Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

थंडीसाठी घरगुती फेसपॅक

वेबदुनिया
थंडीत फेसपॅकरूपी मॉईश्चरायझर म्हणून लोणी, कच्चे दूध, साय यात बेसन मिसळून अंगभर चोळावे. हा पॅक आंघोळीपूर्वी
लावावा. त्यामुळे या दिवसांमध्ये त्वचा कोरडी पडत नाही. वेळ मिळेल तसा एक दिवसाआड हा फेसपॅक लावल्यास सुरकुत्या आणि कोरड्या त्वचेपासून तुमची निश्चित सुटका झाली असे समजावे.

थंडीच्या दिवसांत त्वचा कोरडी पडणे, त्वचा काळवंडणे, सुरकुत्या पडणे, खाज उठणे असे प्रकार होत असतात. म्हणूनच या दिवसांमध्ये त्वचेची निगा कशी राखावी हे आता आपण पाहूया.

WD


तुळशीच्या सुकलेल्या पानांची पावडर, संत्र्याच्या सालीचा रस, ग्लिसरीन (थोडेसे), आंबेहळद (थोडेसे) हे मिश्रण एकत्र करून फेसपॅक तयार करावा. थंडीमध्ये हा फेसपॅक म्हणजे रामबाण उपाय आहे.

WD


पूर्ण शरीराचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी मध, हळद, बेसन सम प्रमाणात घेऊन (पाणी घालू नये) हा स्क्रब आंघोळीपूर्वी शरीराला निदान तीन मिनिटे लावून ठेवावा. हा स्क्रब एक दिवसाआड लावल्यास त्वचा उजळते.

पुढे पहा त्वचेच्या संरक्षणासाठी खास उटणे...


WD
त्वचेच्या संरक्षणासाठी खास उटणे: आंबेहळद, कडुनिंबाच्या सुकलेल्या पाल्याची पावडर, नीम पावडर (अगदी थोडी), संत्रा पावडर आणि चंदन एकत्र यांचे उटणे घरात बनवून घ्यावे.

थंडीत कोरडी त्वचा खरखरीत होते. या कोरड्या त्वचेसाठीचा हा खास फेसपॅक -
अर्जुन पावडर : १०० ग्रॅम, मंजिष्ठा : १०० ग्रॅम, शंख जिरा १०० ग्रॅम, चंदन पावडर : १०० ग्रॅम, हळद १०० ग्रॅम, मायफळ ५० ग्रॅम, जायफळ ४० ग्रॅम, फिटकरी ४० ग्रॅम, खस्ता ५० ग्रॅम, मूग डाळ (थोडीशी), मसूर डाळ (थोडीशी), हे सगळे साहित्य एकत्र करून हा फेसपॅक दूध आणि सायीसह लावावा. हे सर्व साहित्य आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध आहे.

थंडीत पार्लरमध्ये जाताना..


WD
पार्लरमध्ये जाताना..
थंडीत त्वचेची निगा राखताना पार्लरला जात असाल तर शक्यतो ब्लिच टाळावे. त्वचा अगदीच काळवंडलेली असेल तर मग कमी अ‍ॅक्टिवेटर वापरून ब्लिच करावे.
फेशिअलमध्ये कोरड्या त्वचेसाठी बदाम, अ‍ॅलोव्हेरा, कुकुम्बर, फ्रूट फेशिअलला प्राधान्य द्यावे.
तेलकट त्वचेसाठी या दिवसांमध्ये स्ट्राबेरी फेशिअल हा उत्तम पर्याय आहे.
क्रीम मसाजवर फेसपॅक लावून घ्यावा, जेणेकरून त्वचेतील स्निग्धता कायम राहते.

टीप : थंडीच्या दिवसांत फेसपॅक चेह-यावर सुकवू नये. अधिक वेळ ठेवल्यास चेह-यावर सुरकुत्या पडण्याची शक्यता असते. फेसपॅक लावल्यानंतर दहा मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा.

वेबदुनिया वर वाचा

सर्व पहा

नक्की वाचा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

सर्व पहा

नवीन

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments