चेहर्यावरील सुरकुत्या, पोर्स आणि टॅनिंग हटवण्यासाठी भात आणि हळदीचा मास्क वापरा. हे वापरल्याने आपल्याला फरक कळून येईल.
कोणताही मोसम असला तरी चेहर्या आणि शरीरावर टॅनिंग होते. उन्हामुळे त्वचा काळी पडू लागते. यासाठी घरगुती उपाय करावा. जाणून घ्या हा मास्क तयार करण्याची कृती
कृती- अर्धा कप भातात 1 चमचा मध मिसळा. त्यात हळद, मीठ आणि दही मिसळून पेस्ट तयार करा. योग्य पेस्ट तयार होत नसेल तर कोमट पाण्याचा शिपका देऊन नीट मिसळू शकता.
ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. वाळल्यावर कोमट पाण्याने धुऊन टाका. असे दिवसातून दोन करावे. टॅनिंगने सुटकारा मिळेल. याने चेहर्यावरील काळपटपणाही दूर होईल आणि त्वचा नरम होईल. याने पोर्स टाइट होतील ज्याने आपल्या त्वचेचं तारूण्य टिकून राहील.