Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारचे मोठे पाऊल; करणार ही मोठी घोषणा

Webdunia
सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (14:56 IST)
मुंबई– राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याबरोबरच शेतकऱ्यांना शेती परवडावी या उद्देशाने राज्यातील शिंदे – फडणवीस सरकार लवकरच एका मोठ्या पॅकेजची घोषणा करणार आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारीदेखील सुरू करण्यात आली असून, डिसेंबर महिन्यात होणाऱ्या नागपूर अधिवेशनात या पॅकेजची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
 
शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा अतिशय चिंतेचा विषय आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानुसार पॅकेज तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात संबंधित विभागांकडून सूचना मागविल्या आहेत. त्यासाठीच मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी अलिकडेच एक बैठक घेतली. उद्या, ४ नोव्हेंबरला पुन्हा एक बैठक होणार असून लागवडीचा खर्च कमी करणे, वातावरणीय बदलांचा वेध घेत पीक पॅटर्नची निश्चिती, आदी बाबींचा विचार केला जाणार आहे.
 
वेगवेगळ्या तज्ज्ञांची मतेदेखील या विषयात विचारात घेतली जाणार आहे. वेगवेगळ्या विभागांनी सुचविलेल्या उपाययोजना, यापूर्वी राज्य सरकारने दिलेले पॅकेज, नामवंत संस्थांनी आत्महत्या रोखण्यासाठी वेळोवेळी सुचविलेल्या उपाययोजना आणि तज्ज्ञांची मते विचारात घेऊन पॅकेजचे स्वरूप निश्चित केले जाणार आहे. पतपुरवठा पॅटर्नमध्ये आमूलाग्र बदल, सरकारी, सहकारी बँकांबरोबरच व्यावसायिक बँकांचे कर्जवाटपाबाबत उत्तरदायित्व वाढविणे यावरही भर दिला जाणार आहे.
 
विविध माध्यमांतून मदत
शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास स्व. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेतून दोन लाखांपर्यंत मदत दिली जाते. त्यामध्ये बदल करून विम्याऐवजी स्व. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजना राबविली जाणार आहे. विम्याचा हप्ता म्हणून शेतकऱ्यांना तीन ते सहा हजार रुपये भरावे लागतात. ही रक्कम नाममात्र केली जाईल. तसेच विमा कंपन्यांच्या हप्त्याची रक्कम राज्य सरकारकडून भरण्यात येईल.
कृषिपंपांच्या वीज कनेक्शनसाठी ५० हजार अर्ज प्रलंबित असून, या पार्श्वभूमीवर कृषिपंपांचे वीज कनेक्शन देण्यासाठीचा धडक कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. याबरोबरच, कृषिकर्जावर अत्यल्प व्याजदर, शेतकरी वा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मोठ्या आजारावरील मोफत उपचार , गावपातळीपर्यंत कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी आणि पुरेशा साठवणुकीची केंद्रे उभारणे यावर भर देण्याचा मानस राज्य सरकारचा आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments