Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Bank Holiday In November : नोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद, कधी असणार सुट्ट्या जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 27 ऑक्टोबर 2021 (08:50 IST)
Bank Holidays in November 2021 तुम्हीही नोव्हेंबर महिन्यात बँकेशी संबंधित काम करणार असाल तर आधी ही बातमी वाचा. धनत्रयोदशी, दिवाळी, भाईदूज, छठ पूजा, गुरु नानक जयंती अशा अनेक सुट्ट्या नोव्हेंबर २०२१ मध्ये येणार आहेत. अशा परिस्थितीत, संपूर्ण महिन्यात एकूण 17 दिवस बंद असतील. या महिन्यात सलग अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत, त्यामुळे तुम्हालाही काही कमी महत्त्वाच्या गोष्टींचा निपटारा करावयाचा असेल, तर त्या त्वरित निकाली लावून घ्या.
 
नोव्हेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नोव्हेंबर महिन्यासाठी अधिकृत बँक सुट्ट्यांची यादी जारी केली आहे, त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात 17 सुट्ट्या आहेत. या दरम्यान भारतातील अनेक शहरांमध्ये बँका सतत बंद राहतील. या 17 दिवसांच्या सुट्टीमध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे.
 
RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवारी तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत, RBI ने 1, 3, 4, 5, 6, 10, 11, 12, 19, 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय महिन्यातील चार रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार सुट्ट्या आहेत. 7, 14, 21 आणि 28 नोव्हेंबरला रविवारी देशभरात बँकांना सुट्टी असेल. त्याचबरोबर 13 नोव्हेंबरला दुसरा शनिवार आणि 27 नोव्हेंबरला चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
 
सुट्टीची यादी-
 
दिवाळी पूजेच्या निमित्ताने 4 नोव्हेंबरला बंगळुरूवगळता सर्व राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, डेहराडून, गंगटोक, जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी म्हणजेच 5 नोव्हेंबरला गोवर्धन पूजेच्या दिवशी बँका बंद राहतील.
गंगटोक, इम्फाळ, कानपूर, लखनौ आणि शिमला येथे 6 नोव्हेंबर रोजी भाई दूज, चित्रगुप्त जयंती, निंगोल चकोबा या दिवशी बँकांमध्ये सामान्यपणे काम होणार नाही.
पाटणा आणि रांचीमध्ये 10 नोव्हेंबरला छठपूजेनिमित्त बँका बंद राहणार आहेत. त्याचवेळी 11 नोव्हेंबर रोजी छठ पूजेच्या निमित्ताने पाटण्यात बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही.
12 नोव्हेंबरला वांगला उत्सवानिमित्त शिलाँगमधील सर्व बँका बंद राहतील.
19 नोव्हेंबरला गुरुनानक जयंती आणि कार्तिक पौर्णिमेला आयझॉल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
22 नोव्हेंबरला कनकदास जयंतीला बंगलोरमध्ये बँका बंद असणार.
23 नोव्हेंबरला सेंग कुत्स्नमच्या निमित्ताने शिलाँगमधील बँका बंद राहतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

नेकटाईच्या झुल्यात अडकून 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

LIVE: काँग्रेसने मुख्यमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली

Santosh Deshmukh murder पोलिसांना अपयश म्हणत काँग्रेसने मुख्यमंत्री फडणवीसांकडे राजीनामा मागितला

देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा देत 'विकसित भारत' अभियानात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची म्हणाले राधाकृष्णन

Santosh Deshmukh murder case बीडमध्ये गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचा कडक इशारा

पुढील लेख
Show comments