Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत दूधबंदी आंदोलनाचा परिणाम नाही

milk bandi
Webdunia
मंगळवार, 17 जुलै 2018 (08:58 IST)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध दरवाढीसाठी सुरू करण्यात आलेल्या दूधबंदी आंदोलनाचा परिणाम पहिल्या दिवशी मुंबई शहर व उपनगरात जाणवला नाही. दूध वितरक व डेअरीचालकांकडे पुरेसे दूध उपलब्ध असल्याने सुरळीतपणे विक्री सुरू होती. सध्या गरजेहून अधिक दूध उपलब्ध आहे, मात्र हे आंदोलन दोन-तीन दिवस सुरू राहिल्यास दूधटंचाई उद्भवू शकते, अशी शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात आली.
 
मुंबईला होणारा दूधपुरवठा बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर गोकुळ, वारणा याबरोबरच बहुतांश दूध उत्पादक कंपन्यांनी शनिवार, रविवारी अतिरिक्त दूध संकलन करून ठेवले आहे. त्याशिवाय गुजरातहून येणारे अमूलचे दूध  रेल्वेतून पाठविण्यात आले. मुंबईकरांना गरज ७० लाख लीटरची असून  पुरवठा
एक कोटी १२ लाख लीटर दुध उपलब्ध आहे. त्यामुळे जवळपास दुप्पट दुधाचा पुरवठा असल्याने मंगळवारीही विक्रीवर फारसा परिणाम जाणवणार नाही, असे जाणकारांकडून सांगण्यात आले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात

मुंबई : ट्रॅकवरून चालणाऱ्या दोघांचा लोकल ट्रेनची धडक बसून मृत्यू

मुंबई: कोस्टल रोडवर टेम्पोचा पाठलाग करताना समुद्रात पडून वाहतूक वॉर्डनचा मृत्यू

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, लाडकी बहीण योजनेचा 10 वा हफ्ता या दिवशी येणार! बहिणींसाठी नवी योजना सुरु

मुंबई विमानतळ 9 मे रोजी नाही तर 8 मे रोजी 6 तासांसाठी बंद राहणार, सीएसएमआयएचे निवेदन

पुढील लेख
Show comments