Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फेशियल, पण जरा जपून...

वेबदुनिया
आता मेकअप करणे ही एका विशिष्ट वर्गाची संस्कृती राहिलेली नाही. मध्यमवर्गातील महिलांची पावलेही ब्युटीपार्लरच्या दिशेने जाऊ लागली आहेत. फेशियल करून चेहर्‍यावरची चमक कायम ठेवण्याचा नवा ट्रेंड आला आहे. एखाद्या कार्यक्रमासाठी फेशियल करणे यात काही नवे नाही. पण काही महिला आता रोज फेशियल करायला लागल्या आहेत. परंतु, हे करताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. फेशियलमुळे काही महिलांना त्वचेचे आजारही झाल्याची उदाहरणे आहेत.

फेशियल केल्याने चेहर्‍यावरची कांती वाढते. म्हणून पुरूषही फेशियल करायला लागले आहेत. फेशियल केल्याने चेहर्‍याची मालिशही होते. शरीरात रक्तसंचार सुरळीत होतो. वाढत्या वयानुसार चेहर्‍यावर जाणवणार्‍या सुरकुत्याचे प्रमाणही कमी होते. चेहरा तेजस्वी होतो.

 
   
परंतु कुठल्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नसतो हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. वारंवार फेशियल केल्याने त्याचा विपरित परिणाम नाजूक चेहर्‍यावर होत असतो. फेशियल केल्याने चेहरा उजळतो म्हणून रोज फेशियल केले पाहिजे, असे नाही. महिन्यातून एकदा किंवा दोनदा फेशियल जरूर करा. फेशियल करण्याचेही एक सुत्र आहे. चेहर्‍यावरील त्वचेचे सेल्स टर्नओवर सायकल 28 दिवसांचे असते. त्यानंतर मृत पेशी चेहऱ्यावर येतात. या पेशी घालविण्यासाठी महिन्यातून एक-दोनदा फेशियल करायला हरकत नाही.

दररोज किंवा आठवड्यातून एकदा-दोनदा फेशियल केल्याने काहीच फायदा होत नाही. उलट चेहर्‍यावरील नाजुक त्वचेला इजा पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे फेशियल करताना अतिरेक होऊ देऊ नका.
सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

मुळ्याचा पाला टाकू नका, बनवा या स्वादिष्ट रेसिपी

मोसंबीचा ज्यूस पिण्याचे 7 फायदे आणि 4 तोटे,जाणून घ्या

Career in MBA in Biotechnology : बायोटेक्नॉलॉजी कोर्स मध्ये एमबीए करा

साबुदाण्याच्या फेसपॅक चे फायदे

पंचतंत्र : मुंगूस आणि ब्राह्मणाच्या पत्नीची गोष्ट

पुढील लेख
Show comments