Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बीएसएनएलकडून प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ऑफर्स

Webdunia
बीएसएनएलने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रीपेड ग्राहकांसाठी तीन ऑफर्स आणल्या आहेत. यात 26 रुपयांमध्ये ग्राहकांना बीएसएनएल नेटवर्कवर 26 तासांसाठी अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा आनंद घेता येणार आहे. तर उर्वरित दोन प्लॅन टॉकटाईम ऑफर आहेत. बीएसएनएलचे संचालकीय व्यवस्थापक अनुपम श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली आहे.
 
26 रुपयांची ऑफर 25 ते 31 जानेवारी दरम्यान चालू असेल. तर कॉम्बो 2601 या ऑफरमध्ये ग्राहकांना दीडपट म्हणजे 3 हजार 900 रुपये टॉकटाईम मिळणार आहे. 2 हजार 600 रुपये मुख्य अकाऊंटमध्ये जमा होतील, तर 1300 रुपये दुसर्‍या अकाऊंटमध्ये जमा होतील. मुख्य अकाऊंटमधील टॉकटाईम वापरण्यासाठी कोणतीही व्हॅलिडिटी नसेल. मात्र 1300 रुपये तीन महिन्यांमध्ये वापरावे लागणार आहे. 
 
कॉम्बो 6801 या ऑफरमध्ये ग्राहकांना दुप्पट टॉकटाईम मिळणार आहे. मुख्य खात्यात 6 हजार 800 रुपये, तर एवढीच रक्कम दुसऱ्या अकाऊंटमध्ये जमा होईल. या दोन्हीही ऑफरचा लाभ 26 जानेवारी ते 31 मार्च या काळात घेता येणार आहे. बीएसएनएलने काही दिवसांपूर्वी नव्या ग्राहकांसाठी 149 रुपयात कोणत्याही नेटवर्कवर दररोज 30 मिनिट व्हॉईस कॉलिंगची ऑफर दिली आहे. 30 दिवसांसाठी ही ऑफर असेल.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments