Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काजळाचे 9 चमत्कारिक टोटके

Webdunia
सुख-शांती हेतू: कुटुंबात सतत कलह होत असेल तर सुख-शांती नांदावी यासाठी शनिवारी सकाळी काळ्या कपड्यात नारळ गुंडाळून त्यावर काजळाचे 21 तीट लावा. हे घराबाहेर लटकवून द्या. याने वाईट नजरेपासून बचाव होईल आणि घरात नेहमी सुख- शांती राहील.

सम्मोहित करण्यासाठी: रवी पुष्य योगमध्ये उंबराचे फुलं आणि कापसाची वात तयार करा. ही वात लोण्याने जाळून त्याच्या ज्योतिने काजळ तयार करा. हे काजळ रात्री स्वत:च्या डोळ्यात लावल्याने सर्व जग आपल्या वशमध्ये राहू शकतं. हे काजळ कुणालाही देऊ नाही.
याव्यतिरिक्त कडू दुधी भोपळ्याचे तेल आणि कापडाने काजळ तयार करा. हे डोळ्यात घालून पाहण्याने सम्मोहित केलं जाऊ शकतं. 

मुलांना दृष्ट लागू नये म्हणून: नवजात मुलांच्या डोळ्यात काजळ घालण्याची पद्धत देशातील अनेक भागात प्रचलित आहे. पण काही लोकांचे म्हणणे आहे याने डोळ्यांवर विपरित परिणाम होतो. तरी आपला उद्देश्य मुलांना वाईट दृष्टीपासून वाचवणे असेल तर डोळ्याव्यतिरिक्त मुलांच्या तळपाय, कानामागे किंवा कपाळावर छोटी तीट लावता येऊ शकते.

शनी शांतीसाठी: शनीवारी काजळाची डबी स्वत:च्या डोक्यापासून ते पायापर्यंत 9 वेळा उतरवून एकांत जागी जमिनीत गाडावे. यानंतर मागे वळून न पाहता परत यावे. बरोबर नेलेले औजारही तिथेच सोडून यावे.

याव्यतिरिक्त मोहरीच्या तेलाने मालीश करून डोळ्यात काजळ घातल्याने शनीदोष दूर होतो. किंवा प्रत्येक शनीवारी रात्री झोपताना डोळ्यात काजळ लावावे.

मंगळ शांतीसाठी: मंगळ कामात अडथळे आणत असल्यास डोळ्यात पांढरे काजळ घालावे.

नोकरी वाचविण्यासाठी किंवा बदली रोखण्यासाठी: पाच ग्राम काजळाचा एक गोळा एकांत जागेवर जमिनीत गाडावे. गाडल्यानंतर औजार तिथेच सोडून मागे न बघता तिथून निघून जा.

राहू शांतीसाठी: अचानक धोका, हानी, अपघात या सर्वांसाठी राहू जबाबदार असतो. या अशुभ वेळी वाहत्या पाण्यात 400 ग्राम काजळ प्रवाहीत करावे.

शत्रूपासून मुक्तीसाठी: शत्रू परेशान करत असेल तर चांदीचे पाच लहान साप तयार करवून त्यांच्या डोळ्यात काजळ लावावे. हे 21 दिवस आपल्या पायाखाली दाबून झोपल्याने शत्रूपासून मुक्ती मिळते.

विवाह येत असलेले अडथळे दूर करण्यासाठी: विवाहात अडथळे येत असल्यास एकांत जागी लाकडाने जमीन खोदून निळ्या रंगाचे फूल गाडावे. शनीच्या दुष्प्रभावामुळे विवाहात विलंब होत असेल तर शनीवारी लाकडाने जमीन खोदून काजळ गाडावे.

मंगलाष्टक मराठी संपूर्ण Marathi Mangalashtak

शुक्रवारी कोणत्या मंत्राचा जप करावा?

अक्षय्य तृतीयेला तयार होत आहेत सुकर्म योगासह हे 5 शुभ संयोग, या राशीचे जातक ठरतील भाग्यवान

श्री महालक्ष्मी कोल्हापूर

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Show comments