Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Diesel Price Hike :डिझेल 25 रुपये प्रतिलिटर महागले

Webdunia
सोमवार, 21 मार्च 2022 (10:36 IST)
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींचा भार कमी करण्यासाठी कंपन्यांनी डिझेलच्या दरात प्रतिलिटर 25 रुपयांनी वाढ केली आहे. आता पेट्रोल पंपावर घाऊक ग्राहकांना डिझेल 25 रुपयांनी अधिक मिळणार आहे.
 
किंबहुना, बसचालक आणि मॉल्समध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल खरेदी करताना झालेला गोंधळ आणि तोटा भरून काढण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. आता या बसचालक आणि मॉल्सकडून डिझेल खरेदीसाठी 25 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. मात्र, या खरेदीचा किरकोळ ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.
 
मार्चमध्ये पेट्रोल पंपावरील विक्रीत 20 टक्क्यांनी मोठी उसळी आली, कारण बसचालक आणि मॉल मालक थेट कंपन्यांऐवजी पेट्रोल पंपावरून स्वस्त डिझेल खरेदी करत होते. त्यामुळे घाऊक विक्री करणाऱ्या कंपन्यांना सातत्याने तोटा सहन करावा लागत होता. हे पाहता आता पेट्रोल पंपांवर घाऊक डिझेलच्या दरात प्रतिलिटर 25 रुपयांनी वाढ करण्यात आली असून त्यामुळे या कंपन्यांना तोट्यातून वाचवता येईल.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात

ही एक पिशवी घराच्या मुख्य दारावर लावा, पैशाशी संबंधित समस्या दूर होतील

पेल्विक हेल्थचा मुलाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो,निरोगी कसे ठेवायचे ते जाणून घ्या

Relationship : परस्पर समंजसपणाने नाते जपा

अकबर-बिरबलची कहाणी : लाटा मोजणे

सर्व पहा

नवीन

LIVE: अमित शहांचा बचाव करीत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वोट जिहादचा दावा करणाऱ्यांवर सपा आमदार रईस शेख यांनी निशाणा साधला

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उतरले अमित शहांच्या बचावासाठी, म्हणाले ते हे करू शकत नाहीत

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर भीषण कार अपघात, तीन ठार, तीन गंभीर जखमी

67 प्रवाशांना घेऊन जाणारे अजरबैजानचे विमान कैस्पियन समुद्राजवळ कोसळले

पुढील लेख
Show comments