Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Bank Holidays August: ऑगस्ट महिना सणांनी भरलेला, इतके दिवस बँका बंद राहणार, यादी तपासा

Webdunia
सोमवार, 25 जुलै 2022 (15:13 IST)
Bank Holidays in August 2022: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ऑगस्ट महिन्यासाठी बँक सुट्ट्यांची यादी जारी केली आहे.पुढील महिन्यात एकूण 13 दिवस बँका बंद राहतील (2रा/चौथा शनिवार आणि रविवार वगळता).स्वातंत्र्य दिन 2022, रक्षाबंधन, जन्माष्टमी 2022 आणि गणेश चतुर्थी 2022 यासह अनेक मोठे सण ऑगस्टमध्ये येत आहेत.अशा परिस्थितीत, जर तुम्हाला पुढील महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल, तर तुमची राज्य सुट्टी पाहून त्यानुसार बँकेत जाण्याचा प्लॅन करा.
 
या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत.RBI (Bank Holidays List 2022) च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगी नोटिफिकेशनवर देखील अवलंबून असतात.
 
(ऑगस्ट 2022 मधील बँक सुट्ट्यांची यादी)-
1 ऑगस्ट:द्रुपका शे-जी सण (फक्त सिक्कीममधील बँका बंद राहतील.)
7 ऑगस्ट:2022 - पहिला रविवार (साप्ताहिक सुट्टी)
8 ऑगस्ट:मोहरम (फक्त जम्मू-काश्मीरमधील बँकाच राहतील)
9 ऑगस्ट:मोहरम (अगरतल्ला )अहमदाबाद, आयझॉल, बेलापूर, बेंगळुरू, भोपाळ, चेन्नई, हैदराबाद, जयपूर, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा, रायपूर आणि रांची येथे बँका बंद राहतील.)
11 ऑगस्ट: रक्षा बंधन (सर्वत्र सुट्टी) संपूर्ण देश ) 
13 ऑगस्ट:-दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)
14 ऑगस्ट:-रविवार (साप्ताहिक सुट्टी)
15 ऑगस्ट: स्वातंत्र्य दिन
16 ऑगस्ट: पारशी नववर्ष (मुंबई आणि नागपूरमध्ये सुट्टी)
18 ऑगस्ट:जन्माष्टमी (देशभरात सुट्टी)
21 ऑगस्ट:रविवार (साप्ताहिक सुट्टी)
28 ऑगस्ट: रविवार (साप्ताहिक सुट्टी)
31 ऑगस्ट: गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये बँका बंद राहतील)
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments