Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'हेमलकसा'च्या वाटेवर ....

बाबांच्या कार्यात मुलांचेही योगदान

मनोज पोलादे
MH GovtMH GOVT

मुरलीधर देविदासपंत आमटे उपाख्य बाबांनी घेतलेला वसा प्रकाश व विकास या त्यांच्या मुलांनीही समर्थपणे सांभाळला आहे. आधुनिक युगातील विकास व प्रगतीपासून कोसो दूर असलेल्या दुर्गम भागात आदिवासी व समाजाने बहिष्कृत केलेल्या कुष्ठरोग्यांच्या जीवनात आत्मसन्मान जागवण्यासाठी हेमलकसा, आनंदवन येथील प्रकल्पातून त्यांनी अतुलनीय कार्य केले.

बाबांना सामाजिक उत्थानाच्या कार्यात साधनाताईंनी शेवटपर्यंत साथ दिली. प्रकाश व विकास हे बंधूही यास अपवाद ठरले नाहीत. मंदा व भारती या त्यांच्या जीवनसाथींनी त्यांच्या कार्यास स्वत:स वाहून घेताना कार्यास बळ दिले. बाबांनी दुबळे, अशिक्षित, मागास आदिवासींमध्ये आरोग्य, शिक्षणाबाबत जागृती निर्माण करून त्यांना सन्मानाने जगवणे शिकवण्यासाठी हेमलकसा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली.

गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील हेमलकशाची जबाबदारी सांभाळली ती प्रकाश व त्यांची सहचारणी मंदा आमटे यांनी. बाबांचे प्रकाशपासून त्यांच्या नातवंडापर्यंत संपूर्ण कुटुंबीयंच डॉक्टर. प्रकाश यांनी वैद्यकशास्त्रात उच्चविद्याविभूषित झाल्यानंतर बड्या पगाराच्या नोकरीचा मोह टाळून आपल्या ज्ञानाचा उपयोग तळागाळातील लोकांसाठी करत हेमलकशात नंदनवन फुलवले.

आश्रमशाळा उघडून शिक्षणाचा ज्ञानदिप पोहचवला. दवाखाना उघडून अंधश्रद्धेच्या जोघडात अडकलेल्या आदिवासींमध्ये आरोग्यविषटक जागृती घडवून आणली. शेतीतंत्राचा विस्तार करून लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून शिकारीवर अवलंबून असलेल्या माडियांना अन्नधान्यदृष्ट्या स्वावलंबी बनवले.

प्रकाश व मंदाताईंनी एकोणविसशे शहात्तरमध्ये कार्यास प्रारंभ केला त्यावेळी त्यांच्यासमोर आदिवासींचा विश्वास संपादन करून त्यांच्या विचारपद्धतीत बदल करण्याचे आव्हान होते. त्यावेळी जेमतेम आठ विद्यार्थी असणार्‍या हेमकशातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनियर, वकील बनून नवआदर्श प्रस्थापित केला आहे.

  तपस्व्याप्रमाणे सेवा करूनही त्यांच्यात अहंकारचा लवलेश नाही. दरवर्षी सुमारे चाळीस हजार आदिवासींना ते वैद्यकीय सेवा पुरवतात. अतुलनीय कार्याच्या सन्मानार्थ त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे.      
तीन दशकाहून अधिक काळ तपस्व्याप्रमाणे सेवा करूनही त्यांच्यात अहंकारचा लवलेश नाही. दरवर्षी सुमारे चाळीस हजार आदिवासींना ते वैद्यकीय सेवा पुरवतात. अतुलनीय कार्याच्या सन्मानार्थ त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आले आहे. 'साधी राहणी उच्च विचार' या आदर्शाचे ते प्रतिक आहेत. डॉ. प्रकाश व मंदा आमटे यांच्या विवाहाचा किस्साही जगावेगळाच.

मुहूर्त किंवा वैदिक मंत्रोच्चाराशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेच्या साक्षीने एकोणवीसशे बहात्तरमध्ये 'आनंदवनात' त्यांचा विवाह पार पडला. बाबांनी कुष्टरूग्नांच्या सेवेचे व्रत हात‍ी घेतले तेव्हा विकास अगदी लहान होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनीही बाबांच्या कार्याची धुरा खांद्यावर घेतली.

नव्वदच्या दशकांत
MH GovtMH GOVT
विस्थापितांच्या आंदोलनातस बळ देण्यासाठी बाबांनी नर्मदेकाठी मुक्काम ठोकल्यानंतर डॉ. विकास यांनी आनंदवनाची जबाबदारी घेऊन दोन दशकांहून अधिक कालखंड झाला आहे. वास्तूरचनाशास्त्र, पुरातत्त्वातही त्यांना विशेष रूची आहे. आमटे कुटुंबीयांनी शोषीत, अशिक्षित, मागास, समाजाने दुर्लक्षिलेल्या जणांना मुख्य प्रवाहात आणून स्वावलंबित्वाचे अस्त्र त्यांच्या हाती दिले आहे. बाबांनी या कार्याची मुहूर्तमेढ रोवल्यानंतर मुलांनी कळस चढवून घेतलेला वसा टाकणार नाही, हे सिद्ध केले आहे.








हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

मुंबईत एका वृद्धाची झाली एक कोटींची फसवणूक

LIVE: गुरुवार 28 नोव्हेंबर 2024 च्या सर्व महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

पराभूत झाल्यानंतर विरोधक ईव्हीएमला घेऊन रडतात, भविष्यात आणखी निवडणुका हरतील-चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तयारी सुरू, जाणून घ्या कधी आणि कुठे होणार शपथविधी

महाराष्ट्रात सरकार स्थापनेचे प्रयत्न तीव्र, आज दिल्लीत बैठक

Show comments