Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

7th Pay Commission DA Hike:केंद्रीय कर्मचारी, 63 लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, जुलैपासून DA चार टक्क्यांनी वाढणार!

Webdunia
शुक्रवार, 3 जून 2022 (23:59 IST)
केंद्र सरकारचे ४९ लाख कर्मचारी आणि ६३ लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. महागाईच्या दरानुसार केंद्र सरकार यावेळी डीए/डीआर चार टक्क्यांनी वाढवू शकते. अशा परिस्थितीत जुलै महिन्यापासून सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात वाढ होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या ३४ टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. १ जुलै २०२२ पासून महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ झाल्यास हा दर ३८ टक्क्यांवर पोहोचेल. अशा परिस्थितीत जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल तर त्याच्या पगारात दरमहा 720 रुपयांची वाढ होईल. 1 लाख रुपये मूळ वेतन असलेल्या व्यक्तीचा मासिक पगार 4000 रुपयांनी वाढेल.
 
केंद्र सरकारच्या सूत्रांचे म्हणणे आहे की जुलै महिन्यात डीए वाढवण्याची घोषणा केली जाऊ शकते. उपलब्ध महागाईच्या आकडेवारीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए किमान चार टक्क्यांनी वाढणार आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, निर्देशांक कमी-अधिक प्रमाणात महागाईवर अवलंबून असतो. 
 
जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18,000 रुपये असेल, तर डीएच्या 38 टक्के दराने त्याच्या पगारात 720 रुपयांची वाढ होईल. कर्मचार्‍यांचे मूळ वेतन 25 हजार रुपये असेल तर ते दरमहा 1000 रुपयांनी वाढेल. मूळ वेतन 35,000 रुपये असलेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा 1400 रुपये अधिक मिळतील. 45,000 रुपयांच्या मूळ वेतनावर 1800 रुपये वाढ होतील. 52 हजार रुपयांच्या मूळ वेतनावर 2080 रुपये, 70 हजार रुपयांच्या मूळ वेतनावर 2800 रुपये, 85,500 रुपयांच्या मूळ वेतनावर 3420 रुपये आणि 1 लाख रुपये मूळ वेतन असलेल्या कामगारांच्या खात्यात दरमहा 4000 रुपये अधिक जमा होणार आहेत. 
 
केंद्र सरकारने मागील वर्षी आपल्या कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्ता/महागाई सवलत 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढवली होती. ऑक्टोबरमध्येही डीएमध्ये तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.यंदाही जानेवारीपासून महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. यासह डीए/डीआर 34 टक्क्यांवर गेला आहे.
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments