Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हा नैसर्गिक शॅंपू होऊ देणार नाही हेयर फॉल, पावसाळ्यात देखील केस राहतील घनदाट

ritha
, मंगळवार, 16 जुलै 2024 (07:46 IST)
पावसाळ्यात अनेक जणांना केस गाळती समस्येला तोंड द्यावे लागते. तर केमिकल युक्त शॅंपू वापरल्यास या समस्या जास्त वाढतात. अश्यावेळेस तुम्ही आवळा, शिकाकाई आणि रीठा यांपासून शॅंपू बनवू शकतात. या सर्व वस्तू नैसर्गिक असल्याने केसांना मजबूत बनवतात, मुलायम ठेवतात.  
 
घरगुती हर्बल शॅंपू बनवण्याची पद्धत 
. सर्वात पहिले आवळा, शिकाकाई आणि रीठाचे 8-10 तुकडे घ्यावे.
 
. आता एका बाऊलमध्ये पाणी घेऊन ह्या तिघे वस्तू रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्या.
 
. सकाळी यामध्ये आणखीन पाणी मिक्स करावे.
 
. आता पॅनमध्ये टाकून उकळवावे.
 
. यानंतर थंड होऊ द्यावे. व मॅश करावे. गाळून घ्यावे. व एका काचेच्या बॉटलमध्ये भरावे. 
 
. तर चला तयार आहे आपला होममेड शॅंपू.
 
आवळ्याचे फायदे- 
आवळ्यामध्ये पोषक तत्व, अँटी-ऑक्सीडेंट्स व औषधीय गुण भरपूर असतात. हे केसांना नुकसान होण्यापासून वाचवतात. आवळ्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. ज्यामुळे केस घनदाट होतात. 
 
रीठाचे फायदे- 
रीठा आयरन ने भरपूर असते. जी केसांना आरोग्यादायी ठेवण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडते. तसेच रीठामुळे केसांना अँटी-ऑक्सीडेंट्स देखील मिळतात.
 
शिकाकाईचे फायदे-
शिकाकाई मध्ये असलेले तत्व केसांच्या टाळूची चांगल्याप्रकारे स्वच्छता करते. तसेच केस लांब, मजबूत बनवण्यासाठी मदत करते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसाळ्यात खात आहात का हिरव्या भाज्या? तर या प्रकारे करा उपयोग