुमची मानसिक बेचैनी आणि तुमचा राग या दोन्ही गोष्टींमुळे तुमच्या घराचे वातावरण बिघडू शकतात. गणेशजींचा सल्ला आहे की तुम्हाला तुमच्या वाणीवर संयम ठेवणे फारच आवश्यक आहे. आर्थिक स्थितीत निरंतर चढ उतार बघावे लागणार आहे. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. करदारांनी कामात लक्ष द्यावे. अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. जमीन, घर, वाहन, दागिने व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीचा योग आहे. कंपनीशी निगडित कार्यांसाठी तुम्हाला विदेश यात्रा करण्याचा योग आहे. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. शत्रूंपासून सावध राहा. वडिलांचे आरोग्य तुमचे काळजीचे कारण बनू शकतं. वर्तमान काळात बायकोच्या नावावर केलेली गुंतवणुकीमुळे तुम्हाला लाभ मिळणार आहे.  

मिथुन : हा आठवडा तुमच्यासाठी फारच उत्तम राहणार आहे. या आठवड्यात तुम्हाला नशिबाचा साथ मिळणार आहे. कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हसित होईल. मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. समाजात प्रतिष्ठित पद मिळू शकतो. सामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरदार कामात व्यस्त राहतील. स्त्री पक्षाचा आधार राहील. व्यवसायात भागीदार किंवा खास मित्राची मदत मिळेल. व्यावसायिक आणि वैयक्तिक कारणांमुळे तुम्हाला विदेश यात्रा घडू शकते. ज्या लोकांना विवाह करायचा असेल त्यांच्यासाठी हा काळ फारच उत्तम ठरणार आहे. आई वडिलांचे आरोग्य उत्तम असल्यामुळे तुमच्या मनाला बरं वाटेल. तुम्ही जन कल्याणाच्या कार्यांमध्ये तुमचे सहकार्य द्याल. त्याने तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. 

कर्क : या आठवड्याची सुरुवात आर्थिक दृष्टीने फारच महत्त्वाची असेल. व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल. विशिष्ट व्यक्तींचा संपर्क सुखद वाटेल. वरिष्ठांकडून सहयोग मिळेल. स्त्री पक्षाची स्थिती संतोषजनक राहील. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहणे आवश्यक. शत्रूंपासून सावध राहा. कृषी, जमीन, घर, सोने चांदी, फर्निचर, कपडे, कागद, मशीनरी, हॉटेल आणि रेस्टोरेंट इत्यादी व्यवसायाशी निगडित लोकांना या आठवड्यात भरपूर धन लाभ होणार आहे. जे लोकं उच्च शिक्षा प्राप्त करत आहे, त्यांच्यासाठी हा आठवडा फारच शुभ संकेत देत आहे. विरासत मालमत्ता, गुप्तधन लाभ मिळाल्याने तुम्ही आर्थिक विषयांवर अधिक सशक्त बनाल. या आठवड्यात तुमची भेट एखाद्या प्रभावी व्यक्तीशी होऊ शकते. जी भविष्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल.

सिंह : या आठवड्याच्या सुरुवातीत तुम्ही थोडे अस्वस्थ व्हाल. शांत राहण्याचा प्रयत्न करा. पोरकटपणा करणे टाळा. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. आपण जे करण्याची इच्छा ठेवता ते सुरुवातीपासून ठरवून घ्या. पैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्मसंयमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल. महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे लागेल. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. या आठवड्यात कुठल्याही प्रकारचा नवीन धैर्य दाखवू नका. शेअर बाजार, कमिशन, दलाली इत्यादी कार्यांमध्ये आंशिक लाभ मिळण्याची उमेद तुम्ही ठेवू शकता. द्रवपदार्थांच्या व्यवसायात विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. 2 आणि 3 तारखे दरम्यान तुम्हाला आर्थिक फायदा मिळण्याची शक्यता आहे, पण या आठवड्यात तुम्हाला आर्थिक बाबतीत समजूतदारीने पुढे चालावे लागणार आहे.

कन्या : आर्थिक बाबींसाठी हा आठवडा फारच उत्तम आहे. अपेक्षित व्यक्तींचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना अनुकूल वातावरण मिळेल. राजकारणी व्यक्तींना उद्देशात यश मिळेल. महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील. राजकीय व्यक्तींना काळ अनुकूल आहे. कौटुंबिक सुख वाढेल. वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. शत्रू पराभूत होतील. 3 आणि 4 तारखेला वित्तीय प्रकरणात सावधगिरी बाळगणे फारच आवश्यक आहे, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा वेळ अनुकूल असून त्यांच्यात एकाग्रता वाढेल आणि त्यांचे मन अभ्यासत लागेल. इंजिनियरिंग, रिसर्च आणि उच्च शिक्षण घेत असलेल्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. काही प्रेमपूर्ण अनुभव यंदा येऊ शकतात. हा वेळ आपण आपल्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. आपल्या सर्जनशील व कलात्मक वैशिष्ट्यांना प्रेरणा मिळेल. आई वडिलांचे आरोग्य उत्तम असल्यामुळे तुमची काळजी कमी होईल. 

तूळ : तुमच्यासाठी हा आठवडा फारच सकारात्मक आहे. तुम्ही एखादे नवीन कार्य करू शकता. या आठवड्यात तुमचे अडकलेले काम पूर्ण होतील. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. मित्रांपासून, सहकाऱ्यांपासून लाभ मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल. दृष्टिकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. शेअर बाजार, कमिशन आणि बँकिंग क्षेत्राशी निगडित लोकांना प्रगतीसाठी नवीन संधी मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील. 4 आणि 5  तारखे दरम्यान आर्थिक घेवाण देवाणीच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. भावनेच्या भरात वाहून नुकसान होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखादा प्रवास घडण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या जातकांना वाणी आणि आपल्या व्यवहारावर विशेष लक्ष्य द्यावे लागणार आहे, आणि स्वतः:वर संयम ठेवणे फारच गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत देखील हा आठवडा फारसा उत्तम नाही आहे, म्हणून वायफळ खर्च करणे टाळावे. काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. न्यायालयीन प्रकरणात अडकू शकता त्यासाठी खबरदारी घ्या. कामाचा भार अधिक राहील. महत्त्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. दूरचा प्रवास टाळा. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. परदेशवारी करणार्‍यांसाठी हा आठवडा फारच उत्तम आहे.  

धनू : या आठवड्याच्या सुरुवातीत तुम्ही मानसिक ताण तणावापासून मुक्त व्हाल. बर्‍याच काळापासून अडकलेले प्रकरण अचानक संपुष्टात आल्याने तुम्हाला थोडा धीर मिळेल. व्यापार-व्यावसायिकांना दिवस संमिश्र. स्थायी मालमत्तेत तुम्ही या आठवड्यात गुंतवणूक करू शकाल. तुम्ही सुख सुविधांच्या वस्तूंची खरेदी कराल. भाऊ बहिणींच्या नात्यात आधीच्या तुलनेत गोडवा येण्याची शक्यता आहे. करियरसंदर्भातील नवी संधी मिळण्याची शक्यता. त्यामुळे घरांत उत्साहाचे वातावरण होईल. ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. आपल्या कार्य-योजनेसाठी आणि सहकार्‍यांबरोबर आपल्या संबंधांसाठी विधायक ठरेल. अधिक चांगली कामाची स्थिती आणि सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी चांगली वेळ आहे. ज्यांच्याबरोबर आपणास वेळ घालवणे आवडते त्यांना वेळ द्या. आरोग्याच्या बाबतीत डोळे किंवा तोंडातील आजार होण्याची शक्यता आहे. पाईल्सचा त्रास होण्याची शक्यता आहे.  

मकर : स्थगित व्यवहार गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या मार्गी राहतील. सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहू शकेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल आहे. त्यामुळे यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम वाढवावे लागतील. इतरांवर अधिक विश्वासून राहणे अहितकारक ठरण्याची दाट शक्यता आहे. 4 आणि 5 तारखेला उत्तम लाभ मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष्य द्यावे लागणार आहे. कुटुंब किंवा समाजाकडून एखादी दुःखद बातमी मिळू शकते. या आठवड्यात तुम्ही सर्व प्रकाराच्या वाद विवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरेसारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही.

कुंभ : आठवड्याच्या सुरुवातीत तुम्ही नवीन काही करायचे की नाही ह्या द्विधामनस्थितीत राहणार आहे. भाऊ बहिणींबरोबर तुमचे संबंध अनुकूल राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात सर्वांची मदत मिळणार आहे. कर्म स्थळावर सूर्य भ्रमण करत असल्यामुळे नोकरी करणार्‍या लोकांचे त्यांच्या बॉसशी संबंध उत्तम राहणार आहे. शासकीय कार्यात यश मिळेल. जमीन, घर व स्थावर मालमत्ता खरेदी करताना जास्त गोंधळून जाऊ नका. या आठवड्यात तुम्हाला परदेश किंवा एखाद्या दूर जागेवर जाण्याचा योग आहे. आई किंवा कुटुंबातील एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी तुमचा मन अशांत करू शकते, म्हणून त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या आठवड्यात तुमचे वैवाहिक जीवन उत्तम असेल. या आठवड्यात प्रेम प्रकरण सुरू असलेल्या लोकांना थोडी सावधगिरी बाळगणे पाहिजे.

मीन : आठवड्याच्या सुरुवातीत तुमचा उत्साह कायम राहणार आहे. 12व्या स्थानात असलेला मंगळ आणि शुक्राची युती होत असल्यामुळे तुम्ही विपरीत लिंगप्रती आकर्षित व्हाल. जर शक्य असल्यास स्वतः:च्या भावनांवर काबू ठेवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतः:च्या मजा मस्तीत धन खर्च कराल. आठवड्याच्या सुरुवातीत तुम्ही कौटुंबिक बाबींवर तुम्ही जास्त लक्ष्य देऊ शकणार नाही. महिला जातकांशी तुमचे संबंध या आठवड्यात चांगले राहणार असून त्याचा तुम्हाला फायदाही मिळणार आहे. प्रेम प्रकरणात दोघांसाठी हा आठवडा चांगला आहे. या आठवड्यात तुम्हाला देश किंवा परदेशातील यात्रा घडू शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे गरजेचे. जे लोक मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये कार्यरत आहे, त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Surya Dev Mantra रविवारी सूर्यदेवाच्या 10 शक्तिशाली मंत्रांचा जप करा, जीवनातील सर्व समस्या नाहीश्या होतील

श्री सूर्याची आरती

आरती शनिवारची

शनिवारी हे 5 मंत्र जपा, शनीची कृपादृष्टी मिळवा

Lakshmi Puja शुक्रवारी लक्ष्मीजींना करा प्रसन्न, पैशाची कमतरता दूर होईल, सुख-समृद्धी येईल

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments