Dharma Sangrah

पीएफ अकाऊंटमधील रकमेत तब्बल १५ टक्क्यांनी वाढ

Webdunia
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (10:49 IST)

ईपीएफओ पूढील महिन्यात पीएफ अकाऊंटमधील रकमेत तब्बल १५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. ईपीएफओच्या ५ कोटीहून अधिक ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची नोव्हेंबर महिन्यात बैठक होणार आहे. या निर्णयाबाबत बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. एक्सचेंज ट्रेडड फंड (ईटीएफ) मध्ये गुंतवलेल्या रकमेचा काही हिस्सा पीएफ खातेधारकांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. ईटीएफ एक प्रकारचं स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूक आहे, हे बॉण्डच्या माध्यमातून करण्यात येतं.

कॅगने ईपीएफओच्या या निर्णयाला मंजूरी दिली आहे. श्रम मंत्रालयातील सुत्रांच्या मते, या वर्षाच्या सुरुवातीला सीबीटीच्या बैठकीत हा प्रस्ताव कॅगकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र, कॅगने या प्रस्तावावर सहमती दर्शवत काही आक्षेप घेतले आहेत. यावर आगामी बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.

या वर्षाच्या अखेरपर्यंत ईपीएफओद्वारे ईटीएफमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा आकडा ४५ हजार कोटींवर पोहोचणार आहे. ईपीएफओने ईटीएफमध्ये ऑगस्ट २०१५ पासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. पूर्वी ५ टक्के गुंतवणूक होती मात्र, आता ही गुंतवणूक वाढून १५ टक्के करण्यात आली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राने लहान मॉड्यूलर रिअॅक्टर्ससह अणुऊर्जा प्रकल्पाची घोषणा केली

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समध्ये गोळीबार, ३ जणांचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये मोठी दुर्घटना: स्टील प्लांटमध्ये स्फोट झाल्याने ७ कामगारांचा मृत्यू

जम्मू आणि काश्मीरमधील दोडा येथे लष्करी वाहन दरीत कोसळले, १० जणांचा मृत्यू, ७ जण गंभीर जखमी

BMC Mayor Reservation Controversy मुंबई महापौरपदाच्या आरक्षणावरून उद्धव ठाकरे यांच्या गटाने मंत्रालयात गोंधळ घातला!

पुढील लेख
Show comments