Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गुडघ्याचा काळपटपणा कमी करण्यासाठी टिप्स

Webdunia
मंगळवार, 1 जून 2021 (09:30 IST)
गुडघे काळपट होणे ही एक सामान्य समस्या आहे,कधीकधी गुडघ्यावरील काळपटपणामुळे एखादी फॅन्सी ड्रेस घालण्यासही संकोच होतो. तथापि, घरगुती उपचारांचा सतत वापर केल्याने गुडघ्याचा काळपटपणा देखील दूर होऊ शकतो. तर लॉकडाउनमध्ये घरातच  राहून गुडघ्यावरील काळेपणा कमी कसा करायचा ते जाणून घेऊया.
 
1 नारळ -नारळ तेलात असलेले व्हिटॅमिन ई आणि फॅटी ऍसिड्स गडद त्वचा काढून टाकण्यासाठी खूप उपयुक्त आहेत. म्हणून, आपण नारळ तेलाने मालिश करू शकता. नारळ तेलाने हळूवारपणे आपल्या गुडघ्यांची मालिश करा.
 
2 लिंबू- लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी काळपटपणा दूर करण्यास मदत करते. अन्नाचा वापर झाल्यावर उर्वरित लिंबू फेकण्याऐवजी आपण  आपल्या गुडघ्यावर ते चोळा. हे त्वचेला एक्सफोलीएट करते आणि काळपटपणा कमी करते. लिंबू चोळल्यावर, 15 मिनिटे सोडा. नंतर थंड पाण्याने धुवा.
 
3 हळद आणि दुधाचा पॅक- हळद हे एक औषध आहे. आपण त्याचे बरेच फायदे ऐकले असतीलच. त्याचा  वापर केल्याने  गडद त्वचा कमी करू शकतो. या साठीं आपण थोड दूध घ्या.त्यात थोडी हळद आणि थोडे मध मिसळा. ते मिक्स करावे आणि गुडघ्यावर लावा. 15 मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवा. आठवड्यातून 3 वेळा हे करा. काही महिन्यांत फरक दिसेल
 

संबंधित माहिती

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

पिठात बर्फाचे तुकडे टाका, पोळी बनवण्याची नवीन पद्धत जाणून घ्या

ही सामाजिक कौशल्ये शाळेत जाणाऱ्या मुलांना शिकवा

उन्हाळ्यात टरबूज किंवा खरबूज खाणे काय जास्त फायदेशीर आहे

हेअर डस्टिंग म्हणजे काय? त्याचे 4 सर्वोत्तम फायदे जाणून घ्या

Career Tips : 12वी पूर्ण केल्यावर या क्षेत्रात करिअर करा

पुढील लेख
Show comments