त्वचा सतत चमकदार असावी असे कोणाला वाटत नाही. सुंदर आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी लोक अनेक पद्धतींचा अवलंब करतात. अनेकजण पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतात, तर पैसे आणि वेळेअभावी अनेकांना पार्लरमध्ये जाता येत नाही. पार्लरमध्ये उपलब्ध असलेल्या स्किन केअर ट्रीटमेंटचा प्रभाव काही दिवस टिकतो, पण जर तुम्हाला कायमस्वरूपी चमकणारी त्वचा हवी असेल, तर त्यासाठी काही घरगुती उपायांमध्ये हळदीचा वापर करावा. हळदीचा नियमित वापर केल्यास चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी हळदीचा वापर वर्षानुवर्षे होत आहे. हळदीमध्ये असे घटक आढळतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात.
हळद आणि चंदन-
जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमांची खूप समस्या असेल तर तुम्ही हळदीमध्ये गुलाबपाणी, चंदन पावडर आणि मध मिसळून फेस पॅक बनवू शकता. चेहऱ्याची चमक कायम ठेवण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.
हळद आणि दही-
त्वचा उजळण्यासाठी ताजे दही आणि बेसनामध्ये हळद मिसळून फेस पॅक बनवा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होईपर्यंत राहू द्या. पॅक सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा पॅक चेहऱ्यावरील डाग दूर करण्याचे काम करतो.
दूध आणि हळद-
जर तुम्हाला वृद्धत्व थांबवायचे असेल तर तुम्ही दूध आणि हळदीचा फेस पॅक बनवू शकता. हा पॅक बनवण्यासाठी 3 चमचे दुधात एक चतुर्थांश चमचे हळद मिसळा. आता या पॅकने चेहऱ्याला मसाज करा. दूध सुकल्यावर 10 मिनिटांनी चेहरा धुवा.
हळद आणि तांदळाचे पीठ-
जर तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे असतील तर तांदळाचे पीठ, टोमॅटोचा रस आणि कच्च्या दुधात हळद मिसळून पॅक तयार करा. 15 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा धुवा. काही दिवसांनी तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल.
हळद आणि गुलाबपाणी-
गुलाब पाण्यात हळद मिसळून लावल्यास चेहऱ्याची चमक वाढण्यास मदत होते. हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे बेसन, अर्धा चमचा हळद आणि 3 चमचे गुलाबपाणी लागेल. ही पेस्ट त्वचेवर 20 ते 25 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर चेहरा धुवा.