Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान श्रम योगी मानधन पेन्शनं योजनेत रु. 3000 पेन्शनं कसे मिळवाल

Webdunia
सोमवार, 25 मार्च 2019 (15:23 IST)
असंघटित क्षेत्रामध्ये काम करणार्‍या श्रमिकांसाठी बजेट 2019 मध्ये पंतप्रधान श्रम योगी मानधन (PM-SYM) पेन्शनं स्कीमची घोषणा करण्यात आली होती. या योजनेत 60 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना 3,000 रुपयांचे पेन्शनं मिळेल. जर पेन्शनं घेणार्‍या व्यक्तीचा मृत्यू झाला तर ती रक्कम त्याच्या जोडीदाराला मिळण्याचे तरतूद देखील करण्यात आले आहे. या  योजनेत लाभार्थी आपल्या खात्यात जेवढ्या रुपयांचा योगदान करेल, सरकार देखील त्याच्या खात्यात त्याच्याकडून तेवढीच रक्कम जमा करेल.   
 
मानधन योजनेसाठी नोंदणी सुरू  
जर तुम्ही पंतप्रधान श्रम योगी मानधन योजनेच खाता उघडण्यास इच्छुक असाल तर आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुम्हाला काय करायचे आहे. खाता उघडण्याची पूर्ण माहिती   आम्ही आमच्या ईपीएफच्या वेबसाइट आणि कॉमन सर्विस सेंटर (सीएससी)मधून मिळवली आहे.   
 
कोण कोण शकतात या योजनेचा लाभ ? 
या स्कीमचा फायदा घेण्यासाठी खाली दिलेल्या पात्रता पूर्ण करावे लागेल.  
1. तुम्ही असंघटित क्षेत्रात काम करत असाल.  
2. तुमचे वय 18 वर्षापासून ते 40 वर्षामधील असायला पाहिजे.  
3. तुमची मासिक अमदानी 15,000 रुपयांपेक्षा जास्त नको.  
 
संगठित क्षेत्रात  काम करणारे व्यक्ती किंवा कर्मचारी भविष्य निधी (EPF), नॅशनल पेन्शनं स्कीम (NPS) किंवा राज्य कर्मचारी बीमा निगम (ESIC)चे सदस्य किंवा आयकराचे भुगतान करणारे लोक या स्कीमसाठी योग्य नाही आहेत.   
 
कोणत्या कागदपत्रांची गरज पडेल ? 
या योजनेत नोंदणीसाठी तुमच्याजवळ खाली दिलेले दस्तावेज होणे आवश्यक आहे.   
1. आधार कार्ड 
2. बचत खाता/जन-धन खाता, तसेच आईएफएससी कोड 
3. मोबाइल नंबर 
 
कसे करायचे आवेदन? 
या स्कीममध्ये आवेदन करण्यासाठी तुम्हाला आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर जावे लागणार आहे. तुम्ही तुमच्यासोबत आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाइल फोन घेऊन जाणे विसरू नका. तुम्ही हे तपासून घ्या की तुमच्या बचत खाता पासबुकवर आईएफएससी कोड अंकित आहे की नाही. हे असणे गरजेचे आहे.
 
ईपीएफ इंडियाच्या वेबसाइटवर तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससीचा शोध लावू शकता. त्याशिवाय एलआयसीची ब्रांच ऑफिस, ईएसआईसी, ईपीएफओ किंवा केंद्र तथा राज्य सरकारचे   लेबर ऑफिस जाऊन आपल्या नजीकच्या सीएससी सेंटरचा शोध लावू शकता.
 
कॉमन सेंटरवर तुम्हाला ऑटो-डेबिट फॅसिलिटीसाठी सहमति फॉर्मसोबत स्वप्रमाणित फॉर्म जमा करावा लागेल. दोन्ही फॉर्म तुम्हाला सीएससीवर मिळतील. सीएससीवर मिळालेल्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्ड आणि बँक पासबुकवर अंकित माहिती भरावी लागणार आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण विवरणाला वेरिफाई कराल, तेव्हा तुमच्या मोबाइलवर एक वन टाइम पासवर्ड येईल.
 
कितीचे योगदान ? 
तुम्हाला किती रक्कम जमा करायची आहे, हे तुमच्या वयानुसार निश्चित करण्यात येईल. जी राशी निश्चित होईल ती तुम्हाला 60 वर्षांपर्यंत भरावी लागणार आहे. पहिल्या  सब्सक्रिप्शन अमाउंटला सोडून बाकीची रक्कम तुमच्या बचत खात्यात मासिक आधारावर कापण्यात येईल. तुम्हाला पहिले सब्सक्रिप्शन नकद जमा करावे लागेल.  त्यानंतर तुमचे 60 वर्षाचे झाल्यानंतर रक्कम खात्यातून सरळ कापण्यात येईल.
 
अशी असेल पूर्ण प्रक्रिया 
सीएससी केंद्रावर नोंदणी पूर्ण झाल्यावर योजनेत एक ऑनलाईन पेन्शनं नंबर जनरेट होईल. सीएससी तुम्हाला पेन्शनं स्कीम कार्डचा एक प्रिंट आऊट देईल. पेन्शनं स्कीम कार्डमध्ये  तुमचे नाव, पेन्शनं सुरू होण्याची तारीख, मासिक पेन्शनं राशी, पेन्शनं अकाउंट नंबर समेच बर्‍याच माहिती अंकित असेल.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments