Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'फ्रीडम टू फ्लाय' ची ऑफर, अवघ्या 799 विमान प्रवास

Webdunia
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (09:41 IST)

जास्तीत जास्त हवाई प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी आता टाटा-एसआयए यांच्या संयुक्त भागीदारीतून आकाराला आलेल्या विस्तारा विमान कंपनीने स्वस्त हवाई प्रवासाची ऑफर जाहीर केली आहे.  विस्ताराने 'फ्रीडम टू फ्लाय' या ऑफरअंतर्गत हवाई तिकिटावर घसघशीत डिस्काऊंट दिला आहे. या योजनेमध्ये इकॉनॉमी क्लासचे तिकीट 799 रुपये तर, प्रिमियम इकॉनॉमी वर्गाचे तिकीट 2,099 रुपये आहे. मर्यादीत कालावधीसाठी ही ऑफर आहे. आज मध्यरात्रीपासून 9 ऑगस्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत प्रवाशांना तिकीट बुक करता येईल. या ऑफरमध्ये 23 ऑगस्ट 2017  ते 19 एप्रिल 2018 या कालावधीसाठी तिकीट बुकिंग करता येईल. 

या ऑफरमुळे प्रवाशांना गोवा, पोर्ट ब्लेअर, लेह, लडाख, जम्मू, श्रीनगर, कोच्ची, गुवहाटी, अमृतसर आणि भुवनेश्वर या पर्यटनस्थळी जाण्याचा अॅडव्हान्स प्लान करण्याची संधी आहे. या ऑफर अंतर्गत दिल्ली, कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरु या मेट्रो शहरांचा सुद्धा प्रवास करता येईल. 

ऑफरतंर्गत श्रीनगर-जम्मू रुटवर सर्वात स्वस्त 799 रुपयांचे तिकीट उपलब्ध आहे. त्याशिवाय दिल्ली-अमृतसर, दिल्ली-चंदीगड मार्गावर तुम्ही अनुक्रमे 1,199 आणि 1,299 रुपयात तुम्ही प्रवास करु शकता. दिल्ली-श्रीनगर आणि दिल्ली-अहमदाबाद मार्गावर 1,499 रुपयात तिकीट बुक करु शकता.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments