Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माणसाच्या शरीरात देवीचा संचार

Webdunia
अंगात देवी येण्याचे किस्से आपण नेहमीच ऐकत असतो. देवी अंगात आल्यानंतर धगधगत्या निखार्‍यांवर चालत जाण्याचे प्रकारही कायम आपल्या कानावर येत असतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या या भागात आम्ही आपल्याला अशाच काही लोकांकडे घेऊन जाणार आहे. या लोकांच्या शरीरात देवी प्रवेश करते आणि ती तिच्या भक्तांचे कल्याण करते, असा त्यांचा दावा आहे.

WD
चला तर आपण जाऊत मध्यप्रदेशातील इंदुर या शहरात.... येथील दुर्गामातेच्या एका मंदिरात आरती सुरू होताच महिलांच्या अंगात देवी तर काही पुरूषांच्या अंगात देवीचे वाहन असणारा वाघ किंवा काळभैरव प्रवेश करतो. अंगात येताच त्यांच्या वेगवेगळ्या हालचाली सुरू करत, ते देवीची आराधना करू लागतात. उपस्थित भक्तगण हे दश्य पाहून त्यांच्यासमोर नतमस्तक होतात. देवीच्या रूपातील महिला त्यांना आशीर्वाद देऊ लागतात.

देवी अंगात आल्याची भावना त्यांच्या अंगात इतकी भिनलेली असते की, त्या आपल्या जीभेवर आणि हातावर चक्क जळता कापूर ठेऊन देवाची आरती करू लागतात. इतकेच नव्हे तर जेव्हा देवी, वाघ आणि काळभैरव अंगात संचारल्याची त्यांना जाणीव होऊ लागते. त्यावेळेला ते एकत्र येऊन जोरजोरात नाचू लागतात. कोणी धगधग्या निखार्‍यांवर उघड्या पायांनी नाचू लागतो.

WD
हे दृश्य पहाणारे भक्तगण या कामात त्यांना मदत करत असतात आणि देवीचा साक्षात्कार पाहात असल्याची भावना त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येते. भक्तगणांची उत्कंठा जसजशी वाढते तसतशी या खेळाचा हुरूप वाढत जातो.

अंगात देवी संचारते असे म्हणणार्‍यांची पूजा करणे हे श्रध्देचे प्रतीक आहे? खरोखरच देवी भक्तांच्या शरीरात प्रवेश करते की, केवळ भक्तांना आपल्याकडे आकर्षित करून त्यांच्या भावनांशी खेळण्याचा हा प्रकार आहे? तुम्हाला काय वाटते? आम्हाला जरूर कळवा.

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

सोमवारी महामृत्युंजय जप करणे आरोग्यासाठी फायदेशीर

आरती सोमवारची

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

Show comments