Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तारुण्य टिकवायचं असेल तर 1 मूठभर सुपरफूड खा

Webdunia
शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (17:26 IST)
तुम्हाला माहित आहे का की बदामामध्ये 15 प्रकारचे पोषक असतात आणि हे अँटीऑक्सिडेंट व्हिटॅमिन-ई चे पॉवरहाऊस आहे. हे मुक्त रॅडिकल्स आणि यूव्ही किरणांपासून त्वचेचे संरक्षण करतात. दररोज बदाम खाणे त्वचेच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते आणि यामुळे त्वचेची चमक वाढते. मूठभर बदाम खाल्ल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. 15 बदाम खाल्ल्याने तुम्हाला तुमच्या रोजच्या व्हिटॅमिन-ई च्या 50% गरजांची पूर्तता होते.
 
बदामाला सुपरफूड देखील म्हणतात. त्यात नियासिन, कॅल्शियम, व्हिटॅमिन ई, फायबर आणि रिबोफ्लेविनचे ​​प्रमाण जास्त असते. यात ओमेगा-6 भरपूर प्रमाणात आढळतं. तर फॅटी ऍसिड, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आणि जस्त यांचा ही समावेश आहे.
 
बदामामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट, फायबर, प्लांट बेस प्रोटीन आणि व्हिटॅमिन ई यांसारखे महत्त्वपूर्ण पोषक घटक असतात. त्यामुळे बदाम त्वचेसोबतच हृदयासाठीही फायदेशीर आहे.
 
बॉलिवूडमध्ये अनेक फिटनेस फ्रिक अभिनेत्री ज्या वयाच्या 45 व्या वर्षीही फिट आणि सुंदर दिसतात. याचे सर्व श्रेय त्याच्या फिटनेस रुटीनला जाते. स्वत: ला फिट ठेवण्यासोबतच या अभिनेत्री डायट टिप्सही शेअर करतात. बहुतेक अभिनेत्री बदामाला सुपरफूड मानतात आणि त्याचे फायदेही सांगतात.
 
बदाम भिजवल्यानंतर का खातात, सुके बदाम का खात नाहीत? जर तुम्हाला उत्तर माहित नसेल तर जाणून घ्या की बदाम सालासह खाणे तितके फायदेशीर नाही जेवढे बदाम साल काढून खाणे आहे. याचे मुख्य कारण बदामाच्या त्वचेमध्ये टॅनिन नावाचे घटक असते, जे या पोषक तत्वांचे शोषण रोखते.
 
वाळलेल्या बदामाची साले काढणे शक्य होत नाही, तर बदाम पाण्यात भिजवल्याने साल सहज निघतं. अशात तुम्हाला बदामाचे पूर्ण पोषण मिळते, जे सालासकट मिळू शकत नाही. यामुळेच कच्च्या ऐवजी भिजवलेले बदाम खावेत. हे अधिक फायदेशीर ठरतील.
 
भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे-
भिजवलेले बदाम खाल्ल्याने पचनक्रियाही संतुलित राहते.
 
यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे वृद्धत्व नियंत्रित करतात.
 
बदामामुळे रक्तातील अल्फाल टोकोफेरॉलचे प्रमाण वाढते, जे रक्तदाब नियंत्रित करते.
 
भिजवलेले बदाम चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात.
 
हे फॉलिक ऍसिडमध्ये समृद्ध आहे, जे गर्भधारणेदरम्यान बाळाच्या मेंदू आणि न्यूरोलॉजिकल सिस्टमच्या विकासास मदत करते.
 
जाणून घ्या कोणत्या लोकांनी बदाम खाऊ नयेत-
चला तर जाणून घेऊया अशा लोकांबद्दल ज्यांनी बदाम खाणे टाळावे -
 
1. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी बदामाचे सेवन टाळावे कारण या लोकांना रक्तदाबाची औषधे नियमित घ्यावी लागतात. या औषधांसह बदाम खा आरोग्याची हानी होऊ शकते.
 
2. ज्या लोकांना किडनी स्टोन किंवा पित्ताशयाची समस्या आहे त्यांनी बदाम खाऊ नयेत.
 
3. जर कोणाला पचनाची समस्या असेल तर त्यांनी बदाम खाणे देखील टाळावे, कारण त्यात भरपूर फायबर असते, ज्यामुळे तुमची समस्या आणखी वाढू शकते.
 
4. जर एखादी व्यक्ती एंटीबायोटिक औषध घेत असेल तर त्या काळात त्याने बदाम खाणे देखील टाळावे. बदामामध्ये जास्त प्रमाणात मॅग्नेशियम असते, जे सेवन केल्याने शरीरातील औषधांच्या प्रभावावर परिणाम होऊ शकतो.
 
5. जे लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत, त्यांनी बदामाचे सेवन करू नये, कारण त्यात भरपूर कॅलरीज आणि फॅट असते, ज्यामुळे वजन वाढू शकते.
 
6. जर कोणाला अॅसिडिटीची तक्रार असेल तर त्यांनी बदामही खाऊ नये.

Edited by: Rupali Barve

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments