Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Edible Oil Price: खाद्यतेल झाले महाग, जाणून घ्या आता काय आहे नवीन किंमत

Webdunia
शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (19:50 IST)
सध्या महागाई वाढतच आहे, पेट्रोल,डिझल, गॅसच्या किमतीत दिवसंदिवस विलक्षणीय वाढ होतच आहे. आता या वर्षाच्या अखेरीस खाद्य तेलाचे भाव देखील वधारले आहे. त्यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला कात्री बसणार आहे. व्यावसायिक गॅसच्या किमतीत वाढ झाल्यामुळे उपहारगृहात खाद्य पदार्थ वाढणार आहे.सातत्याने वाढत्या महागाईमुळे आता सामान्य माणसाचे जगणे खरोखर कठीण होत चालले आहे. 
मोहरी आणि शेंगदाणा तेल-तेलबिया आणि सोयाबीन तेलबियांच्या किमतीत देशाच्या तेल-तेलबियांच्या बाजारात परदेशातील तेजी मुळेखाद्य तेलाचे भाव वधारणार.  तर सीपीओ आणि सोयाबीन इंदूर तेलाच्या किमतीत घट झाली. सामान्य व्यवहारादरम्यान, काही तेलबियांचे भाव पूर्वीच्या भावावर राहिले. मलेशिया एक्सचेंज 0.34 टक्के आणि शिकागो एक्सचेंज सध्या सुमारे एक टक्क्याने वर असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. परदेशात देशांतर्गत बाजारात मोहरी, शेंगदाणा तेल-तेलबिया आणि कापूस तेलाच्या दरात मोठी सुधारणा झाली. दुसरीकडे, मागणी कमी झाल्याने सीपीओ, सोयाबीन तेल इंदूरचे भाव तोटा दर्शवत बंद झाले.
सूत्रांनी सांगितले की, सलोनी शम्साबाद यांनी मोहरीचा तेलाचा भाव 8,650 रुपयांवरून 8,900 रुपये प्रति क्विंटलवर केल्यामुळे खाद्यतेल वधारले, ज्यामुळे मोहरी तेल आणि तेलबियांच्या दरात सुधारणा झाली. हलक्या तेलाची मागणी वाढल्याने भुईमूग तेल आणि तेलबियांच्या किमतीही सुधारल्या. भुईमूगाच्या दरात सुधारणा झाल्याने कापूस तेलाच्या मागणीतही सुधारणा झाली आहे. 
सोयाबीन उत्पादक शेतकरी कमी भावात सोयाबीन विकत नसल्यामुळे सोयाबीनचे दाणे व सोयाबीन लूजचे भाव चांगलेच वाढल्याचे त्यांनी सांगितले. सूत्रांनी सांगितले की, हिवाळ्यातील गोठवलेल्या तेलाच्या मागणीवर परिणाम होतो त्यामुळे कच्च्या पाम तेलाच्या (सीपीओ) किमती घसरल्या आहेत. याशिवाय  पामोलिन स्वस्त झाल्यामुळेही सीपीओच्या घसरणीला आधार मिळाला.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

तुमचे सिम बंद झाले आहे… कॉल आला, OTP सांगितला आणि साडेचार लाख गमावले

महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र सरकारने यावर्षी साडेसहा लाख घरांना मंजुरी दिली, मुख्यमंत्र्यांनी आभार मानले

LIVE: राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

राजकीय कारणासाठी, द्वेष निर्माण करण्यासाठी परभणीला राहुल यांची भेट -देवेंद्र फडणवीस

विनोद कांबळी यांची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

पुढील लेख
Show comments