Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Bank Strike : बँका 3 दिवस बंद राहणार, 5 डे वीक मागणीसाठी 27 जूनला कर्मचारी संपावर जाणार

Webdunia
गुरूवार, 9 जून 2022 (12:30 IST)
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी या महिन्यात संपावर जाऊ शकतात. 27 जून रोजी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) या 9 बँक युनियन्सच्या संघटनेने म्हटले आहे की, जर सरकारने त्यांची मागणी मान्य केली नाही तर बँक कर्मचारी एक दिवस काम बंद ठेवतील. जर कर्मचारी संपावर गेले तर सलग 3 दिवस बँका बंद राहतील, कारण 25 तारखेला महिन्याचा चौथा शनिवार आणि 26 तारखेला रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल.
 
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन अनेक दिवसांपासून बँकांमध्ये 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याची मागणी करत आहे. बँकांनी आठवड्यातून पाच दिवसच काम करावे, असे त्यांचे म्हणणे आहे. हा नियम खाजगी क्षेत्रातील बहुतेक मोठ्या कंपन्यांना लागू आहे. यूएफबीयूने आता म्हटले आहे की, जर सरकारने त्यांच्या 5 दिवस काम आणि पेन्शनच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी 27 जून रोजी संपावर जातील.
 
UFBU मध्ये 9 बँक युनियन समाविष्ट आहेत
Moneycontrol.com च्या अहवालानुसार, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ही देशातील 9 बँक युनियनची संयुक्त संस्था आहे. याशिवाय ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन (AIBOC), ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स यांनीही संपात सहभागी होण्याचे सांगितले आहे.
 
एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी यूएफबीयूच्या बैठकीनंतर सांगितले की त्यांच्या मागण्यांमध्ये सर्व पेन्शनधारकांसाठी पेन्शन योजनेत सुधारणा करणे, राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करणे आणि सर्व बँक कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना पुनर्संचयित करणे समाविष्ट आहे. एआयबीओसीचे सरचिटणीस सौम्या दत्ता यांनी सांगितले की, सरकारने बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर देशभरातील सुमारे 7 लाख बँक कर्मचारी 27 जून रोजी संपावर जातील.
 
3 दिवस चालणार नाही बँका 
कर्मचारी संघटनांनी संपाचा निर्णय मागे न घेतल्यास बँक ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. बँक संघटनांनी संपाचा प्रभाव अधिक प्रभावी करण्यासाठी 27 जूनची निवड केली आहे. 27 जून सोमवार आहे. 25 जून रोजी आठवड्याचा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील, तर 26 जून रोजी रविवार असल्याने बँकांचे कामकाज होणार नाही. अशा प्रकारे संपामुळे बँका सलग तीन दिवस बंद राहू शकतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान; 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' ने सन्मानित

LIVE: शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

नागपूर : सिनेमागृहातून 'पुष्पा 2'चित्रपट बघताना खून आणि तस्करीच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले

डोंबिवलीत बांगलादेशींवर पोलिसांची मोठी कारवाई, 1 महिलेसह 6 नागरिकांना अटक

पुढील लेख
Show comments