Dharma Sangrah

सोने, चांदीच्या किंमतीने उच्चांक गाठला

Webdunia
सोमवार, 19 ऑगस्ट 2019 (10:28 IST)
सोन्याच्या आणि चांदीच्या किंमतीनेही उच्चांक गाठला आहे. सराफा बाजारात सोन्याची मागणी वाढल्याने सोन्याच्या किंमतीने पुन्हा एकदा 38 हजार रूपयांचा टप्पा गाठला आहे. तर चांदीच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत 40 हजार रूपयांचा आकडा पार करेल, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
 
दिल्लीत 99.9 आणि 99.5 टक्के शुद्ध असलेल्या सोन्याच्या किंमतीत 475 रूपयांची वाढ झाली. दरम्यान 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 38,442 रूपये तर 99.5 टक्के शुद्ध सोन्याची किंमत 38,250 रूपये प्रति 10 ग्राम झाली. तर दुसरीकडे सराफा बाजारात चांदीच्या किंमतीतही 378 रूपयांची वाढ झाली असून चांदीची किंमत 44 हजार 688 रूपये प्रति किलो झाली आहे. दरम्यान, चांदीच्या शिक्क्यांच्याही मागणीत वाढ झाल्याचे पहायला मिळाले. जागतिक अर्थ-राजकीय अनिश्चिततेने समभाग बाजाराला मंदीचे ग्रहण लागले असताना, अशा अस्थिर स्थितीत सुरक्षित आश्रयस्थान समजल्या जाणाऱ्या सोने-चांदीकडे गुंतवणूकदारांचा ओढा  आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

वर्धा येथील सेलू येथे बिबट्याचा हल्ला; बचावकार्यादरम्यान दोन जण जखमी

LIVE: बाणेर पासपोर्ट कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी

आई रागावली; जळगावच्या जोशी कॉलनीतील आठवी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या

भाजपची 'परिवर्तन यात्रा' चार विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच वेळी सुरू होणार, अमित शाह करणार सुरुवात

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; इको कारची टेम्पोशी टक्कर झाल्याने तीन जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments