Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गोट बँकेची संकल्पना राबवून ५०० महिलांना शेळ्यांचे वितरण करण्यात येणार

Webdunia
बुधवार, 11 मे 2022 (08:39 IST)
नागपूर जिल्ह्यातील ५०० महिलांना सहभागी करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी महामंडळाच्या प्रक्षेत्र बोंद्री येथे गोट बँकेची स्थापना करण्यात येणार आहे. या अंतर्गत महामंडळाच्या निधीतून ५०० महिलांना शेळ्यांचे वितरण करण्यात येणार आहे. कारखेडा गोट प्रोडयुसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने गोट बँकेचे संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
 
मंत्रालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते, यावेळेस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे पी गुप्ता, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह,अतिरिक्त आयुक्त धनंजय परकाळे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ शशांक कांबळे यांच्यासह प्रक्षेत्र व्यवस्थापक  उपस्थित होते.
 
मंत्री श्री. केदार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नवीन शासन आल्यानंतर महामंडळाच्या आर्थिक स्थिती सुधारली आहे. आता अधिकृत भागभांडवल १०० कोटी रुपये झाले आहे. तसेच महामंडळाची सरासरी वार्षिक आर्थिक उलाढाल ४० कोटी रुपयांची पर्यंत पोहचली आहे. पूर्वी राज्यात १०प्रक्षेत्र होते, ते आता १६ झाले आहेत. मांडग्याळ या मेंढीच्या जातीस केंद्र शासनाचे मानांकन प्राप्त झाले आहे.  मांडग्याळ ही मेंढीची जात महाराष्ट्रात प्रसिद्ध जात म्हणून ओळखली जात आहे. असे त्यांनी सांगितले.
 
इतर देशातून उच्च जातीच्या शेळ्या राज्यात आणण्यात येणार आहेत. लोकरीचे विविध प्रकारचे उत्पादने निर्माण करुन विक्रीस उपलब्ध करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांना जोडधंदा सुरू करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मदत करण्यात येणार असल्याचे श्री. केदार यांनी सांगितले.
 
शेळी मेंढी विमा विषयी माहिती पशुपालकापर्यंत पोहचवा
शेवटच्या पशुपालकांपर्यंत शेळी मेंढी विमा योजनेविषयी माहिती पोहचविण्यासाठी सर्व प्रक्षेत्र व्यवस्थापकांसह विभागाने प्राधान्य द्यावे अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी प्रक्षेत्र व्यवस्थापकांनी आप आपल्या प्रक्षेत्राची माहिती सांगून अधिक विकसित करण्यासाठी विविध सुचना केल्या.महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कांबळे यांनी यावेळी महामंडळाची सविस्तर माहिती दिली.
 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावरचे बळकटीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी ९४ कोटी प्रस्तावित करण्यात आले आहे. यामध्ये पशूधन खरेदी करणे, नवीन वाडे बांधकाम, कृत्रिम रेतन कार्यक्रम राबवणे, मुरघास निर्मिती यंत्रसामुग्री, शेळी मेंढी पालन प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकाम, प्रशिक्षणार्थी निवासी इमारत बांधकाम व शेतकरी निवासस्थान, जमीन विकास, सिंचन सुविधा विहीर, पाईपलाईन, इलेक्ट्रिक मोटर इत्यादी. ट्रॅक्टर ट्रॉली, कृषी अवजारे व चारा कापणी यंत्र, वैरण साठवणूक गोडाऊन, शेळी-मेंढी खाद्य कारखाना, कार्यालय इमारत बांधकाम, अधिकारी कर्मचारी निवास बांधकाम, प्रक्षेत्रावरील आवश्यक साधनसामुग्री, सुरक्षा भिंत, सिल्वी -पाश्चर विकसित करणे, अंतर्गत रस्ते, अल्ट्रासोनोग्राफी युनिट, फिरते शेळी-मेंढी चिकित्सालय वाहन खरेदी, फाँडर ब्लॉक मेकिंग युनिट ,सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

संबंधित माहिती

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

पुढील लेख
Show comments