Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मासिक पाळी काळात पॅड लीक होण्याची भीती वाटते का? या टिप्स अवलंबवा

Webdunia
शनिवार, 2 एप्रिल 2022 (23:13 IST)
मासिक पाळी ही महिलांमध्ये नैसर्गिक प्रक्रिया आहे. मासिक पाळीत महिलांमध्ये अनेक हार्मोनल बदल होतात. मासिक पाळी दरम्यान रक्तस्त्राव व्यतिरिक्त, पोटदुखी, पेटके येणे आणि मूड बदलणे यासारख्या समस्या देखील होतात. 
 
मासिक पाळीत रक्तस्त्राव होणे हे सामान्य आहे परंतु जर जास्त रक्तस्त्राव होत असेल तर खूप त्रास होतो. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने दिवसातून अनेक वेळा सॅनिटरी नॅपकिन बदलावे लागतात. अनेकदा महिलांना मासिक पाळी येण्याची भीती असते. विशेषत: जर आपल्याला ही जास्त रक्तस्त्राव होत असेल तर मासिक पाळी दरम्यान पॅड लीक होण्याची शक्यता जास्त असते, पॅड लिकेज झाल्यामुळे काहीवेळा कपड्यांमध्ये डाग  लागतात. पॅड लिकेज होऊ नये या साठी काही टिप्स अवलंबवा जेणे करून या समस्याला टाळता येईल. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 पॅड नीट लावा - मासिक पाळी दरम्यान गळती टाळण्यासाठी पॅड योग्यरित्या लावणे खूप महत्वाचे आहे. यासाठी नेहमी अंडरवेअरच्या मध्यभागी पॅड ठेवा. कापडी पॅड वापरल्याने गळती होण्याची अधिक शक्यता असते. यासाठी कापडी पॅडऐवजी सामान्य पॅड वापरा.
 
2 विंग्स असलेले पॅड वापरा - जर आपल्याला मासिक पाळी दरम्यान जास्त प्रवाह येत असेल किंवा गळतीची समस्या असेल तर विंग्स असलेले पॅड वापरा. हे पॅड अंडरवेअरला चिकटतात आणि जास्त हलत नाहीत. विंग्स असलेले पॅड द्रवपदार्थ जेलमध्ये रूपांतरित करतात, ज्यामुळे गळती रोखते.
 
3 पँटी लाइनर वापरा -जर आपल्याला मासिक पाळीत पेड लिकेज होण्याची भीती असते तर आपण पँटी लाइनर घालू शकता. आपण ते पॅडच्या बाजूला आणि तळाशी लागू करू शकता. यामुळे अतिरिक्त कव्हरेज मिळेल आणि डाग पडण्याची भीती राहणार नाही. आपण आपल्या इच्छेनुसार, पँटी लाइनर समायोजित करू शकता. 
 
4 पिरियड पॅन्टी वापरा- जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान रक्त गळती टाळायची असेल तर  पीरियड पॅन्टी वापरू शकता. ही सामान्य पँटीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे आणि तिच्या आतील बाजूस कापडाचे तीन थर आहेत. या पँटीज जरा महाग असतात पण त्यांची शोषकता जास्त असते.
 
5 योग्य आकाराचे पॅड निवडा-जर  जास्त प्रवाहाची समस्या असेल तर योग्य लांबी आणि जाडीचे पॅड वापरा. जर आपण कमी लांबीचे किंवा जाडीचे पॅड लावले तर त्यामुळे  कपड्यांवर रक्ताचे डाग पडू शकतात. म्हणून, आपण फक्त योग्य आकाराचे पॅड वापरावे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

डिप्लोमा इन साउंड इंजिनीअरिंग मध्ये करिअर करा

हिवाळ्यात ही गोष्ट पाण्यात उकळून प्या, आरोग्यासाठी वरदान आहे

तुमच्या केसांमध्ये सलूनसारखा ओलावा हवा आहे? या घरगुती उपायाचा अवलंब करा

हिवाळ्यात मुळ्याच्या पानांची चटणी खाण्याचे फायदे जाणून घ्या

आपल्या जोडीदाराला कसे प्रभावित करावे जेणेकरून नातेसंबंध मजबूत राहतील, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments