Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एमटीएनएल ‘जिओ’ला विकण्याचा केंद्र सरकारचा डाव

Central Government
Webdunia
बुधवार, 19 डिसेंबर 2018 (08:47 IST)
‘महानगर टेलिफोन निगम’ला (एमटीएनएल) आर्थिकदृष्टय़ा कमकुवत करून ही कंपनी अंबानी यांच्या ‘जिओ’ला विकण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. ‘जिओ’ला कर्मचारी नको आहेत पण कोटय़वधींची ‘एमटीएनएल’ची मालमत्ता हवी आहे. केंद्र सरकारच्या या प्रयत्नांना मान्यताप्राप्त युनियनचे अध्यक्ष व खासदार अरविंद सावंत यांची साथ आहे, असा गंभीर आरोप ‘युनायटेड फोरम ऑफ युनियन्स आणि असोसिएशन्स’चे अध्यक्ष व आमदार भाई जगताप यांनी  केला.
 
२२ हजार कोटींची मालमत्ता असलेली ‘विदेश संचार निगम’ही कंपनी फक्त १४३९ कोटी रुपयांना टाटा कंपनीला विकण्यात आली. त्याचीच पुनरावृत्ती ‘एमटीएनएल’बाबत होणार आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांचे वेतन लांबविण्यात आले. कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण करून त्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडले जाईल. कर्मचाऱ्यांना रस्त्यावर आणून कोटय़वधी रुपयांची मालमत्ता असलेली निगम ‘जिओ’ला विकण्याचा मार्ग मोकळा केला जाईल, असा आरोपही जगताप यांनी केला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

नागपूर हिंसाचारानंतर परिस्थितीत सुधारणा, अनेक भागात संचारबंदी उठवली

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात माजी महाराष्ट्र सरकारवर "निष्काळजीपणा" केल्याचा भाजप आमदाराचा आरोप

LIVE: अजित पवारांचा पक्षराज्य स्थापना दिनी निमित्त महाराष्ट्र महोत्सव' साजरा करणार

अजित पवारांचा पक्षराज्य स्थापना दिनी निमित्त महाराष्ट्र महोत्सव' साजरा करणार सुनील तटकरे यांची माहिती

न्यायाधीशांच्या घरातून सापडलेल्या रोख रकमेवरून संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर निशाणा

पुढील लेख
Show comments