suvichar

मारूती सुझुकी इंडियाकडून विशेष सर्व्हिस कॅम्पेन

Webdunia
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018 (15:32 IST)
मारूती सुझुकी इंडियाने एक विशेष सर्व्हिस कॅम्पेन सुरू केलं आहे. ऑनलाईन वेबसाईट मनी कंट्रोल डॉट कॉमने ही बातमी दिली आहे. या बातमीनुसार कंपनीच्या या अभियानात सियाज डिझेल गाडीसह अल्फा आणि जेटा वेरिएंटमधील स्पीडोमीटर असेम्बलीत बदल केले जात आहेत. कंपनीने म्हटलं आहे की, याला रिकॉल म्हणता येणार नाही, कारण गाडीत तांत्रिक कमतरता नाही, तर सुरक्षेसंबंधी अडचण दूर केली जात आहे.
 
ऑटोमोबाईल कंपन्या जगभरात असं सर्व्हिस कॅम्पेन चालवतात. या अभियानानुसार गाडीत येणाऱ्या लहान मोठ्या समस्या दूर केल्या जातात. या अडचणी सोडवल्यानंतर ग्राहकांसाठी गाडी आणखी आरामदायक होते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सियाझ डिझेल आणि जेटा तसेच अल्फा वेरिएंटच्या जवळजवळ 880 गाड्यांमध्ये हे बदल केले जाणार आहेत. या गाड्यांचं उत्पादन १ ऑगस्ट २०१८ पासून २१ सप्टेंबर २०१८ दरम्यान झालं आहे. या अभियानाबद्दल गाडी मालकांना मागील महिन्यात सांगण्यात आलं होतं. गाडीचं स्पिडोमीटर बदलण्याचं काम कंपनी मोफत करणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

बँकॉकहून मुंबई विमानतळावर येणाऱ्या तीन प्रवाशांकडून २३ कोटी रुपयांचा गांजा जप्त

स्मार्टफोन 'हँग' होतोय? नवीन घेण्यापूर्वी या ५ ट्रिक्स वापरून बघा, पैसे वाचतील!

२०२५ मध्ये महाराष्ट्रात ४८,००० हून अधिक महिला बेपत्ता झाल्या, ज्यामध्ये मुंबईत मुलींच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण १० पटीने वाढले

अवकाळी मुळे शेतकरी पुन्हा संकटात

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज शेगावात

पुढील लेख
Show comments