Dharma Sangrah

ATM वापर शुल्कमध्ये होणार बदल, जाणून घ्या घोषणा

Webdunia
इतर बँक एटीएम वापरल्यास लागणार्‍या शुल्कमध्ये बदल होणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने याबद्दल घोषणा करत म्हटले की शुल्कमध्ये बदल करण्यासाठी कमेटी गठित केली गेली आहे.
 
तीन ते पाच ट्रांझेक्शन असतात फ्री
देशातील सर्व बँकेत प्रत्येक महिन्यात तीन ते पाच ट्रांझेक्शन मोफत असतात. तसेच इतर बँकेचे एटीएम मोफत वापरण्यावर जागेप्रमाणे निर्धारित केलं जातं. मोफतामध्ये ट्रांझेक्शनची संख्या मेट्रो, नॉन मेट्रो आणि ग्रामीण भागांसाठी वेगवेगळी निर्धारित करण्यात आलेली आहे.
 
SBI मध्ये लागतात 20 रुपये
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयमध्ये सहा मेट्रो शहरात महिन्यातून तीन ट्रांझेक्शन मोफत असतात. दुसर्‍या जागेवर महिन्यातून पाच ट्रांझेक्शन फ्री असतात. नंतर बँक 20 रुपये (जीएसटी अतिरिक्त) च्या दराने वित्तीय ट्रांझेक्शन आणि आठ रुपये (जीएसटी व्यतिरिक्त अतिरिक्त) गैर-वित्तीय ट्रांझेक्शनसाठी लागतात. खासगी सेक्टरच्या प्रमुख बँका आयसीआयसीआयमध्ये देखील एसबीआयप्रमाणेच ट्रांझेक्शन मोफत आहे. केवळ गैर वित्तीय ट्रांझेक्शनवर 8.50 रुपये लागतात.
 
RBI स्टेटमेंट
आरबीआयने म्हटले आहे की खूप दिवसांपासून बँकांकडून एटीएमवर लागणार्‍या शुल्क आणि फीसमध्ये बदल करण्याची मागणी केली जात होती. म्हणूनच बँकेने एक कमेटी बनवण्याचा निर्णय घेतला आहे ज्यात सर्व बँका आणि एटीएम सेवा देणार्‍या कंपन्यांचे प्रतिनिधी सामील होतील. यात भारतीय बँक संघाचे सीईओ, अध्यक्ष असतील. ही कमेटी आपल्या पहिल्या बैठकीच्या दोन महिन्यानंतर रिपोर्ट सोपवेल.
 
घटत आहे ATM ची संख्या
देशभरात एटीएमची संख्या घटत आहे. फायदा होत नसल्यामुळे बँक आणि खाजगी कंपन्या एटीएम बंद करत आहे. तरी यात होणार्‍या ट्रांझेक्शनची संख्या वाढत आहे. आरबीआय आकड्यांप्रमाणे 2011 नंतर मागील दोन वित्तीय वर्षामध्ये एटीएमचेच्या संख्येत कपात झाली आहे, यापूर्वी सतत नवीन एटीएम लावले जात होते.
 
दोन वर्षात बंद झाले 800 ATM
आरबीआयप्रमाणे 2011 मध्ये देशभरात एकूण 75 हजार 600 एटीएम होते, तसेच 2017 मध्ये हे वाढून 2 लाख 22 हजार 500 झाले. तरी नंतर मागील दोन वित्तीय वर्षात एटीएमची संख्या सतत कमी होत आहे आणि 2019 मार्च पर्यंत देशात एकूण 2 लाख 21 हजार 700 एटीएम होते. या प्रकारे दोन वित्तीय वर्षात 800 एटीएम बंद झाले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: 'मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विजयावर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विजयावर फडणवीसांची प्रतिक्रिया

न्यूझीलंडने इराणमधील दूतावास बंद केला; भारताकडून आपल्या नागरिकांसाठी सूचना जारी

आरसीबीने गुजरातचा 32 धावांनी पराभव केला, पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले

लक्ष्य सेनचा प्रवास क्वार्टरफायनलमध्ये संपला, चिनी तैपेईच्या खेळाडूकडून पराभव

पुढील लेख
Show comments