Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Hair Dye Tips महिनाभर केस राहतील काळे हे करुन तर बघा

Webdunia
शनिवार, 11 मार्च 2023 (13:51 IST)
हेअर डाई 4 दिवसही केसांमध्ये टिकत नाही? तर फक्त हे काम करा
 
पांढऱ्या केसांना नैसर्गिक किंवा रासायनिक पद्धतीने रंग दिल्यानंतरही केसांची मुळे काही दिवसांतच पांढरी होतात. तुम्ही कितीही महाग रंग लावलात किंवा नैसर्गिक मेंदी-इंडिगो वापरलात तरी 4 ते 5 दिवसातच केसात पुन्हा पांढरेपणा येऊ लागतो, तुम्ही या समस्येशी झगडत आहात का? तर आज आम्ही तुम्हाला तुमच्या केसांचा रंग लगेच फिकट होण्यास कारणीभूत असलेल्या कारणांबद्दल सांगणार आहोत, तसेच तुम्हाला अशा टिप्स आणि युक्त्या सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या केसांचा रंग किंवा मेंदी जास्त काळ टिकून राहतील आणि केस लगेचच पांढरे होणार नाहीत.
 
या चुकांमुळे केसांचा रंग लवकर उतरतो - 
 
1- हिना किंवा कलर लावल्यानंतर शैंपूने धुणे. केसांना अधिक हार्ड शैंपूने धुणे किंवा दररोज धुण्याने रंग फिकट होऊ लागतो.
 
2- कलर करण्यापूर्वी केस स्वच्छ नसणे किंवा त्यात तेल, धूळ - घाण असेल तर कलर उतरु लागतो.
 
3- चेहरा वारंवार धुण्याने देखील केस मुळापासून पांढरे होऊ लागतात. यासाठी चेहरा धुण्यापूर्वी केसांना हेअर बँड लावून मग चेहरा धुवावा.
 
4- कलर आणि डवलपरचे प्रमाण चुकीचे असणे किंवा चुकीचे व्हॉल्यूम डेव्हलपर वापरणे. तसेच मेंदी-इंडिगो पेस्टचे चुकीचे प्रमाण घेणे आणि मीठ न घालणे.
 
5- डाय केलेल्या केसांना खूप गरम किंवा हार्ड पाण्याने धुण्याची सवय.
 
जाणून घ्या कशा प्रकारे महिनाभर टिकेल कलर
 
1- केसांना कलर किंवा मेंदी लावण्यापूर्वी केसांना शॅम्पू करा, पण कलर लावल्यानंतर केस धुणे टाळा, कमीत कमी तीन दिवस शॅम्पू करू नका.
 
2- केसांना कलर करण्यासाठी नेहमी 40 व्हॉल्यूम डवलपर वापरावे सोबतच कलर आणि डवलपर रेशो 1: 2 असा असला पाहिजे. अर्थात दोन भाग कलर तर एक भाग डवलपर. कलर अधिक असल्यास केसांवर पिगमेंट देखील अधिक होईल, या केसांचा रंग लवकर फिकट होणार नाही.
 
3- केसांवर नेहमी कलर प्रोटेक्टेड शॅम्पू वापरा. तुम्ही रासायनिक रंग लावा किंवा मेंदी लावा, तुम्ही हा शॅम्पू वापरावा.
 
4- मेंदी-इंडिगोने केस काळे करत असाल तर या पेस्टमध्ये चिमूटभर मीठ घालणे आवश्यक आहे, कारण हे मीठ रंग ठीक करण्याचे काम करते.
 
5- रंगवलेले केस नेहमी खोलीच्या तापमानाच्या पाण्याने धुवा, जर तुमच्याकडे हार्ड वाटर येत असेल तर केस आरओच्या पाण्याने धुवा.
 
6- आठवड्यातून एकदा केस केस धुवा, उर्वरित वेळेसाठी आपण ड्राय वॉशचा वापर करु शकता.
 
आमचा लेख फक्त माहिती देण्यासाठी आहे. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments