Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टाचांच्या वेदनांनी त्रस्त असल्यास, मुक्त होण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

Webdunia
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (11:00 IST)
बरेच लोक टाचेमध्ये वेदना असल्याची तक्रार करतात. ह्याचे प्रमुख कारण हिल्स घालणे देखील असू शकत. या व्यतिरिक्त टाचेच्या वेदने चे कारण वजन वाढणे, बऱ्याच काळ उभे राहणे, नवीन व्यायाम, किंवा शारीरिक क्रियाकलापांमुळे असू शकत. बऱ्याच वेळा टाचांची वेदना इतकी वाढते की पायाच्या खालच्या भागेत असह्य वेदना आणि जळजळ सुरु होते. जास्त काळ उभे राहणे, पाऊले  कडक होणे, हलकी सूज येणे, टाचेची उंची वाढणे जाणवते. केल्शियम ची कमतरता देखील टाचांच्या वेदनेचे कारण होऊ शकत. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांमध्ये वेदना होते. हाडे कमकुवत होतात. टाचांच्या वेदनेपासून मुक्त होण्यासाठी आपण काही घरगुती उपाय अवलंबवू शकता. जे आपल्याला टाचेच्या वेदनेपासून मुक्तता देतात. चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 आल्याचा काढा -
आलं आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर मानले आहे. आलं टाचेच्या वेदनेपासून मुक्त करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. आल्याचा काढा प्यायल्यानं टाचेच्या वेदनेपासून आणि सूज येण्यापासून आराम मिळतो.
 
2  लवंगाचं तेल-
 लवंगाच्या तेलात वेदनाशामक घटक आढळतात. लवंगाच्या तेलाने मॉलिश केल्यानं टाचांच्या वेदनेपासून आराम मिळतो. पायांमध्ये कोणत्याही प्रकारची वेदना जाणविल्यास लवंगाच्या तेलाची मॉलिश केल्यानं फायदा होतो.
 
3 हळदीचा वापर-
हळद ही मसाल्याच्या रूपात भाजीची चव वाढविण्यासाठी वापरतात. हळदीमध्ये अँटी इंफ्लिमेंटरी गुणधर्म असतात, जे सूज कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. हळदीचं दूध प्यायल्यानं शरीराची वेदना कमी होण्यास मुक्तता मिळते.
 
4 मोहरी- 
मोहरी चे दाणे तेल बनविण्यासाठी आणि मसाल्यात फोडणी देण्यासाठी वापरले जाते. या मुळे टाचांच्या वेदने पासून देखील आराम मिळू शकतो. अर्धा वाटी मोहरी चे दाणे दळून घ्या. ह्या भुकटीला गरम पाण्याच्या बादलीत मिसळा. या पाण्यात पायांना 12 ते 16 मिनिटे घालून ठेवा असं केल्यानं टाचांच्या वेदने पासून आराम मिळतो.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

Christmas Special Recipe : क्लासिक शुगर कुकीज

व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होऊ शकतात हे 6 गंभीर आजार! या गोष्टी खायला सुरुवात करा

बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी मध्ये करिअर करा

कन्सीलर लावल्याने चेहऱ्यावर तडे येतात, या 5 सोप्या टिप्स फॉलो करा

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments