Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कढी पत्त्याने घरी तयार करा केसांसाठी उत्तम मास्क

कढी पत्त्याने घरी तयार करा केसांसाठी उत्तम मास्क
जेवण्यात कढी पत्त्याचा स्वाद तर सर्वांनाच आवडतो कारण आरोग्यासाठी तसंच खाद्य पदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी कढी पत्ता अत्यंत उपयोगी आहे परंतू याने सौंदर्य देखील वाढतं हे जाणून घेतल्यावर आश्चर्यच वाटेल ना.. यात आढळणारे व्हिटॅमिन सीँ फॉस्फोरस, आयरन, कॅल्शियम आणि निकोटिनिक अॅसिड केस आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरतं.
 
कढी पत्त्यात आढळणारे अॅटीऑक्सिडेंट आपल्याला डोक्याला मॉश्चराइज करतील आणि डेड स्किन सेल्स काढण्यात मदत करतील. या व्यतिरिक्त कढी पत्त्यात आढळणारे प्रोटीन आणि बीटा- कॅरोटिन केसांना जाड आणि मजबूत करण्यात मदत करतं.
 
केस गळणे
केस गळणीवर उपाय म्हणून मूठभर कढी पत्त्याची पाने 2 ते 3 चमचे नारळ तेलात मिसळावी. पाने काळे होयपर्यंत हे मिश्रण गरम करावे. नंतर गॅस बंद करून मिश्रण गार होऊ द्यावे. याने केसांच्या मूळवर मालीश करावी. तीस मिनिट तसेच राहू द्यावे नंतर केस धुऊन घ्यावे.
 
ग्रे हेअर्स
पांढर्‍या केसांच्या समस्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी मूठ भर कढी पत्ता आणि एक वाटी दही मिक्सरमधून फिरवून घ्यावे.नंतर याने स्कॅल्पवर मसाज करावी आणि केसांना देखील लावावे. तीस मिनिटानंतर केस धुऊन घ्यावे. हा उपाय आठवड्यातून दोनदा करावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका