Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रिअल ब्युटी

वेबदुनिया
सौंदर्य उजळविण्यासाठी नेहमी कॉस्मेटिक्सचा वापर करावा असे नाही. पूर्वीच्या काळी घरातच उपलब्ध होणारी सौंदर्य प्रसाधने, काळी माती, ताक, हळद, फळांचा रस, मुलतानी माती यांचा उपयोग करीत असत. या वस्तू आजही सहज उपलब्ध होतात. तसेच त्या उपयोगीही आहेत.

बाजारातील सोंदर्य प्रसाधने महागडी असतात. त्याची खरेदी परवडण्यापलिकडे असते. अशा वेळी स्वस्तात मिळणारी सौंदर्य प्रसाधने खरेदी केली जातात, पण त्यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याचीच शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा परिस्थितीत घरच्या घरी तयार होणारी सौंदर्य प्रसाधने एक अनोखे सौंदर्य प्रदान करीत असते, हे सत्य नाकारता येत नाही. कारण ही प्रसाधने स्वस्त, शुद्ध आणि नैसर्गिक गुण असणारी आहेत. त्याचा वापर तुम्ही नि:संकोच करू शकता....

क्लिंज
चार चमचे दही व एक-दोन चमचे लिंबाचा रस एकत्र करून घ्या. कापसाच्या साहाय्याने चेहरा व मानेला खालून वरच्या दिशेला लावा आणि नंतर कापसाने पुसून घ्या. हे तेलकट तवचेसाठी चांगले क्लिंजर आहे.

अ‍ॅस्ट्रिंजें
चार चमचे काकडीचा रस व दोन चमचे गाजराचा रस व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे फ्रेशनचे काम करते.

हँड एण्ड बॉ डी लोशन
गुलाब जल, दोन चमचे ग्लिसरीन, अर्धा चमचा सिरका, अर्धा चमचा मध, व्यवस्थित मिक्स करून एका बाटलीत भरून ठेवा. स्नानानंतर हात आणि संपूर्ण शरीरावर लावा. त्याने त्वचा स्वच्छ आणि मुलायम बनते.

डेअर डाय
एक लीटर पाण्यात आवळा 25 ग्रॅम, ब्राह्मी बुटी 55 ग्रॅम चोवीस तास भिजवून ठेवावे. एक किलो तिळाच्या तेलात हे पाणी हाताने एकजीव करा आणि गाळून तेलात टाकून इतके गरम करा की पाण्याची वाफ होऊन त्यातील पाण्याचा अंश नाहीसा होईल. तेल थंड करून बाटलीत भरून ठेवा. त्याव्यतिरिक्त रोज रात्री एक-एक चमचा आवळा, हरडा आणि बेहेडा 750 मिली पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी याच पाण्याने केस व्यवस्थित धुवा. हे एक चांगले गुण असणारे हेअर डाय आहे.

ओसामा बिन लादेनचा फोटो, ISIS चा झेंडा ठेवण्याबद्दल हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय

काँग्रेस सोडून राधिका खेडा आणि अभिनेता शेखर सुमन BJP मध्ये झाले सहभागी

19 वर्षानंतर सासरी आलेल्याला जावाईची केली हत्या, बहिणीने प्रेम विवाह केला म्हणून होता राग

मतदानानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित दादांच्या घरी

विश्व कल्याणासाठी महाशक्ती बनेल भारत, 2047 पर्यंत बनवायचे सुपरपॉवर- राजनाथ सिंह

Mother's Day 2024 मदर्स डे का साजरा केला जातो हा दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

पती-पत्नीच्या वयात किती फरक असावा?

तेनालीराम कहाणी : लाल मोर

आरोग्यासाठी फायदेशीर आहे नारळाची मलाई

Show comments